Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 20 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dharashiv Water Crisis : 9 गावांना 12 पाण्याचे टँकरद्वारे पाणीपुरवठा; 286 खाजगी विहिरी ताब्यात

Dharashiv Water Crisis : धाराशिव जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणीटंचाईची तीव्रता लक्षात घेऊन प्रशासनाने पाणीपुरवठ्यासाठी उपाययोजनांना वेग दिला आहे. 17 ऑक्टोबर 2026 च्या अहवालानुसार, जिल्ह्यातील नऊ गावांना 12 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून, 286 खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

  • By Sanman Jadhav
Updated On: Oct 20, 2026 | 05:37 PM
फोटो सौजन्य सोशल मिडिया

फोटो सौजन्य सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:
  • पाच गावांमध्ये WATER TANKER  
  • 286 खाजगी विहिरींचे अधिग्रहण  
  • ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी धावपळ  
Dharashiv Water Crisis :  धाराशिव जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणीटंचाईची तीव्रता लक्षात ‘घेऊन प्रशासनाने पिण्याच्या पाण्याची उपलब्धता वाढविण्यासाठी उपाययोजनांना वेग विहिरींच्या दिला आहे. टँकरद्वारे पाणीपुरवठा आणि खासगी अधिग्रहणातून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. WATER TANKER  – देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जिल्ह्यातील नऊ गावांना 12 टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असून, 286 खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाच्या 17 ऑक्टोबर 2026 च्या अहवालातून ही माहिती समोर आली.

पाच गावांमध्ये WATER TANKER

जिल्ह्यातील टँकरद्वारे पाणीपुरवठ्याची सर्वाधिक गरज धाराशिव तालुक्यात असल्याचे चित्र आहे. तालुक्यातील पाच गावांना सात टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. यामध्ये कौडगाव (बावी), कजरखेडा आणि बोरखेडा येथे प्रत्येकी एक, पळसप येथे तीन, तर नांदुर्गा येथे एक टैंकर सुरू आहे. उमरगा तालुक्यातील नारंगवाडी येथे दोन, बलसूर येथे एक आणि आनंदनगर येथे एक, असे चार टैंकर सुरू आहेत, लोहारा तालुक्यातील सास्तूर येथे एका टैंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. दरम्यान, तुळजापूर, कळंब, भूम, वाशी आणि परंडा या पाच तालुक्यांत सध्या टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू नसल्याचे अहवालात नमूद आहे.

Nagpur News : बाजारपेठा गजबजल्या, वाहतूक कोंडीने रस्ते गुदमरले! वाहनांच्या गर्दीत नागरिकांची कसरत

286 खाजगी विहिरींचे अधिग्रहण

टँकरवरील अवलंबित्व कमी करण्यासोबतच स्थानिक जलस्रोतांचा वापर करून पिण्याच्या पाण्याची गरज भागविण्यावर प्रशासनाने भर दिला आहे. जिल्ह्यात एकूण 286 खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. त्यापैकी नऊ विंधन विहिरी टँकरद्वारे पाणीपुरवठ्यासाठी, तर 277 विहिरी टँकरव्यतिरिक्त पाणीपुरवठ्यासाठी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. या विहिरींच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर पाणी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे पाणीटंचाईग्रस्त गावांतील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी पर्यायी व्यवस्था उपलब्ध होत आहे.

ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी धावपळ

पाणीटंचाईच्या काळात ग्रामीण भागातील महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी धावपळ करावी लागते. त्यामुळे गावांमध्ये नियमित पाणीपुरवठा होणे महत्त्वाचे ठरते. टँकरद्वारे पाण्याचे वितरण सुरळीत ठेवण्यासोबतच अधिग्रहित विहिरींमधून उपलब्ध होणाऱ्या पाण्याचा योग्य वापर करणे आवश्यक आहे.

Chandrapur News: चंद्रपुरात पावसाची मोठी तूट; रब्बी पिकांचे नियोजन कसे कराल? कृषी विभागाने सांगितला पर्याय

Web Title: Dharashiv water shortage 12 tankers 286 private wells acquired sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 20, 2026 | 05:34 PM

Topics:  

  • Dharashiv News
  • water cut

संबंधित बातम्या

Jalgaon Water Cut : धरणांमधील पाणीसाठा कमी असल्याने पाणीपुरवठ्यात १० टक्के कपातीची घोषणा
1

Jalgaon Water Cut : धरणांमधील पाणीसाठा कमी असल्याने पाणीपुरवठ्यात १० टक्के कपातीची घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.