Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pandharpaur Nagar Parishad-Nagarpanchayat Election Result: पंढरपुरात भाजपच्या गडाला सुरुंग; प्रणिता भालेकेंचा विजय

पंढरपूरमध्ये होत असलेल्या प्रस्तावित कोट्यवधी रुपयांच्याच्या कॉरिडॉर च्या निमित्ताने ही निवडणूक भाजपसाठी मोठी प्रतिष्ठेची बनली होती. मात्र अनेक मातब्बर नेत्यांच्या सभा उपस्थिती नंतरही भाजपला पराभव स्वीकारावा लागला

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Dec 22, 2025 | 10:16 AM
Pandharpaur Nagar Parishad- Nagarpanchayat Election Result:

Pandharpaur Nagar Parishad- Nagarpanchayat Election Result:

Follow Us
Close
Follow Us:
  • भारतनाना भालके यांच्या स्नुषा प्रणिता भालके यांच्या विजय
  • भालके गटाने तीर्थक्षेत्र विकास आघाडी नावाने स्थानिक आघाडी करत भाजप विरोधात निवडणूक लढवली
  • भाजपाच्या शामल शिरसाट यांचा तब्बल 11,136 मतांनी पराभूत करत भाजपला धक्का
Pandharpaur Nagar Parishad- Nagarpanchayat Election Result: दिवंगत आमदार भारतनाना भालके यांच्या स्नुषा प्रणिता भालके यांच्या विजयी जल्लोषासाठी अवघी पंढरी एकवटली. प्रणिता भालके यांनी तीर्थक्षेत्र विकास आघाडी निर्माण नगराध्यक्षपदाला गवसणी घातली आहे. स्थानिक आघाडी असलेल्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीने नगराध्यक्षपदावर जबरदस्त विजय मिळवत भाजपचे आव्हान धुडकावून लावले आहे. पंढरपूरमधील नगरपरिषद निवडणुक प्रतिष्ठेची बनवण्यात आलेले होती. यामध्ये सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरेंसह, माजी आ.प्रशांत परिचारक, समाधान आवताडे यांची प्रतिष्ठा लागलेली होती.

Rohit Pawar on Municiapl Election Result: ‘काँग्रेस’ भाजपची बी-टीम; निवडणुकीतील पराभवानंतर रोहित पवार संताप, राजकारण तापणार

महाविकास आघाडीचे स्थानिक आमदार असलेल्या अभिजीत पाटील यांनी प्रचाराच्या ऐनवेळी आपले स्वतंत्र उमेदवार उभे केले होते. त्यामुळे एकाकी पडलेल्या भालके गटाने तीर्थक्षेत्र विकास आघाडी नावाने स्थानिक आघाडी करत भाजप विरोधात निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या वतीने प्रणिता भालके यांनी भाजपाच्या शामल शिरसाट यांचा तब्बल 11,136 मतांनी पराभूत करत भाजपला धक्का दिला आहे. तर दुसरीकडे भाजपचे तब्बल 24, तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे 11 तर एक उमेदवार अपक्ष नगरसेवक म्हणून निवडून आला आहे. एका अर्थाने भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्या असल्या तरी सत्तेची चावी असणारे खरे पद म्हणजेच नगराध्यक्षपद मात्र भाजपाला गमवावे लागले आहे.

पंढरपूरमध्ये होत असलेल्या प्रस्तावित कोट्यवधी रुपयांच्याच्या कॉरिडॉर च्या निमित्ताने ही निवडणूक भाजपसाठी मोठी प्रतिष्ठेची बनली होती. मात्र अनेक मातब्बर नेत्यांच्या सभा उपस्थिती नंतरही भाजपला या ठिकाणी पराभव स्वीकारावा लागला आहे. विशेष म्हणजे पंढरपूर व मंगळवेढा या दोन्ही ठिकाणी कोणत्याही मोठ्या दिग्गज नेत्याच्या किंवा स्थानिक आमदारांच्या सहकार्य शिवाय तीर्थक्षेत्र विकास आघाडीने सर्वसामान्य लोकांचा विश्वास संपादन करत आपला हा विजय मिळवला आहे.

Municipal Council Election Result 2025 Live Updates: दौंड नगर परिषद निवडणूक निकाल 2025 Live Updates; पुणे जिल्ह्याकडे लक्ष

विधानसभेची सत्ता हाती असतानाही भाजपचा मोठा पराभव

पंढरपूर तसेच मंगळवेढा नगरपरिषदेच्या निवडणुकीतील पराभव भाजपसाठी धक्कादायक आहे. या दोन्ही नगर परिषदा भाजपचा गड मानल्या जाणाऱ्या पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात येतात. या ठिकाणी आजवर भाजप नेते परिचारक यांचेच वर्चस्व राहिलेले आहे. तर मंगळवेढा नगरपरिषदेतही स्थानिक आमदार म्हणून भाजपचे विद्यमान विधानसभा सदस्य समाधान आवताडे यांची मोठी ताकद असतानाही भाजपला नगराध्यक्षपदी पराभव स्वीकारावा लागला असल्याने हा भाजपसाठी मोठ्या चिंतनाचा विषय झाला आहे आजवर परिचारक गटाने पंढरपूर नगरपरिषद वर एक हाती वर्चस्व राखलेले आहे विरोधी गटाचे नगरसेवक निवडून येत असली तरी सत्ता मात्र भाजपकडे राहिलेले आहे मात्र यंदाच्या निवडणुकीने हा पॅटर्न बदलल्याने याची सर्वत्र चर्चा होत आहे.

Web Title: Pandharpur municipal council nagar panchayat election result bjps stronghold in pandharpur is shaken pranita bhaleke registers a resounding victory

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 22, 2025 | 10:03 AM

Topics:  

  • Maharashtra Politics
  • nagar parishad
  • nagarpanchayat

संबंधित बातम्या

Supreme Court Relief Manikrao Kokate: मंत्रीपद गेले तरी आमदारकी कायम राहणार;माणिकराव कोकाटेंना सर्वोच्च दिलासा, पण…
1

Supreme Court Relief Manikrao Kokate: मंत्रीपद गेले तरी आमदारकी कायम राहणार;माणिकराव कोकाटेंना सर्वोच्च दिलासा, पण…

Thackeray Brother Alliance Announcement: उद्धव-राज एकत्र येणार; उद्या होणार ठाकरे-मनसे’च्या युतीची घोषणा?
2

Thackeray Brother Alliance Announcement: उद्धव-राज एकत्र येणार; उद्या होणार ठाकरे-मनसे’च्या युतीची घोषणा?

Satara Municipal Election Results 2025: शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची रणनीती यशस्वी ,सात नगरपालिका भाजपच्या गोटात
3

Satara Municipal Election Results 2025: शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची रणनीती यशस्वी ,सात नगरपालिका भाजपच्या गोटात

Sanjay Raut Press Confernce : निवडणुकीमध्ये पैशांची गारपीट…! तेच मशीन सेटिंग अन् तोच आकडा; संजय राऊतांचा चढला पारा
4

Sanjay Raut Press Confernce : निवडणुकीमध्ये पैशांची गारपीट…! तेच मशीन सेटिंग अन् तोच आकडा; संजय राऊतांचा चढला पारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.