Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 13 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pandharpur: पंढरपुरात भाविकांचा महापूर! व्हीआयपी दर्शन पूर्णपणे बंद, दर्शन रांगेत घुसखोरी करणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल

पंढरपुरात अधिक मासानिमित्त विठ्ठल दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे. सामान्य भाविकांच्या सुलभ दर्शनासाठी व्हीआयपी दर्शन पूर्णपणे बंद करण्यात आले असून दर्शन रांगेत घुसखोरी करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: May 25, 2026 | 05:50 PM
Pandharpur: पंढरपुरात भाविकांचा महापूर! व्हीआयपी दर्शन पूर्णपणे बंद, दर्शन रांगेत घुसखोरी करणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल
Follow Us
Follow Us:

 

  • विठ्ठल दर्शनासाठी पंढरपुरात भाविकांचा महापूर!
  • व्हीआयपी दर्शन पूर्णपणे बंद
  • दर्शन रांगेत घुसखोरी करणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल होणार
पंढरपूर, (वा.): अधिक मासानिमित्त चंद्रभागा स्नान व श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी लाखो भाविक पंढरपूरात दाखल होत आहेत. वाढती गर्दी लक्षात घेऊन दर्शन रांग व मंदिर परिसरात शेडनेट उभारून सावलीची व्यवस्था करण्यात आली असून दर्शन रांग वॉटरप्रूफ करण्यात आली आहे. भाविकांना सुलभ, जलद व शांततेत दर्शन मिळावे यासाठी जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांनी मंदिर प्रशासनाला आवश्यक सूचना दिल्या आहेत. त्यानुसार व्हीआयपी दर्शन पूर्णपणे बंद करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.

दि. १७ मे ते १५ जून या अधिक मास कालावधीत राज्यासह देशभरातून मोठ्या प्रमाणात भाविक श्रीक्षेत्र पंढरपूर येथे येत आहेत. दर्शन रांगांमध्ये होणारी गर्दी लक्षात घेऊन प्रशासनाने विविध उपाययोजना राबविल्या आहेत. उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी पंढरपूर विभाग यांनी शासन निर्णय व मार्गदर्शक सूचनांनुसार दर्शन रांगांचे काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश पोलीस व मंदिर प्रशासनाला दिले आहेत. भाविकांना अन्य मार्गाने किंवा नियमबाह्य पद्धतीने दर्शन देऊ नये, असे स्पष्ट आदेश प्रशासनाने दिले आहेत.

चंद्रभागेच्या पवित्र पात्रात दोन बेवारस मृतदेह; मंदिर समिती आणि पालिकेचा सुस्त कारभार चव्हाट्यावर!

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ (२) अन्वये दर्शन रांगांमध्ये घुसखोरी करणाऱ्यांवर प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. काही व्यक्तींकडून रांगांमध्ये घुसून गोंधळ निर्माण होत असल्याच्या तक्रारींनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. व्हीआयपी दर्शनामुळे सामान्य भाविकांना तासन्‌तास प्रतीक्षा करावी लागत असल्याने ती व्यवस्थाही बंद करण्यात आली आहे. दर्शन रांगांमध्ये घुसखोरी करणारे, नियमांचे उल्लंघन करणारे अथवा भाविकांना त्रास देणाऱ्या व्यक्तींविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती, पोलीस प्रशासन व महसूल प्रशासन यांच्या समन्वयातून भाविकांना सुरक्षित, शिस्तबद्ध व सुलभ दर्शन मिळावे यासाठी व्यापक नियोजन करण्यात आले आहे.

दर्शनाची वेळ पाहूनच रांगेत उभे राहा

आषाढी व कार्तिकी यात्रेप्रमाणे अधिक मासात २४ तास दर्शन सुरू नसते. अधिक मास कालावधीत दररोज सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत दर्शन व्यवस्था उपलब्ध आहे. दर्शन रांगेचे प्रवेशद्वार रात्री १० वाजता बंद केले जाते.रात्री १२ ते पहाटे ४ या वेळेत श्रींची विश्रांती असते, तर पहाटे ४ ते ५ या वेळेत काकड आरती व नित्यपूजा होत असल्याने दर्शन बंद राहते. दर्शन बंद असतानाही अनेक भाविक रांगेत उभे राहत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे गैरसोय टाळण्यासाठी भाविकांनी दर्शनाच्या वेळेची माहिती घेऊनच रांगेत प्रवेश करावा, असे आवाहन कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी केले आहे.

पंढरपूरचा कायापालट होणार! ४१५० कोटींच्या विकास आराखड्याला मान्यता; ३० महिन्यांत काम पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

Web Title: Pandharpur vitthal temple vip darshan closed for adhik maas strict action against queue jumping

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 25, 2026 | 05:48 PM

Topics:  

  • pandharpur
  • pandharpur temple

संबंधित बातम्या

माऊलीच्या चरणी लीन महाराष्ट्राच्या लाडक्या नृत्यांगना! भक्तांच्या सेवेत रंगली गौतमी पाटील, राधानेही धरली पंढरीची वाट
1

माऊलीच्या चरणी लीन महाराष्ट्राच्या लाडक्या नृत्यांगना! भक्तांच्या सेवेत रंगली गौतमी पाटील, राधानेही धरली पंढरीची वाट

पंढरीच्या वारीवर AIचा करडा पहारा; ड्रोन, अँटी-ड्रोन गन अन् फेस रिकग्निशनने अभेद्य सुरक्षा कवच
2

पंढरीच्या वारीवर AIचा करडा पहारा; ड्रोन, अँटी-ड्रोन गन अन् फेस रिकग्निशनने अभेद्य सुरक्षा कवच

राज्य शासनाचा ऐतिहासिक निर्णय; प्रशासकीय रचना, संचालक मंडळ आणि भागधारकांना मंजुरी, वारकरी सेवेला मिळणार नवे बळ
3

राज्य शासनाचा ऐतिहासिक निर्णय; प्रशासकीय रचना, संचालक मंडळ आणि भागधारकांना मंजुरी, वारकरी सेवेला मिळणार नवे बळ

गोमंतकीय वारकऱ्यांसाठी मोठी बातमी! पंढरपुरात उभारणार ‘गोवा विठ्ठल-रुक्मिणी भवन’; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची घोषणा
4

गोमंतकीय वारकऱ्यांसाठी मोठी बातमी! पंढरपुरात उभारणार ‘गोवा विठ्ठल-रुक्मिणी भवन’; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.