Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचं निधन; हजारोंच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार

काँग्रेसचे दिवंगत नेते डॉ. पतंगराव कदम यांची कन्या भारती लाड (वय ५३) यांचे निधन झाले आहे. सोमवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 28, 2025 | 05:31 PM
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचं निधन; हजारोंच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार

पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचं निधन; हजारोंच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार

Follow Us
Close
Follow Us:

पलूस : कुंडल ( ता. पलूस ) रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक महेंद्र लाड यांच्या पत्नी भारती महेंद्र लाड ( वय ५३ ) यांचे पुणे येथे उपचारदरम्यान निधन झाले आहे. हजारो जणांच्या उपस्थित साश्रुनयनांनी अखेर निरोप देण्यात आला. पुत्र ऋषिकेश व रोहन लाड यांनी मुखाग्नी दिला. यावेळी उपस्थितांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या.

जिच्या पावलांनी डॉ. पतंगराव कदम शिक्षणमहर्षी म्हणून घडले, जिच्यामुळे पतंगरावांनी आपल्या सगळ्या संस्थांना ‘भारती’ नाव दिले, अशा भारतीताई लाड यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. काँग्रेसचे दिवंगत नेते आणि माजी वनमंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या कन्या , भारती लाड यांचा जन्म १८ जुलै १९७२ रोजी सोनसळ‌ ( ता. कडेगांव ) येथे झाला. डॉ. पतंगराव कदम यांच्या संघर्षाचा काळ भारतीताईंनी अतिशय जवळून पाहिला होता. त्यामुळे पुढे डॉ. पतंगराव कदम यांनी त्यांच्याच नावे सर्व संस्थांचे जाळे उभे केले. त्यामुळे भारती संकुल आज डौलाने विद्यादानाचे काम करत आहे.

घरात राजकीय आणि सामाजिक वातावरण असले तरी भारती या अतिशय साध्या आणि सामान्य लोकांत मिळून मिसळून असत. त्यांचा विवाह ३ मे १९९३ रोजी कुंडल (ता. पलूस) येथील सामाजिक कार्यकर्ते आणि उद्योजक असलेले महेंद्र लाड यांच्याशी झाला. जवळच्याच पाहुण्यांतच लग्न झाल्याने त्या इथेही लगेच रुळल्या. त्यांच्या प्रयत्नातून भारती शुगर, डॉ. पतंगराव कदम विद्या संकुल अशा अनेक संस्थांचे जाळे या परिसरात उभे राहिले आहे.

भारती यांनी महिलांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी आणि त्यांना हक्काचे व्यासपीठ उभे करून देण्यासाठी मोठे प्रयत्न केले. महिलांच्या अडीअडचणी सोडवण्यात त्या नेहमी अग्रेसर असत. महेंद्र लाड यांच्यावर जिल्हा बँकेचे संचालक आणि रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष पद अशी जबाबदारी आल्याने गावगाडा आणि महिला सबलीकरणासाठी त्या प्रयत्नशील राहिल्या. भारती आणि महेंद्र लाड यांना ऋषिकेश आणि रोहन ही दोन मुलं. ऋषिकेश उद्योग व्यवसाय बघतात तर रोहन राजकारण आणि समाजकारणात वडिलांना हातभार लावतात.

भारती यांना १४ एप्रिल रोजी चक्कर आल्यासारखे झाले. सांगली येथील भारती हॉस्पिटलमध्ये त्यांना नेण्यात आले. तिथे त्यांच्यावर उपचार करताना डॉक्टरांनी तातडीने पुण्याला हलवण्याचा निर्णय घेतला. सांगलीतून हेलिकॉप्टरने पुण्याच्या भारती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांची किडनी निकामी झाल्याचे सांगण्यात आले असताना डॉक्टरांनी अत्युच्च उपचार सुरूच ठेवले होते. परंतु शक्य ते सगळे प्रयत्न करुनही २८ एप्रिल रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. कुंडल येथील निवासस्थानी सकाळी पार्थिव आणण्यात आले. त्यावेळी उपस्थितांना अश्रु अनावर झाले.

यावेळी आमदार डॉ. विश्वजीत कदम, आमदार अरुण लाड, जेष्ठ नेते, माजी आमदार मोहनराव कदम, माजी मंत्री बाळासाहेब पाटील, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, जिल्हा बँकेचे संचालक अमोल बाबर, क्रांती कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड, विराज नाईक , संचालक रघुनाथ कदम, युवा नेते जितेश कदम, राजेंद्र लाड, दिग्विजय कदम यांच्यासह जिल्ह्यातील कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Pantagarao kadams daughter bharti lad passes away in pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 28, 2025 | 05:31 PM

Topics:  

  • Congress
  • Dr. Vishwajeet Kadam
  • maharashtra
  • pune news
  • sangli news

संबंधित बातम्या

Satara News: मतचोरीचे वादळ महाराष्ट्रापर्यंत; मतदार याद्यांमधील बोगस नावांवरून सातऱ्यात काँग्रेसचे भाजपवर गंभीर आरोप
1

Satara News: मतचोरीचे वादळ महाराष्ट्रापर्यंत; मतदार याद्यांमधील बोगस नावांवरून सातऱ्यात काँग्रेसचे भाजपवर गंभीर आरोप

Maharashtra 1st Conclave : महाराष्ट्र ‘ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था’ बनू शकेल का? मुख्यमंत्र्यांनी सांगितला प्लॅन? वाचा सविस्तर
2

Maharashtra 1st Conclave : महाराष्ट्र ‘ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था’ बनू शकेल का? मुख्यमंत्र्यांनी सांगितला प्लॅन? वाचा सविस्तर

महाराष्ट्र $1.5 ट्रिलियन इकॉनमीच्या मार्गावर;  पॉवर-पॅक MH 1st Conclave 2025 साठी मंच सज्ज
3

महाराष्ट्र $1.5 ट्रिलियन इकॉनमीच्या मार्गावर; पॉवर-पॅक MH 1st Conclave 2025 साठी मंच सज्ज

Pune human skeleton on road : भररस्त्यामध्ये आढळला मानवी सांगाडा; पुणेकर भयभीत तर पोलिसांची उडाली धांदल, नेमकं खरं काय?
4

Pune human skeleton on road : भररस्त्यामध्ये आढळला मानवी सांगाडा; पुणेकर भयभीत तर पोलिसांची उडाली धांदल, नेमकं खरं काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.