
हळवा क्षण! अजित दादाचं जॅकेट अन् आईची उपस्थिती..., पार्थ पवार यांनी घेतली राज्यसभा सदस्यपदाची शपथ
बारामती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा आजचा अखेर दिवस असल्याने उपमुख्यमंत्री पवार काँग्रेसच्या नेत्यांची भेट घेणार का? बारामतीची निवडणूक बिनविरोध होणार का? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
Congress vs Parth Pawar : कृतघ्न मुलगा अन् कुटुंबाच्या पूर्वपुण्याईवर …
येत्या २४ तारखेला बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघांची पोटनिवडणूक पार पडणार असून सत्ताधारी महायुतीकडून बिनविरोध निवडणूकीचे प्रयत्न सुरू आहेत. बारामती निवडणुकीसाठी काँग्रेसचे आकाश मोरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.मोरे यांनी उमेदवारी अर्ज माघारी घ्यावा, असा सूर सत्ताधाऱ्यांकडून लावण्यात आला आहे. या संदर्भात काँग्रेसने अद्याप कोणतीही भूमिका घेतलेली नाही, तसेच महाआघाडीच्या कोणत्याही नेत्याने काँग्रेस नेत्यांशी संपर्क साधलेला नाही.बारामती पोटनिवडणुकीत अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे.
दरम्यान, पार्थ पवार यांच्या शपथविधी सोहळ्यानिमित्त दिल्लीतील राष्ट्रवादीकडून स्वागत आणि अभिनंदनाचे बॅनर लावण्यात आले आहेत. दिल्लीतल्या अनेक चौकात पार्थ पवार यांना बॅनर लावून राष्ट्रवादी युवक आघाडीकडून शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
पार्थ पवार यांनी राज्यसभा सदस्यपदाची शपथ घेऊन राष्ट्रीय राजकारणात औपचारिक प्रवेश केला. संसद भवनात झालेल्या शपथविधी सोहळ्यात त्यांनी संविधानाची निष्ठा राखण्याची प्रतिज्ञा केली. पार्थ पवार हे अजित पवार यांचे पुत्र असून Nationalist Congress Party (NCP) पक्षाचे आहेत.राज्यसभेत त्यांची निवड ही पक्षाच्या धोरणात्मक निर्णयाचा भाग मानली जात आहे.
याआधीही पार्थ पवार यांनी लोकसभा निवडणूक लढवली होती, मात्र त्यांना यश मिळाले नव्हते. तरीही पक्ष संघटनेत त्यांची सक्रिय भूमिका कायम राहिली. राज्यसभेच्या माध्यमातून आता त्यांना राष्ट्रीय स्तरावर काम करण्याची संधी मिळणार आहे. राज्यसभेतील त्यांच्या नियुक्तीमुळे तरुण नेतृत्वाला प्रोत्साहन मिळेल, तसेच महाराष्ट्रातील प्रश्नांना राष्ट्रीय पातळीवर मांडण्याची संधी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Baramati Politics: ‘आत्या म्हणून जे सांगायचे ते घरात सांगेन!’ पार्थ …