Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 18 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोण होणार ‘सोमेश्वर’चा चेअरमन? ‘ही’ नावे चर्चेत; सुनेत्रा पवार यांच्या निर्णयाकडे लक्ष

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत ‘श्री सोमेश्वर विकासपुरुष अजितदादा पवार विकास पॅनेल’चे सर्व २१ उमेदवार मोठ्या फरकाने विजयी झाले आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 18, 2026 | 12:30 AM
कोण होणार ‘सोमेश्वर’चा चेअरमन? 'ही' नावे चर्चेत; सुनेत्रा पवार यांच्या निर्णयाकडे लक्ष

कोण होणार ‘सोमेश्वर’चा चेअरमन? 'ही' नावे चर्चेत; सुनेत्रा पवार यांच्या निर्णयाकडे लक्ष

Follow Us
Follow Us:
  • कोण होणार ‘सोमेश्वर’चा चेअरमन?
  • सुनेत्रा पवार यांच्या निर्णयाकडे लक्ष
  • या नावाची जोरदार चर्चा
सोमेश्वरनगर : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत ‘श्री सोमेश्वर विकासपुरुष अजितदादा पवार विकास पॅनेल’चे सर्व २१ उमेदवार मोठ्या फरकाने विजयी झाले आहेत. या विजयानंतर आता कारखान्याच्या अध्यक्षपदी कोणाची निवड होणार, याकडे पुणे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. माजी अध्यक्ष राजवर्धन शिंदे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रमोद काकडे आणि नवनाथ उद्योग समूहाचे प्रमुख संग्राम सोरटे यांची नावे आघाडीवर असल्याची चर्चा आहे.

 

कारखान्याचे माजी अध्यक्ष राजवर्धन शिंदे यांना सहकार क्षेत्रातील कामाचा अनुभव आहे. त्यांनी यापूर्वी कारखान्याचे अध्यक्षपद भूषवले असून, दिवंगत अजित पवार यांच्या सूचनेनुसार बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले आहे. बारामती तालुका दूध उत्पादक संघातील अनुभव, कारखाना कार्यक्षेत्रातील जनसंपर्क आणि सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची शैली या त्यांच्या जमेच्या बाजू मानल्या जातात. त्यामुळे अध्यक्षपदासाठी त्यांच्या नावाला प्राधान्य मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

प्रमोद काकडे यांचीही चर्चा

जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीचे माजी सभापती प्रमोद काकडे यांचे नावही अध्यक्षपदासाठी चर्चेत आहे. त्यांना प्रशासकीय कामाचा अनुभव असून, त्यांनी यापूर्वी कारखान्याचे संचालक म्हणूनही काम केले आहे. प्रगतशील बागायतदार असलेल्या काकडे यांचा शेतकरी आणि सभासदांशी थेट संपर्क आहे. त्यामुळे त्यांचा अनुभव आणि स्थानिक पातळीवरील प्रभाव अध्यक्षपदाच्या निवडीत महत्त्वाचा ठरू शकतो.

संग्राम सोरटे यांना संधी मिळणार?

नवनाथ उद्योग समूहाचे प्रमुख संग्राम सोरटे हेही अध्यक्षपदाच्या शर्यतीत असल्याची चर्चा आहे. विविध सहकारी संस्थांमधील कामाचा अनुभव, उद्योग समूहाच्या माध्यमातून रोजगारनिर्मिती, स्वच्छ प्रतिमा आणि मोठा जनसंपर्क ही त्यांची बलस्थाने मानली जातात. ब वर्ग संस्था प्रतिनिधी मतदारसंघातून त्यांनी सलग दोन निवडणुकांत विजय मिळवला आहे.

बारामती तालुक्यात धनगर समाजाची मोठी लोकसंख्या असून, कारखान्याच्या स्थापनेपासून या समाजाला अध्यक्षपदाची संधी मिळाली नसल्याचा मुद्दा चर्चेत आहे. त्यामुळे सोरटे यांना संधी दिल्यास सामाजिक प्रतिनिधित्वाच्या दृष्टीने सकारात्मक संदेश जाऊ शकतो, असे मत व्यक्त केले जात आहे.

सुनेत्रा पवार यांच्या निर्णयाकडे लक्ष

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी प्रचाराच्या शुभारंभाच्या सभेत अध्यक्ष निवडताना सर्वांना विचारात घेतले जाईल, असे सूचक वक्तव्य केले होते. खासदार पार्थ पवार यांनीही कारखान्याच्या कामकाजात लक्ष घालण्यास सुरुवात केली आहे. आगामी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची आणि २०२९ मधील विधानसभा निवडणूक लक्षात घेता, अध्यक्ष निवडताना राजकीय व सामाजिक समीकरणांचा विचार होण्याची शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा : भंगार चोरण्यासाठी निघाले अन् बंगल्यातील सोन्यावर मारला डल्ला! तळवडेतील चोरीप्रकरणी तिघांना अटक

पारंपरिक गटांबाहेरील गावाला संधी मिळणार?

कारखान्याच्या स्थापनेपासून गट क्रमांक १ मधील निंबूत-खंडाळा आणि गट क्रमांक २ मधील मुरूम-वाल्हे या गटांतील व्यक्तींनाच अध्यक्षपदाची संधी मिळाल्याची चर्चा आहे. त्यामुळे यंदा या पारंपरिक गटांबाहेरील गावाला संधी मिळणार का, याबाबत सभासदांमध्ये उत्सुकता आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीत किती उमेदवार विजयी झाले?

    Ans: श्री सोमेश्वर विकासपुरुष अजितदादा पवार विकास पॅनेलचे सर्व २१ उमेदवार विजयी झाले.

  • Que: कारखान्याच्या अध्यक्षपदासाठी कोणाची नावे चर्चेत आहेत?

    Ans: राजवर्धन शिंदे, प्रमोद काकडे आणि संग्राम सोरटे यांची नावे अध्यक्षपदासाठी चर्चेत आहेत.

  • Que: राजवर्धन शिंदे यांच्या नावाची चर्चा का आहे?

    Ans: त्यांना सहकार क्षेत्रातील अनुभव असून, त्यांनी यापूर्वी सोमेश्वर साखर कारखान्याचे अध्यक्षपद भूषवले आहे.

Web Title: Sunetra pawar has achieved a major success in the someshwar cooperative sugar factory election

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 18, 2026 | 12:30 AM

Topics:  

  • parth pawar
  • Someshwar Sugar Factory
  • Sunetra Pawar

संबंधित बातम्या

Beed News : बीडमध्ये दुष्काळाचे संकट गडद; २२५ टँकर्स सुरू, सुनेत्रा पवारांनी दिले महत्त्वाचे निर्देश
1

Beed News : बीडमध्ये दुष्काळाचे संकट गडद; २२५ टँकर्स सुरू, सुनेत्रा पवारांनी दिले महत्त्वाचे निर्देश

Rohit Pawar : ‘सुनेत्रा पवारांना अर्थमंत्रिपद मिळणार नाही’, रोहित पवारांच्या विधानाने राजकारणात खळबळ
2

Rohit Pawar : ‘सुनेत्रा पवारांना अर्थमंत्रिपद मिळणार नाही’, रोहित पवारांच्या विधानाने राजकारणात खळबळ

Someshwar Sugar Factory News: ‘सोमेश्वर’चा भोंगा वाजला!; दुष्काळाच्या सावटात ६५ व्या गाळप हंगामास सुरुवात
3

Someshwar Sugar Factory News: ‘सोमेश्वर’चा भोंगा वाजला!; दुष्काळाच्या सावटात ६५ व्या गाळप हंगामास सुरुवात

अजितदादांच्या ‘ग्राउंडवर्क’चा राष्ट्रवादीला मोठा फायदा! सोमेश्वरच्या निवडणुकीत विरोधकांना रोखण्यात सुनेत्रा पवारांना यश
4

अजितदादांच्या ‘ग्राउंडवर्क’चा राष्ट्रवादीला मोठा फायदा! सोमेश्वरच्या निवडणुकीत विरोधकांना रोखण्यात सुनेत्रा पवारांना यश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.