Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जणगणना-२०२७ मध्ये सहभागी व्हा; महसूल शिबिरांत ६,६१० प्रकरणे निकाली : Yogesh Kumbhejkar यांचे आवाहन

Yogesh Kumbhejkar यांनी नागरिकांनी विविध शासकीय योजनांचा लाभ घ्यावा तसेच जणगणना-२०२७ मध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: May 10, 2026 | 06:15 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • कारंजा तालुक्यात सर्वाधिक २ हजार ३४३ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला.
  • ५५७ आठ-अ उतारे तसेच ३ हजार २२२ विविध प्रकारची प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली.
  • शिबिरांमधून एकूण ६ हजार ६१० प्रकरणे निकाली काढण्यात आली.
Washim News : Yogesh Kumbhejkar यांनी नागरिकांनी विविध शासकीय योजनांचा अधिकाधिक लाभ घ्यावा तसेच जणगणना-२०२७ मध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरांतर्गत वाशिम जिल्ह्यातील सहाही तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रकरणांचा निपटारा करण्यात आला असून नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरांमधून एकूण ६ हजार ६१० प्रकरणे निकाली काढण्यात आली. महसूल अभियानांतर्गत ६४९ फेरफार निकाली काढण्यात आले तर ७/१२ दुरुस्तीसाठी २६३ अर्ज स्वीकारण्यात आले. याशिवाय नागरिकांना १ हजार ४४ डिजिटल ७/१२ उतारे, ५५७ आठ-अ उतारे तसेच ३ हजार २२२ विविध प्रकारची प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली.

MSRTC च्या NCMC कार्ड ला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; पुण्यात महिनाभरात १ लाखांहून अधिक अर्ज

जिल्हाधिकारी Yogesh Kumbhejkar यांनी वाशिम व रिसोड तालुक्यांना भेट देत जणगणना-२०२७ ही राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाची प्रक्रिया असल्याचे सांगितले. १५ मेपर्यंत स्वगणना प्रक्रिया सुरू असून नागरिकांनी त्यात जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच १६ मे ते १४ जून या कालावधीत होणाऱ्या घरगणनेसाठी घरी येणाऱ्या प्रगणकांना आवश्यक माहिती देऊन सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले. या शिबिरांमुळे नागरिकांना विविध कार्यालयांच्या फेऱ्या मारण्याची गरज कमी झाल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे. महसूल विभागाच्या या विशेष उपक्रमामुळे अनेक नागरिकांना विविध सेवांचा लाभ एकाच ठिकाणी मिळत असून प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

धाराशिवशी नाळ असलेल्या भूमिपुत्राचा जागतिक सन्मान; डॉ. अनिलकुमार गायकवाड यांची IRF इंडिया चॅप्टरच्या अध्यक्षपदी एकमताने निवड

तालुकानिहाय आकडेवारीनुसार कारंजा तालुक्यात सर्वाधिक २ हजार ३४३ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. मानोरा तालुक्यात १ हजार ३१३, मालेगावमध्ये १ हजार १५३, रिसोडमध्ये ८७९, मंगरूळपीरमध्ये ५८४ तर वाशिम तालुक्यात ३३८ प्रकरणे निकाली काढण्यात आली. तसेच महसूल अभियानांतर्गत एक खिडकी व्यवस्थेद्वारे अनेक अर्जांचा निपटारा करण्यात आला असून विविध प्रमाणपत्रांचे तातडीने वितरण करण्यात आले. या शिबिरांमुळे नागरिकांना महसुली सेवा जलदगतीने उपलब्ध होत असून शासकीय योजनांचा लाभ मिळवणे अधिक सुलभ झाले आहे.

Web Title: Participate in census 2027 6610 cases resolved at revenue camps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 10, 2026 | 06:14 PM

Topics:  

  • Buldhana
  • Washim

संबंधित बातम्या

Buldhana News: मेहकरमधील ४०० वर्षांचा ऐतिहासिक ‘कंचनी महाल’ दुर्लक्षित, संवर्धनाची मागणी
1

Buldhana News: मेहकरमधील ४०० वर्षांचा ऐतिहासिक ‘कंचनी महाल’ दुर्लक्षित, संवर्धनाची मागणी

Buldhana News: बुलढाणा जिल्हा परिषदेतील प्रतिनियुक्त्या केल्या रद्द; वर्षानुवर्षे ठाण मांडणाऱ्यांना सीईओ गुलाबराव खरात यांचा दणका
2

Buldhana News: बुलढाणा जिल्हा परिषदेतील प्रतिनियुक्त्या केल्या रद्द; वर्षानुवर्षे ठाण मांडणाऱ्यांना सीईओ गुलाबराव खरात यांचा दणका

Washim crime: अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध, आंतरजातीय विवाहाला घरच्यांचा विरोध; प्रेमीयुगलाने मोर्णा तलावात उडी घेत संपवलं जीवन
3

Washim crime: अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध, आंतरजातीय विवाहाला घरच्यांचा विरोध; प्रेमीयुगलाने मोर्णा तलावात उडी घेत संपवलं जीवन

हल्द्वानीतील घटनेचा बुलढाण्यात निषेध; भीमशक्ती संघटनेचे मुंडन आंदोलन
4

हल्द्वानीतील घटनेचा बुलढाण्यात निषेध; भीमशक्ती संघटनेचे मुंडन आंदोलन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.