Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Amravati News: विमानतळावर मुलभूत सुविधांचा बोजवारा, उड्डाणे विलंबाने होत असल्याने प्रवासी त्रस्त

अमरावतीत विमानतळावरील मूलभूत सुविधांच्या अभावामुळे प्रवाशांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागतोय.विमानतळ प्रशासनाविरोधात प्रवाशांचा प्रचंड रोष वाढत असताना पाहायला मिळत आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Nov 19, 2025 | 11:52 AM
विमानतळावर मुलभूत सुविधांचा बोजवारा, उड्डाणे विलंबाने होत असल्याने प्रवासी त्रस्त (फोटो सौजन्य-X)

विमानतळावर मुलभूत सुविधांचा बोजवारा, उड्डाणे विलंबाने होत असल्याने प्रवासी त्रस्त (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:
  • विमानतळावरील मूलभूत सुविधांच्या अभावामुळे प्रवाशांची गैरसो
  • अन्न पेय सुविधेचा मोठा अभाव
  • इंटरनेटवर वेळापत्रक नाही, संपर्क क्रमांकही गायब
अमरावती : अमरावतीत ऑक्टोबरपासून बेलोरा विमानतळावर आठवड्यातून पाच दिवस मुंबई अमरावती-मुंबई अशी उड्डाणे नियमित सुरू आहेत. तरी विमानतळावरील मूलभूत सुविधांच्या अभावामुळे प्रवाशांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागतोय. तातडीच्या कामांसाठी मुंबईला जाणाऱ्या नागरिकांकडून या सेवेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असतानाच विमानतळ प्रशासनाविरोधात प्रवाशांचा प्रचंड रोष वाढत असताना पाहायला मिळत आहे.

अलायन्स एअरच्या जुन्या वेळापत्रकानुसार अमरावती-मुंबई उड्डाण संध्याकाळी ४:५० वाजता सुटत होते आणि ६:३५ वाजता मुंबईत पोहोचत होते. मात्र, ऑक्टोबर २०२५ पासून उड्डाणे सकाळच्या वेळेत हलवण्यात आली आहेत. नव्या वेळापत्रकानुसार मुंबई-अमरावती उड्डाण सकाळी ७:०५ वाजता सुटते आणि ८:५० वाजता अमरावतीत उत्तरते. तेथून परतीचे उड्डाण ९:१५ वाजता सुटून ११:०० वाजता मुंबईत पोहोचते. तथापि, सोमवार, १७नोव्हेंबर रोजी मुंबईहून अमरावतीला येणारे विमान तब्बल १ तास ३० मिनिटे उशिरा म्हणजे सकाळी १०:२० वाजता उतरले. परतीचे उड्डाण १०:४५ वाजता निघाले.

Amravati News : शेकोट्या पेटल्या; तापमानात घसरण! चिखलदऱ्यात धुक्याची चादर; ग्रामीण भागात वाढला थंडीचा कडाका

उड्डाण विलंबाची कोणतीही स्पष्ट माहिती उपलब्ध नसल्याने विमानतळावर प्रतीक्षा करणाऱ्या प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले. बेलोरा विमानतळ शहरापासून सुमारे १५ कि.मी. अंतरावर आहे. चौकशी केंद्राचा अभाव, कर्मचाऱ्यांकडून दिली जाणारी अपुरी किंवा चुकीची माहिती यामुळे प्रवाशांची गैरसोय वाढत आहे. तीव्र थंडी असूनही प्रवाशांनी तब्बल १ तास ३० मिनिटे विमानाची वाट पाहिली.

अन्न पेय सुविधेचा मोठा अभाव

कापूस व्यापारी शिवकुमार अग्रवाल यांनी सांगितले की, त्यांच्या सोबत मुले, महिला, वृद्ध आणि मधुमेही रुग्ण होते. वारंवार होणाऱ्या विलंबामुळे पॅकेज्ड फूड, बिस्किटे, ड्राय स्नॅक्स, चहा, कॉफी आणि कोल्ड ड्रिंक्स यांसारख्या वस्तू उपलब्ध नसणे ही मोठी समस्या ठरते. विमानतळावर फक्त आरओचे पिण्याचे पाणी उपलब्ध असून अनेक प्रवासी बाटलीबंद पाणी पसंत करतात, त्यामुळे आरओ पाणी पिण्यास ते कचरतात.

इंटरनेटवर वेळापत्रक नाही, संपर्क क्रमांकही गायब

प्रवाशी इंटरनेटवर वेळापत्रक पाहण्याचा प्रयत्न करतात तेव्हा त्यांना कोणतीही माहिती उपलब्ध होत नाही. तसेच विमानतळ प्रशासनाशी संपर्क साधण्यासाठी कायमस्वरूपी क्रमांक नसल्याने प्रवासापूर्वीची माहिती मिळवणे कठीण होते.
प्रवाशांसाठी विमानतळ प्रशासनाने तातडीने अन्न-पेय, प्रवासी वाहतूक, चौकशी केंद्र, अचूक माहिती व्यवस्था आणि ऑनलाइन वेळापत्रक यांसारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध कराव्यात, अशी मागणी केली आहे.

रुग्ण व वृद्धांसाठी वाहतूक सुविधा नाही

अनेक विमानतळांवर उपलब्ध असणाऱ्या इलेट्रिक कार्ट किंवा बससारख्या सुविधांचा बेलोरा विमानतळावर पूर्णतः अभाव आहे. त्यामुळे रुग्ण व वृद्धांना प्रवेशद्वारापासून विमानापर्यंत चालत जाते लागते. हे अत्यंत गैरसोयीचे असल्याचे प्रवाशांचे मत आहे.

घरांवर ७८ मेगावॅट वीज निर्मिती, अमरावती जिल्ह्यात १९ हजार ३४९ ग्राहकांनी घेतला सूर्यघराचा लाभ

Web Title: Passengers troubled as basic facilities at the amravati airport are lacking and flights are being delayed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 19, 2025 | 11:52 AM

Topics:  

  • airport
  • amravati
  • maharashtra

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis : बिबट्याचे मानवावरील हल्ले ‘राज्य आपत्ती’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
1

Devendra Fadnavis : बिबट्याचे मानवावरील हल्ले ‘राज्य आपत्ती’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश

Supreme Court: चेक बाउन्स प्रकरणांवर सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल! व्यापारी कर्मचारींसह सामान्य नागरिकांनी दिलासा
2

Supreme Court: चेक बाउन्स प्रकरणांवर सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल! व्यापारी कर्मचारींसह सामान्य नागरिकांनी दिलासा

Maharashtra Clean Energy Mission : महाराष्ट्र स्वच्छ ऊर्जेत देशाचे नेतृत्व करणार—अणुऊर्जेत ऐतिहासिक पाऊल!
3

Maharashtra Clean Energy Mission : महाराष्ट्र स्वच्छ ऊर्जेत देशाचे नेतृत्व करणार—अणुऊर्जेत ऐतिहासिक पाऊल!

महाराष्ट्रात वाघ आणि बिबट्यांचे हल्ले सुरूच, ३ वर्षांत १७,०४४ जणांचा मृत्यू, वाघांच्या मृत्यूची आकडेवारी चिंताजनक
4

महाराष्ट्रात वाघ आणि बिबट्यांचे हल्ले सुरूच, ३ वर्षांत १७,०४४ जणांचा मृत्यू, वाघांच्या मृत्यूची आकडेवारी चिंताजनक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.