मुंबई विमानतळ २० नोव्हेंबरला ६ तास बंद (Photo Credit - X)
मुंबई, ३ नोव्हेंबर २०२५: जगातील सर्वात वर्दळीचे सिंगल-रनवे विमानतळ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (CSMIA) चे ऑपरेटर असलेल्या मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड (MIAL) ने सुरक्षित, सुनिश्चित आणि कार्यक्षम कार्यसंचालन कायम ठेवण्याप्रती आपली कटिबद्धता सुरू ठेवली आहे. सर्वसमावेशक वार्षिक मान्सूननंतरच्या देखरेख योजनेचा भाग म्हणून, २० नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत आरडब्ल्यूवाय ०९/२७ आणि आरडब्ल्यूवाय १४/३२ हे दोन्ही क्रॉस रनवे देखरेख आणि दुरुस्तीच्या कामासाठी तात्पुरते बंद राहणार आहेत.
जागतिक विमान वाहतूक मानकांचे पालन, सुरक्षितता आणि विश्वासार्हता सुनिश्चित करण्यासाठी नियोजित बंदचे नियोजन करण्यात आले आहे. विमानचालकांना सूचना (NOTAM) आगाऊ जारी करण्यात आली होती, ज्यामुळे एअरलाईन्स आणि इतर भागधारकांना त्यानुसार फ्लाईट वेळापत्रक (Flight Schedule) आणि मनुष्यबळ नियोजन योग्यरित्या समायोजित करता आले आहे. या सक्रिय संवादामुळे कोणत्याही फ्लाईट्सवर कोणताही परिणाम होणार नाही आणि प्रवाशांची गैरसोय होणार नाही.
देखरेखीमध्ये तपशीलवार तपासणी, पृष्ठभागाची दुरुस्ती, तसेच रनवेवरील प्रकाशयोजना, खुणा (Markings) आणि ड्रेनेज सिस्टिमचे तांत्रिक मूल्यांकन यांचा समावेश असेल. मान्सूननंतरची देखरेख सीएसएमआयएच्या वर्षभर चालणाऱ्या ऑपरेशनल सुसज्जता (Operational Readiness) उपक्रमाचा अविभाज्य भाग आहे, जो त्यांच्या ‘सेफ्टी-फर्स्ट’ (Safety-First) दृष्टिकोनाला अधिक दृढ करतो.
१. धावपट्टी कधी बंद राहणार आहे?
२० नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ११:०० वाजल्यापासून सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत (एकूण ६ तास) धावपट्ट्या बंद राहतील.
२. धावपट्टी बंद करण्याचे कारण काय आहे?
धावपट्टी बंद करण्याचे कारण वार्षिक मान्सूननंतरची सर्वसमावेशक देखरेख आणि दुरुस्तीची कामे हे आहे. सुरक्षितता आणि कार्यक्षमतेचे जागतिक मानक कायम ठेवण्यासाठी हे आवश्यक आहे.
३. कोणत्या धावपट्ट्या बंद राहतील?
आरडब्ल्यूवाय ०९/२७ आणि आरडब्ल्यूवाय १४/३२ या दोन्ही क्रॉस रनवे तात्पुरत्या काळासाठी बंद राहतील.
४. या बंदमुळे फ्लाईट्सवर परिणाम होईल का?
नाही. MIAL ने एअरलाईन्स आणि सर्व भागधारकांना सहा महिने आधीच सूचना (NOTAM) दिली होती. त्यामुळे सर्व एअरलाईन्सने त्यांचे वेळापत्रक या वेळेनुसार समायोजित केले आहे.
५. प्रवाशांना काही गैरसोय होणार आहे का?
नाही. वेळेचे अचूक नियोजन केल्यामुळे कोणत्याही फ्लाईटवर थेट परिणाम होणार नाही आणि प्रवाशांची गैरसोय होणार नाही, अशी व्यवस्था MIAL ने केली आहे.
६. देखभालीच्या कामात काय केले जाईल?
कामामध्ये धावपट्टीची तपशीलवार तपासणी, पृष्ठभागाची दुरुस्ती, तसेच रनवेवरील प्रकाशयोजना, खुणा (Markings) आणि ड्रेनेज सिस्टिमचे तांत्रिक मूल्यांकन समाविष्ट आहे.






