शेकोट्या पेटल्या; तापमानात घसरण! चिखलदऱ्यात धुक्याची चादर; ग्रामीण भागात वाढला थंडीचा कडाका (फोटो सौजन्य-ChatGPT)
अमरावती जिल्ह्यात हिवाळ्याचा जोर वाढत असून ग्रामीण भागात थंडीने चांगलाच कहर माजवला आहे. सातपुडा पर्वतरांगांच्या कुशीत वसलेल्या शिरजगाव कसब्यासह परिसरातील गावांमध्ये तापमान झपाट्याने घसरले आहे. गत काही दिवसांपासून रात्रीच्या वेळी थंडी जाणवू लागली असून गुरुवार (दि. ६) रात्रीपासून गारव्याचा प्रभाव आणखी तीव झाला आहे. आकाश निरभ्र झाल्याने उष्णतेचा अंशदेखील कमी झाला असून, पहाटे व रात्री थंडीचा कडाका वाढला आहे. लोकांनी उब मिळवण्यासाठी शेकोट्यांभोवती बसण्यास सुरुवात केली आहे. गावागावांत ठिकठिकाणी अलाव पेटवले जात आहेत. दिवसाढवळ्याही गारवा जाणवत असल्याने नागरिक आवश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळत आहेत. शहरांच्या तुलनेत ग्रामीण भागात पारा अधिक वेगाने घसरत असून रात्रीच्या वेळी दाट दवबिंदू आणि गारठ्याचा अनुभव येत आहे.
थंडीने आपले ‘तेवर’ दाखवायला सुरुवात होताच, उबदार कपड्यांचा बाजार गुलजार झाला आहे. स्वेटर, जंकिट, मफलर, टोपी अशा वस्तूंना मोठी मागणी वाढली आहे. बाजारपेठांमध्ये हंगामी दुकानांची रेलचेल सुरू असून, गावातील साप्ताहिक चाजारातही ऊनी कपड्यांची विक्री वाढली आहे. लीक घराबाहेर पडताना उबदार कपड्यांशिवाय पाऊल टाकत नाहीत. मुले व ज्येष्ठ नागरिक पूर्णपणे स्वेटर आणि शालींनी झाकलेले दिसत आहेत. पेट्यांमध्ये ठेवलेले लोकरी कपडे पुन्हा बाहेर काढले गेले असून, थंडीपासून बचावासाठी प्रत्येकजण सज्ज झालेला दिसतो.
अमरावती जिल्ह्यातील मेळघाट आणि चिखलदरा परिसर पूर्णपणे गारठ्याने वेढला आहे. चिखलदऱ्यात सकाळच्या वेळेस धुक्याची चादर पसरलेली दिसते. त्यामुळे निसर्गरम्य वातावरण अधिकच मनोहारी झाले असून पर्यटकांची संख्या झपाट्याने वाढत आहे.
दरवषीप्रमाणे यंदाही चिखलदऱ्यातील तापमान ७ ते ८ डिग्री सेल्सियसपर्यंत घसरले आहे. राज्यभरातून पर्यटक थंडीचा आनंद घेण्यासाठी चिखलदर्याकडे आकर्षित होत आहेत.
शेतीतही गारव्याचा परिणाम : नुकताच पावसाळा संपल्याने शेतात ओलावा कायम आहे. त्यामुळे वाढत्या थंडीत हा ओलावा अधिक गारठा निर्माण करत असून वातावरणात शीतलतेचा अंश वाढवतो आहे. अनेक शेतकरी रब्बी हंगामातील गहू, हरभरा, मसूर वांस्तरख्या पिकांच्या पेरणीत व्यस्त आहेत.
थंडीच्या या बातावरणामुळे पिकांना लाभदायी स्थिती निर्माण झाली असती, तरी अती थंडीचा परिणाम भाज्यांवर व फुलपिकांवर होऊ नये, यासाठी शेतकरी दक्षता घेत आहेत. एकूणच, अमरावती विलयात हिवाळ्याची चाहूल स्पष्टपणे जाणवू लागली आहे. बडीचा आनंद पर्यटक घेत असले, तरी ग्रामीण भागातील जनजीवनावर तिचा प्रभाव टळकपणे दिसून येत आहे.
मौसमातील बदलाचा परिणाम आता आरोग्यावरही स्पष्ट दिसू लागला आहे. सर्दी, खोकला, ताप, सायनस आणि दमा अशा तक्रारी वाढल्या आहेत. ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दररोज रुग्णसंख्या वाढताना दिसते. डॉक्टरांनी विशेषतः लहान मुलं, गर्भवती महिला आणि वृद्धांनी काळजी पेण्याचे आवाहन केले आहे. थंडीपासून बचावासाठी गरम अन्न, पाणी आणि पुरेसा व्यायाम करण्याचा सल्ला दिला जात आहे.
Ans: पावसाळा संपल्याने शेतात ओलावा कायम आहे. त्यामुळे वाढत्या थंडीत हा ओलावा अधिक गारठा निर्माण करत असून वातावरणात शीतलतेचा अंश वाढवतो आहे.
Ans: सर्दी, खोकला, ताप, सायनस आणि दमा अशा तक्रारी वाढल्या आहेत. ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दररोज रुग्णसंख्या वाढताना दिसते.
Ans: अमरावती जिल्ह्यातील मेळघाट आणि चिखलदरा परिसर पूर्णपणे गारठ्याने वेढला आहे. चिखलदऱ्यात सकाळच्या वेळेस धुक्याची चादर पसरलेली दिसते. त्यामुळे निसर्गरम्य वातावरण अधिकच मनोहारी झाले असून पर्यटकांची संख्या झपाट्याने वाढत आहे.






