दौंड तालुक्यातील पाटस परिसरातील जिल्हा परिषदेच्या इयत्ता पहिली ते चौथी च्या शाळेतील विद्यार्थ्यांना मागील काही दिवसांपासून गाल फुगी आल्याने त्रस्त झाले आहेत. हा संसर्गजन्य रोग दिवसेंदिवस पसरत असल्याने विद्यार्थी व पालकांची चिंता वाढली आहे.
पाटस : दौंड तालुक्यातील पाटस परिसरातील जिल्हा परिषदेच्या इयत्ता पहिली ते चौथी च्या शाळेतील विद्यार्थ्यांना मागील काही दिवसांपासून गाल फुगी आल्याने त्रस्त झाले आहेत. हा संसर्गजन्य रोग दिवसेंदिवस पसरत असल्याने विद्यार्थी व पालकांची चिंता वाढली आहे. दरम्यान, यासंदर्भात प्राथमिक आरोग्य केंद्र चे आरोग्य अधिकारी आणि कर्मचारी याप्रकाराकडे गांभीर्याने घेत नसुन दुर्लक्ष होत आहे.
मागील काही दिवसांपासून पाटस गावठाण व परिसरातील जिल्हा परिषद शाळांमध्ये इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांमध्ये गाल फुगीचा आजार आढळून आला आहे. सुरुवातीला एक दोन विद्यार्थ्यांना येणारी गालफुगी काही दिवसातच विद्यार्थी़ची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. शिक्षकांनी या पालकांना असे विद्यार्थी शाळेत न पाठवता घरी ठेवून योग्य ते उपचार करण्यासाचा सल्ला दिला आहे. मात्र गाल फुगी होत असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ही वाढत चालली असून शिक्षकांची डोकेदुखी वाढली आहे. हा रोग संसर्गजन्य असल्याने तो रोग एकमेकांच्या संपर्कात आल्यावर पसरत असल्याचे निदर्शनास आले आहे.अशी माहिती शिक्षक देत आहेत. आरोग्य विभागाने या प्रकाराकडे गांभीर्याने घेऊन हा रोग आटोक्यात आणण्यासाठी तातडीने शाळांना भेट देऊन योग्य तो औषध उपचार करावेत अशी मागणी शिक्षक व पालक करीत आहेत. दरम्यान, या संदर्भात दौंड तालुका आरोग्य अधिकारी डॉ उज्वला जाधव यांच्या शी संपर्क साधला असता, त्या म्हणाल्या की , तालुक्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शाळांना भेट देऊन सर्व्ह करुन योग्य तो औषध उपचार करावेत असा सुचना दिल्या जातील.
Web Title: Patas students suffer from mumps students parents scared neglected by health department nrab