Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आरोग्य यंत्रणा कोलमडण्याची शक्यता! डॉक्टरांनी दिली संपाची हाक, काय आहे कारण?

महाराष्ट्र शासनाने होमिओपॅथी डॉक्टरांना MMC मध्ये नोंदणी करण्यास मान्यता, आयएमएच्या नेतृत्वाखाली 18 सप्टेंबर रोजी राज्यभरात सर्व डॉक्टर एक दिवसाचा संप करणार. संपादरम्यान आपत्कालीन सेवाही पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 17, 2025 | 06:27 PM
आरोग्य यंत्रणा कोलमडण्याची शक्यता! डॉक्टरांनी दिली संपाची हाक, काय आहे कारण?

आरोग्य यंत्रणा कोलमडण्याची शक्यता! डॉक्टरांनी दिली संपाची हाक, काय आहे कारण?

Follow Us
Close
Follow Us:

कल्याण : महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण आणि औषध द्रव्ये विभागाने ५ सप्टेंबर २०२५ रोजी परिपत्रक जारी करून सीसीएमपी (CCMP) अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या होमिओपॅथिक डॉक्टरांची नोंदणी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल (MMC) च्या स्वतंत्र रजिस्टरमध्ये करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, या निर्णयाचा भारतीय वैद्यकीय संघटना (IMA) महाराष्ट्र राज्याने तीव्र विरोध दर्शविला असून उद्या गुरुवारी 18 सप्टेंबर रोजी राज्यस्तरीय संपाची हाक दिली आहे.

Fire News : आंबिवली गावामधील घराला भीषण आग, घरातील सर्व साहित्य जळून खाक

आयएमएने स्पष्ट केले की, हे डॉक्टर आधीच महाराष्ट्र होमिओपॅथिक कौन्सिलमध्ये नोंदणीकृत आहेत. शासनाने घेतलेला हा निर्णय ११ जुलै २०२४ रोजीच्या स्वतःच्या परिपत्रकाच्या विरोधात असून, यासंदर्भातील खटला माननीय मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित असताना काढलेले हे परिपत्रक कायद्याला धरून नसलेले व न्यायालयाचा अवमान करणारे आहे.

या निर्णयामुळे रुग्णांच्या सुरक्षिततेवर गंभीर धोका निर्माण होईल, आधुनिक वैद्यकीय शिक्षणाचा तसेच व्यवसायाचा दर्जा घसरेल. तसेच राष्ट्रीय वैद्यकीय आयोग (NMC) आणि महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल कायद्याचे उल्लंघन होईल, अशी भूमिका आयएमएने मांडली आहे. तर अपुरे प्रशिक्षण घेतलेले डॉक्टरांकडून रुग्णांवर उपचार म्हणजे थेट त्यांच्या जीवाशी खेळ असल्याची भीतीही आयएमएकडून व्यक्त करण्यात आली आहे.

या पार्श्वभूमीवर ५ सप्टेंबर २०२५ चे परिपत्रक तात्काळ रद्दबातल करावे, माननीय उच्च न्यायालयाच्या अंतिम निकालापर्यंत कोणतीही अंमलबजावणी करू नये आणि आधुनिक वैद्यकशास्त्राचे पावित्र्य राखत रुग्णांची सुरक्षितता सुनिश्चित करावी अशा मागण्या आय एम एकडून करण्यात आल्या आहेत.

तर यासंदर्भात गुरुवारी १८ सप्टेंबर २०२५ रोजी राज्यभरातील सर्व डॉक्टर एक दिवसाचा टोकन संप (Complete Shutdown) करतील. ज्यामध्ये आपत्कालीन सेवाही पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार असल्याची महत्त्वाची माहिती आयएमए कल्याणच्या अध्यक्ष डॉ. सुरेखा ईटकर यांनी दिली आहे. तसेच शासनाने हा निर्णय मागे घेतला नाही तर पुढील आठवड्यात मुंबईतील आझाद मैदानावर भव्य मोर्चा आणि बेमुदत उपोषणही छेडण्याचा इशाराही आयएमएने दिला आहे. तर हा लढा डॉक्टरांचा नसून, रुग्णांच्या सुरक्षिततेसाठी आणि वैद्यकीय व्यवसायाच्या सन्मानासाठी आम्ही लढत असल्याचेही आयएमएने स्पष्ट केले आहे.

आरोग्य सेवेचा बोजवारा उडण्याची शक्यता

आयएमएने खासगी रुग्णालयातील तर एमएसआरडीएने शासकीय रुग्णालयातील आरोग्य सेवा १८ सप्टेंबर रोजी बंद ठेवण्याचा इशारा दिला आहे. तसेच डॉक्टरांच्या अन्य संघटनांनीही त्यांना पाठिंबा दिला आहे. या संघटनांनी १८ सप्टेंबर रोजी संप पुकारलास राज्यातील आरोग्य सेवा कोलमडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Meenatai Thackeray statue : मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर फेकला लाल रंग; शिवसैनिक आक्रमक, वातावरण तापणार?

Web Title: Doctors to go on strike over mmc registration of homeopathy practitioners kalyan news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 17, 2025 | 06:25 PM

Topics:  

  • maharashtra

संबंधित बातम्या

Fire News : आंबिवली गावामधील घराला भीषण आग, घरातील सर्व साहित्य जळून खाक
1

Fire News : आंबिवली गावामधील घराला भीषण आग, घरातील सर्व साहित्य जळून खाक

Thane News : “घोडबंदर रोड सर्विस रोड विलीनीकरणाचे काम तत्काळ थांबवा,नाहीतर…”, राजन विचारे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
2

Thane News : “घोडबंदर रोड सर्विस रोड विलीनीकरणाचे काम तत्काळ थांबवा,नाहीतर…”, राजन विचारे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

शेतकरी आणि विद्यार्थ्यांसाठी सरकारचा महत्त्वाचा निर्णय, वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या भत्त्यात वाढ, तर शेतकरी भवन योजनेलाही…
3

शेतकरी आणि विद्यार्थ्यांसाठी सरकारचा महत्त्वाचा निर्णय, वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या भत्त्यात वाढ, तर शेतकरी भवन योजनेलाही…

Maharashtra Advocate General Resign : राज्याचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांचा राजीनामा, मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळात दिली माहिती
4

Maharashtra Advocate General Resign : राज्याचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांचा राजीनामा, मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळात दिली माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.