Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

टॉर्चच्या प्रकाशात रुग्णांवर उपचार! डॉक्टरांची कमतरता; भामरागड रुग्णालयात आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा

पावसाळ्यात सर्पदंशासारख घटनांचा धोका वाढलेला असताना रुग्णालयातील ही अवस्था गंभीर चिंता निर्माण करणारी आहे. ग्रामीण रुग्णालयातील हलगर्जीपणामुळे यापूर्वी अनेकांना जीव गमवावा लागल्याचा आरोप नागरिकांनी केला.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 26, 2026 | 11:03 AM
टॉर्चच्या प्रकाशात रुग्णांवर उपचार! डॉक्टरांची कमतरता; भामरागड रुग्णालयात आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा

टॉर्चच्या प्रकाशात रुग्णांवर उपचार! डॉक्टरांची कमतरता; भामरागड रुग्णालयात आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा

Follow Us
Follow Us:

भामरागड येथील ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा पुन्हा एकदा समोर आला. रुग्णालयातील वीजपुरवठा खंडित होताच डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना टॉर्चच्या प्रकाशात रुग्णांवर उपचार करावे लागत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले. पर्यायी वीज व्यवस्थेचा अभाव, डॉक्टरांची कमतरता आणि अपुऱ्या सुविधांमुळे रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.(फोटो सौजन्य – AI)

नागपुरात भिंत कोसळून मोठी दुर्घटना; दोन जण जखमी, जीर्ण भिंतींचा धोका कायम

तालुक्यातील आरोग्य व्यवस्थेचा प्रश्न अनेक वर्षांपासून ऐरणीवर आहे. खाटेवरून रुग्णांची वाहतूक, पायी रुग्णांना रुग्णालयात नेण्याच्या घटना यापूर्वीही समोर आल्या आहेत. हा विषय विधानसभेतही गाजला होता. राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी स्वतः ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन येथील व्यवस्थेबाबत नाराजी व्यक्त केली होती. मात्र, त्यानंतरही परिस्थितीत कोणतीही सुधारणा झाली नाही. सध्या ग्रामीण रुग्णालयात एकही कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी कार्यरत नसून उसनवारीवर नियुक्त करण्यात आलेल्या दोन डॉक्टरांच्या भरवशावर आरोग्यसेवा सुरू आहे. वैद्यकीय अधीक्षकांबाबत प्रशासकीय कारवाईची प्रक्रिया सुरू असल्याने रुग्णालयाचा कारभार विस्कळीत झाल्याची चर्चा आहे.

पावसाळ्यात सर्पदंशासारख घटनांचा धोका वाढलेला असताना रुग्णालयातील ही अवस्था गंभीर चिंता निर्माण करणारी आहे. ग्रामीण रुग्णालयातील हलगर्जीपणामुळे यापूर्वी अनेकांना जीव गमवावा लागल्याचा आरोप नागरिकांनी केला. त्यामुळे भामरागडसारख्या अतिदुर्गम आणि अतिसंवेदनशील तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयात तातडीने कायमस्वरूपी डॉक्टरांची नियुक्ती, पर्यायी व्यवस्था आणि आवश्यक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी जोर धरत आहे. रुग्णांच्या जीवाशी सुरू असलेला हा खेळ अखेर कधी थांबणार? असा संतप्त सवालही उपस्थित होत आहे.

Wardha : २.४९ लाख पशुधनाला लस; घटसर्प, एकटांग्या, आंत्रविकारावर उपचार; पशुसंवर्धन विभागाची मोहीम

भामरागड तालुका मलेरियाग्रस्त (एन्डेमिक) क्षेत्रात मोडत असून पावसाळ्यामुळे रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली. सध्या आंतररुग्ण विभागात २७ रुग्ण उपचार घेत आहेत. मात्र, वीजपुरवठा खंडित होताच पर्यायी वीज व्यवस्था नसल्याने संपूर्ण रुग्णालय अंधारात बुडते. अशा परिस्थितीत डॉक्टरांना टॉर्चच्या साहाय्याने उपचार करावे लागत असल्याने रुग्णांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. अंधारामुळे रुग्णांना शौचालयात जाणे, रात्री हालचाल करणे तसेच आपत्कालीन परिस्थिती हाताळणेही कठीण बनत आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Patients treated by torchlight shortage of doctors healthcare system in shambles at bhamragad hospital

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 26, 2026 | 11:03 AM

Topics:  

  • Gadchiroli
  • Gadchiroli News
  • maharashtra

संबंधित बातम्या

FDA News: घाणेरडी फरशी, झुरळे-उंदीर अन् वापरलेले तेल! फरसाण-वेफर्स बनवणाऱ्या 11 आस्थापनांवर FDAची धडक कारवाई
1

FDA News: घाणेरडी फरशी, झुरळे-उंदीर अन् वापरलेले तेल! फरसाण-वेफर्स बनवणाऱ्या 11 आस्थापनांवर FDAची धडक कारवाई

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा जागतिक डंका! महाराष्ट्राच्या नावे ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’; फडणवीस-पंकजा मुंडेंनी घडवली गणेशमूर्ती
2

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा जागतिक डंका! महाराष्ट्राच्या नावे ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’; फडणवीस-पंकजा मुंडेंनी घडवली गणेशमूर्ती

Bhandara News: भंडारा जिल्ह्यात २६९ परवानाधारक सावकार! एकही तक्रार नाही; अवैध सावकारी नाही की तक्रारीच पोहोचत नाही?
3

Bhandara News: भंडारा जिल्ह्यात २६९ परवानाधारक सावकार! एकही तक्रार नाही; अवैध सावकारी नाही की तक्रारीच पोहोचत नाही?

Dharashiv News: भूमिपूजनाला 12 वर्षे उलटली, समाजमंदिराचा पत्ताच नाही! आता त्याच जागेवर RO प्लांट; धाराशिव पालिकेवर प्रश्नचिन्ह
4

Dharashiv News: भूमिपूजनाला 12 वर्षे उलटली, समाजमंदिराचा पत्ताच नाही! आता त्याच जागेवर RO प्लांट; धाराशिव पालिकेवर प्रश्नचिन्ह

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.