Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bhandara News: भंडारा जिल्ह्यात २६९ परवानाधारक सावकार! एकही तक्रार नाही; अवैध सावकारी नाही की तक्रारीच पोहोचत नाही?

भंडारा जिल्ह्यात २०२६-२७ मध्ये तब्बल २६९ परवानाधारक सावकार आहेत, पण अवैध सावकारीविरोधात एकही तक्रार किंवा कारवाई नाही. मग जिल्ह्यात खरंच अवैध सावकारी नाही, की पीडित शेतकरी आणि नागरिक तक्रार करण्यास पुढे येत नाहीत? या आकडेवारीमुळे नवा प्रश्न निर्माण झाला आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Sep 10, 2026 | 04:08 PM
Bhandara News: भंडारा जिल्ह्यात २६९ परवानाधारक सावकार! एकही तक्रार नाही; अवैध सावकारी नाही की तक्रारीच पोहोचत नाही?
Follow Us
Follow Us:
  • भंडारा जिल्ह्यात २०२६-२७ मध्ये २६९ परवानाधारक सावकार असून अवैध सावकारीची एकही तक्रार नाही.
  • गत आठ महिन्यांत अवैध सावकारीविरोधात गुन्हे दाखल झाले नसल्याने तक्रारींच्या अभावावर प्रश्न उपस्थित झाला आहे.
  • तुमसरमध्ये ७४ परवान्यांचे नूतनीकरण झाले असून नवीन परवान्यांसाठी १२ अर्ज प्राप्त झाले होते.
शेतकरी आणि गरजू नागरिकांची आर्थिक पिळवणूक रोखण्यासाठी महाराष्ट्र सावकारी नियमन अधिनियम अस्तित्वात असताना जिल्ह्यातील सावकारी व्यवस्थेचे चित्र काहीसे वेगळेच समोर आले. जिल्ह्यात २०२६-२७ मध्ये तब्बल सावकारांकडे अधिकृत परवाने आहेत. मात्र, दुसरीकडे विनापरवाना सावकारी आणि पठाणी पद्धतीने व्याजवसुली करणाऱ्यांविरोधात गत आठ महिन्यात एकही कारवाई झाली नाही. विशेष म्हणजे या कालावधीत सहकार विभागाकडे अवैध सावकारीसंदर्भात एकही तक्रार प्राप्त झाली नसल्याची माहिती समोर आली. त्यामुळे ‘अवैध सावकारी नाही की तक्रारीच पोहोचत नाहीत ?’ असा प्रश्न उपस्थित होत आहे. २०२५-२६ अखेर भंडारा जिल्ह्यात २७९ परवानाधारक सावकार होते. २०२६ २७ साठी त्यापैकी २६४ सावकारांनी परवाना नूतनीकरणासाठी अर्ज केले.

अवैध सावकारीवर कारवाई कुठे थांबली?

सावकारीच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी सहकार विभाग आणि पोलिस प्रशासनाच्या माध्यमातून कारवाईची तरतूद आहे. महाराष्ट्र सावकारी नियमन अधिनियम, २०१४ अंतर्गत अवैध सावकारीविरोधात कारवाई केली जाते. सहकार विभागाच्या अधिकृत माहितीनुसार सावकारी विषयक कामकाजासाठी स्वतंत्र प्रशासकीय यंत्रणा कार्यरत आहे. मात्र भंडारा जिल्ह्यात गत आठ महिन्यात अवैध सावकारीप्रकरणी गुन्हे दाखल झाल्याची नोंद निरंक असल्याचे उपलब्ध आकडेवारीतून दिसून येते. त्यामुळे जिल्ह्यात प्रत्यक्षात अवैध सावकारीचे प्रकार नाहीत की पीडित शेतकरी आणि नागरिक तक्रार करण्यासाठी पुढे येत नाहीत, हा प्रश्न महत्त्वाचा ठरतो.

Bhandara News: शेतकऱ्यांची फवारणीसाठी धावपळ; खरीप पिकांवर कीडरोगांचे आक्रमण!  वाढत्या खर्चामुळे शेतकरी हतबल

यामध्ये केवळ ६ अर्ज ऑनलाइन, तर तब्बल २५८ अर्ज ऑफलाइन पद्धतीने दाखल करण्यात आले. यापैकी २६२ अर्जाचे नूतनीकरण झाले. १५ सावकारांनी नूतनीकरणासाठी अर्जच केलेला नाही. नवीन परवान्यासाठी १२ अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी ७ सावकारांना परवाने देण्यात आले आहेत. त्यामुळे २०२६-२७मध्ये जिल्ह्यातील परवानाधारक सावकारांची संख्या २६९ झाली आहे. जिल्ह्यात सावकारीच्या व्यवहारातून किती शेतकऱ्यांच्या जमिनी गहाण पडल्या, त्यापैकी किती जमिनी कायदेशीर प्रक्रियेतून संबंधित शेतकऱ्यांना परत मिळाल्या आणि किती प्रकरणे अद्याप प्रलंबित आहेत, याची माहिती सार्वजनिक होणे गरजेचे आहे.

Bhandara News: बाजारपेठेवर चढला जन्माष्टमीचा रंग! मूर्तिकारांची लगबग; पूजासाहित्य, सजावटीच्या वस्तूंनी बाजार फुलला

तुमसर येथे ७४ नूतनीकृत परवाने

आकडेवारी पाहता तुमसर तालुक्यात ७६ परवानाधारक सावकारांपैकी ७४ जणांनी नूतनीकरणासाठी अर्ज केला असून सर्व ७४ अर्जाचे नूतनीकरण झाले. मोहाडी तालुक्यात ५३ परवानाधारक सावकार होते. ८ जिल्ह्यात अवैध सावकारीसंदर्भात आतापर्यंत विभागाकडे कोणत्याही प्रकारची तक्रार प्राप्त झाली नाही. त्यामुळे अवैध सावकारीविरोधातील कारवाईची संख्या निरंक आहे. मात्र, सहकार विभागाकडून या प्रकारावर सातत्याने कडक नजर ठेवली जात असून, तक्रार प्राप्त झाल्यास नियमानुसार तातडीने चौकशी करून आवश्यक ती कारवाई केली जाईल. विलास देशपांडे, जिल्हा निबंधक, भंडारा

यापैकी ४४ सावकारांनी नूतनीकरणासाठी अर्ज केला असून ४७ परवान्यांचे नूतनीकरण करण्यात आले. दोन अर्ज रद्द झाले. भंडाऱ्यात पूर्वी ४७ परवानाधारक सावकार होते. यापैकी ४४ जणांनी नूतनीकरणासाठी अर्ज केला असून ४३ परवान्यांचे नूतनीकरण झाले. साकोलीत ३८, लाखनीत २५ आणि लाखांदूरमध्ये १७परवानाधारक सावकार आहेत. पवनीत २२ परवानाधारक सावकार असून एका नूतनीकरण अर्जाची प्रक्रिया प्रलंबित आहे.

Web Title: Bhandara 269 licensed moneylenders no illegal complaints

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 10, 2026 | 04:08 PM

Topics:  

  • Bhandara
  • india
  • maharashtra

संबंधित बातम्या

Dharashiv News: भूमिपूजनाला 12 वर्षे उलटली, समाजमंदिराचा पत्ताच नाही! आता त्याच जागेवर RO प्लांट; धाराशिव पालिकेवर प्रश्नचिन्ह
1

Dharashiv News: भूमिपूजनाला 12 वर्षे उलटली, समाजमंदिराचा पत्ताच नाही! आता त्याच जागेवर RO प्लांट; धाराशिव पालिकेवर प्रश्नचिन्ह

Pune Leopard Attack: दबक्या पावलांनी आला अन्…! दुचाकीवरून जाणाऱ्या दाम्पत्यावर बिबट्याची झडप, वनविभागाने लावला पिंजरा
2

Pune Leopard Attack: दबक्या पावलांनी आला अन्…! दुचाकीवरून जाणाऱ्या दाम्पत्यावर बिबट्याची झडप, वनविभागाने लावला पिंजरा

Electricity Workers: वीज कर्मचाऱ्यांच्या आशांना उजेड! खासगीकरणाला नकार; कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी ‘हरियाणा पॅटर्न’चा प्रस्ताव
3

Electricity Workers: वीज कर्मचाऱ्यांच्या आशांना उजेड! खासगीकरणाला नकार; कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी ‘हरियाणा पॅटर्न’चा प्रस्ताव

Nitin Gadkari: ‘मुंबई-गोवा महामार्गाच्या उद्घाटनाला मी येणार नाही, मला लाज वाटते…’,नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य
4

Nitin Gadkari: ‘मुंबई-गोवा महामार्गाच्या उद्घाटनाला मी येणार नाही, मला लाज वाटते…’,नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.