Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dharashiv News: भूमिपूजनाला 12 वर्षे उलटली, समाजमंदिराचा पत्ताच नाही! आता त्याच जागेवर RO प्लांट; धाराशिव पालिकेवर प्रश्नचिन्ह

Dharashiv News: धाराशिव नगरपालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा प्रकार समोर आला आहे. सुमारे 12 वर्षांपूर्वी समाजमंदिरासाठी भूमिपूजन झालेल्या जागेचा आता आरओ प्लांटसाठी वापर करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने वाद निर्माण झाला आहे. समाजमंदिरासंदर्भातील मूळ उद्देश बाजूला सारून जागेचा वापर बदलण्यामागील कारणांची चौकशी करावी...

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 10, 2026 | 04:00 PM
भूमिपूजनाला 12 वर्षे उलटली, समाजमंदिराचा पत्ताच नाही! आता त्याच जागेवर RO प्लांट; धाराशिव पालिकेवर प्रश्नचिन्ह

भूमिपूजनाला 12 वर्षे उलटली, समाजमंदिराचा पत्ताच नाही! आता त्याच जागेवर RO प्लांट; धाराशिव पालिकेवर प्रश्नचिन्ह

Follow Us
Follow Us:
  • समाजमंदिरासाठी राखीव जागेवर आता RO प्लांट?
  • 12 वर्षांनंतर नवा ठराव; चौकशीची मागणी
  • ठराव रद्द करून जबाबदारी निश्चित करण्याची मागणी
 

धाराशिव, जिल्हा प्रतिनिधी : तब्बल बारा वर्षांपूर्वी समाजमंदिर इमारतीचे भूमिपूजन झाले, निविदा प्रक्रियाही पार पडल्याचे सांगितले जाते; मात्र समाजमंदिराचे बांधकाम अद्याप कागदावरच राहिले. आता त्याच समाजमंदिरासाठी राखीव असलेल्या जागेवर आरओ प्लांट उभारण्याचा ठराव नगरपालिकेने केल्याने धाराशिव नगरपालिकेच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांसह आंबेडकरी समाजात तीव्र असंतोष निर्माण झाला असून, ठराव रद्द करून संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

तांबरी विभागातील लिंबोणी बाग परिसरातील सर्व्हे क्रमांक १४ मधील जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय समाजमंदिर उभारण्याची मागणी २००८ पासून केली जात आहे. २०१३ मध्ये याच जागेवर समाजमंदिराचे भूमिपूजन करण्यात आले. त्यानंतर निविदा प्रक्रिया झाल्याचेही संबंधितांचे म्हणणे आहे. मात्र, भूमिपूजनानंतर बारा वर्षे उलटूनही समाजमंदिराची एक वीटही रचली गेली नाही, असा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.

Dharashiv News: धाराशिव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरात विनापरवानगी वृक्षतोड? जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

निधी गेला कुठे? प्रक्रिया थांबली कुठे?

समाजमंदिरासाठी मंजूर झालेला निधी किती होता? तो निधी कुठे आणि कशासाठी खर्च झाला? निविदा प्रक्रिया नेमकी कोणत्या टप्प्यावर थांबली? बारा वर्षे बांधकाम रखडण्यामागे कोण जबाबदार आहे? या प्रश्नांची उत्तरे प्रशासनाने जनतेसमोर ठेवावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.एकीकडे वर्षानुवर्षे समाजमंदिराचा प्रश्न प्रलंबित ठेवायचा आणि दुसरीकडे त्याच जागेवर आरओ प्लांट उभारण्याचा निर्णय घ्यायचा, हा प्रकारच संशय निर्माण करणारा असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

आरओ प्लांटला विरोध नाही; जागेला विरोध

१६ मार्च २०२६ रोजी झालेल्या नगरपालिकेच्या आमसभेत ठराव क्रमांक ५६० अंतर्गत सर्व्हे क्रमांक १४ मधील जागेवर आरओ प्लांट उभारण्याचा निर्णय झाल्याचे सांगण्यात आले. नागरिकांनी मात्र आरओ प्लांटला विरोध नसल्याचे स्पष्ट केले आहे. शहराला आरओ प्लांटची गरज असेल तर तो उभारावा; मात्र समाजमंदिरासाठी मागणी असलेल्या जागेवरच तो उभारण्याचा अट्टहास करू नये, अशी भूमिका घेण्यात आली आहे.

१५ दिवसांचा इशारा

ठराव क्रमांक ५६० रद्द अथवा स्थगित करून आरओ प्लांटसाठी पर्यायी जागा निश्चित करावी, समाजमंदिरासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा आणि २०१३ पासून रखडलेल्या कामाची प्रशासकीय चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
प्रशासनाने १५ दिवसांत ठोस व लेखी निर्णय न घेतल्यास मोर्चा, धरणे, जनआंदोलन आणि आवश्यकता भासल्यास रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.

बारा वर्षे समाजमंदिराची जागा रिकामी ठेवून आता त्याच जागेवर आरओ प्लांटचा ठराव का? समाजमंदिरासाठी मंजूर निधीचे काय झाले? बांधकाम का रखडले? या प्रश्नांची उत्तरे देण्याची जबाबदारी नगरपालिकेची आहे. त्यामुळे केवळ ठराव करून विषय संपविण्याऐवजी संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

Maratha Reservation Protest: ‘एक मराठा, लाख मराठा’च्या घोषणा; तहसीलदारांची खुर्ची बाहेर आणून जाळली, उमरग्यात चार जण ताब्यात

Web Title: Dharashiv community hall land allotted for ro plant after 12 years demand for inquiry

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 10, 2026 | 04:00 PM

Topics:  

  • Dharashiv
  • maharashtra

संबंधित बातम्या

Bhandara News: भंडारा जिल्ह्यात २६९ परवानाधारक सावकार! एकही तक्रार नाही; अवैध सावकारी नाही की तक्रारीच पोहोचत नाही?
1

Bhandara News: भंडारा जिल्ह्यात २६९ परवानाधारक सावकार! एकही तक्रार नाही; अवैध सावकारी नाही की तक्रारीच पोहोचत नाही?

Pune Leopard Attack: दबक्या पावलांनी आला अन्…! दुचाकीवरून जाणाऱ्या दाम्पत्यावर बिबट्याची झडप, वनविभागाने लावला पिंजरा
2

Pune Leopard Attack: दबक्या पावलांनी आला अन्…! दुचाकीवरून जाणाऱ्या दाम्पत्यावर बिबट्याची झडप, वनविभागाने लावला पिंजरा

Electricity Workers: वीज कर्मचाऱ्यांच्या आशांना उजेड! खासगीकरणाला नकार; कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी ‘हरियाणा पॅटर्न’चा प्रस्ताव
3

Electricity Workers: वीज कर्मचाऱ्यांच्या आशांना उजेड! खासगीकरणाला नकार; कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी ‘हरियाणा पॅटर्न’चा प्रस्ताव

Nitin Gadkari: ‘मुंबई-गोवा महामार्गाच्या उद्घाटनाला मी येणार नाही, मला लाज वाटते…’,नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य
4

Nitin Gadkari: ‘मुंबई-गोवा महामार्गाच्या उद्घाटनाला मी येणार नाही, मला लाज वाटते…’,नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.