Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

FDA News: घाणेरडी फरशी, झुरळे-उंदीर अन् वापरलेले तेल! फरसाण-वेफर्स बनवणाऱ्या 11 आस्थापनांवर FDAची धडक कारवाई

FDA News: सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने शिळ-दिवा रोडवरील खडी गाव परिसरातील फरसाण, वेफर्स, चिवडा, नमकीन आणि इतर खाद्यपदार्थ तयार व विक्री करणाऱ्या 11 आस्थापनांवर धडक कारवाई केली.

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 10, 2026 | 06:54 PM
घाणेरडी फरशी, झुरळे-उंदीर अन् वापरलेले तेल! फरसाण-वेफर्स बनवणाऱ्या 11 आस्थापनांवर FDAची धडक कारवाई

घाणेरडी फरशी, झुरळे-उंदीर अन् वापरलेले तेल! फरसाण-वेफर्स बनवणाऱ्या 11 आस्थापनांवर FDAची धडक कारवाई

Follow Us
Follow Us:
  • फरसाण खाताय सावधान!
  • अस्वच्छ ठिकाणी सुरू होते उत्पादन
  • 28 हजार किलोहून अधिक साठा जप्त
  • 11 आस्थापनांचे काम बंद
FDA News: सणासुदीच्या काळात खाद्यपदार्थांची वाढणारी मागणी लक्षात घेऊन अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. गोपनीय माहितीच्या आधारे FDA ठाणे विभागाने 9 सप्टेंबर 2026 रोजी शिळ-दिवा रोडवरील खडी गाव परिसरातील भास्कर कम्पाऊंड येथे अचानक छापा टाकला. फरसाण, वेफर्स, चिवडा, नमकीन आणि अन्य खाद्यपदार्थांचे उत्पादन किंवा विक्री करणाऱ्या 11 आस्थापनांची तपासणी करण्यात आली.

20.48 लाखांचा माल जप्त

कारवाईदरम्यान विविध आस्थापनांमध्ये बटाटा वेफर्स, फराळी चिवडा, तिखा वेफर्स, काळी मिरी वेफर्स, मिक्स फरसाण, शेव, भाकरवडी, चिवडा, डाएट चिवडा, शेजवान स्टिक्स आणि केळीचे चिप्स आढळले. याशिवाय उत्पादनासाठी वापरण्यात येणारे मैदा, बेसन, वाटाणा पीठ, पामोलिन तेल आणि वापरलेले खाद्यतेलही साठवून ठेवण्यात आले होते.

Wardha News : सणासुदीच्या काळात एफडीएची मोठी कारवाई, ५९ आस्थापनांची केली तपासणी तर ४ परवाने केले निलंबित

तपासणीदरम्यान 28,955 किलो आणि 56 लिटर इतका साठा जप्त करण्यात आला. या मालाची किंमत 20,48,801.50 रुपये असल्याचे FDAने म्हटले आहे. भेसळ किंवा कमी दर्जाचा असल्याच्या संशयावरून तसेच अत्यंत अस्वच्छ व असुरक्षित ठिकाणी उत्पादन होत असल्याने हा साठा अन्न सुरक्षा व मानके कायदा, 2006 अंतर्गत जप्त करण्यात आला.

घाणेरडी फरशी, सांडपाणी अन् झुरळे-उंदीर

FDAच्या तपासणीत अनेक गंभीर त्रुटी समोर आल्या. काही आस्थापनांकडे आवश्यक वैध अन्न परवाना नव्हता. उत्पादन क्षेत्रातील फरशी घाणेरडी आणि चिकट होती. साचलेले तेल आणि अन्य अवशेषांमुळे परिसर दूषित झाल्याचे आढळले. काही ठिकाणी छप्पर आणि भिंती तात्पुरत्या पत्र्यांच्या शेडच्या होत्या, तर उत्पादन क्षेत्राचा काही भाग उघडाच होता.

सांडपाण्याचा योग्य निचरा नसल्याने आस्थापनांबाहेर दुर्गंधी पसरल्याचेही तपासणीत दिसून आले. काही आस्थापनांमध्ये आणि आजूबाजूच्या परिसरात झुरळे व उंदरांचा प्रादुर्भाव आढळला. बाहेरील परिसरात गायी, कुत्रे आणि मांजरींचाही वावर होता.

कामगारांकडे अप्रोन, हातमोजेही नाहीत

पॅकबंद खाद्यपदार्थांच्या लेबलिंगमध्ये लागू नियमांचे पालन होत नसल्याचेही FDAच्या निदर्शनास आले. खाद्यपदार्थ तयार करणारे काही कामगार अप्रोन, हातमोजे आणि टोपी न वापरता अस्वच्छ कपड्यांमध्ये काम करत होते. या सर्व बाबींची गंभीर दखल घेत 11 आस्थापनांना काम बंद करण्यासाठी परवाना किंवा नोंदणी निलंबनाचे आदेश देण्यात आले.

मुंबई-पुण्यातील हॉटेल्सवरही कारवाई

FDAची कारवाई केवळ शिळ-दिवा रोडपुरती मर्यादित नाही. मुंबईतील श्री गजानन वडापाव-स्नॅक्स सेंटर, समर्थ स्वीट्स, एकविरा झुणका भाकर केंद्र, मनीषा स्वीट्स, नवाब सीख कॉर्नर, हॉटेल अदिन आणि जय महाराष्ट्र मसाला डोसा कॉर्नर यांसारख्या आस्थापनांच्या तपासणीतही विविध स्वच्छता आणि अन्नसुरक्षा त्रुटी आढळल्याचे नमूद करण्यात आले आहे. पुणे विभागात हॉटेल शाही, Saber Restaurant आणि Sairat Biryani यांच्यावरही कारवाई करण्यात आली. छत्रपती संभाजीनगरमधील शेळके मामा ढाबा रेस्टॉरंटच्या फेरतपासणीत त्रुटी कायम असल्याचे आढळले असून पुढील कारवाई सुरू आहे.

सण-उत्सवातील अन्नवाटपासाठी सात दिवस आधी पूर्वसूचना

सण, धार्मिक कार्यक्रम, यात्रा, उरूस आदी प्रसंगी महाप्रसाद, अन्नछत्र, लंगर, भंडारा किंवा अन्य सामूहिक अन्नवाटपाचे आयोजन असल्यास परवानाधारक/नोंदणीकृत केटरर किंवा स्वयंपाकगृहामार्फत अन्न तयार व वितरित केले जात असल्यास कार्यक्रमाच्या किमान सात दिवस आधी विहित पूर्वसूचना सादर करणे आवश्यक असल्याचे FDAने सांगितले आहे. यासाठी Food & Drug Grievance Portal वर ‘सामूहिक अन्नवाटप पूर्वसूचना नमुना’ उपलब्ध करून देण्यात आला आहे.

अन्नाच्या गुणवत्तेबाबत किंवा गैरप्रकाराबाबत नागरिकांना टोल-फ्री क्रमांक 1800222365 वर तक्रार करता येणार आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांविरोधात कठोर कायदेशीर कारवाई सुरूच राहील, असा इशारा अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे.

IAS Tukaram Mundhe सोशल मीडियावरही ‘सिंघम’, Instagram वर मुंढेंची क्रेझ! फॉलोअर्समध्ये फडणवीस-शिंदेंनाही टाकले मागे

Web Title: Maharashtra fda action shil diva road farsan wafers units food stock worth 20 lakh seized licenses suspended

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 10, 2026 | 06:54 PM

Topics:  

  • FDA
  • maharashtra
  • thane

संबंधित बातम्या

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा जागतिक डंका! महाराष्ट्राच्या नावे ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’; फडणवीस-पंकजा मुंडेंनी घडवली गणेशमूर्ती
1

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा जागतिक डंका! महाराष्ट्राच्या नावे ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’; फडणवीस-पंकजा मुंडेंनी घडवली गणेशमूर्ती

Bhandara News: भंडारा जिल्ह्यात २६९ परवानाधारक सावकार! एकही तक्रार नाही; अवैध सावकारी नाही की तक्रारीच पोहोचत नाही?
2

Bhandara News: भंडारा जिल्ह्यात २६९ परवानाधारक सावकार! एकही तक्रार नाही; अवैध सावकारी नाही की तक्रारीच पोहोचत नाही?

Dharashiv News: भूमिपूजनाला 12 वर्षे उलटली, समाजमंदिराचा पत्ताच नाही! आता त्याच जागेवर RO प्लांट; धाराशिव पालिकेवर प्रश्नचिन्ह
3

Dharashiv News: भूमिपूजनाला 12 वर्षे उलटली, समाजमंदिराचा पत्ताच नाही! आता त्याच जागेवर RO प्लांट; धाराशिव पालिकेवर प्रश्नचिन्ह

Pune Leopard Attack: दबक्या पावलांनी आला अन्…! दुचाकीवरून जाणाऱ्या दाम्पत्यावर बिबट्याची झडप, वनविभागाने लावला पिंजरा
4

Pune Leopard Attack: दबक्या पावलांनी आला अन्…! दुचाकीवरून जाणाऱ्या दाम्पत्यावर बिबट्याची झडप, वनविभागाने लावला पिंजरा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.