Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा जागतिक डंका! महाराष्ट्राच्या नावे ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’; फडणवीस-पंकजा मुंडेंनी घडवली गणेशमूर्ती

Ganeshotsav 2026: पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश देत महाराष्ट्राने नवा ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’ नोंदवला आहे. 10 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक गणेशमूर्ती साकारत या विक्रमात सहभाग घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनीही स्वतः गणेशमूर्ती घडवून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 10, 2026 | 06:16 PM
पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा जागतिक डंका! महाराष्ट्राच्या नावे ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’; फडणवीस-पंकजा मुंडेंनी घडवली गणेशमूर्ती

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा जागतिक डंका! महाराष्ट्राच्या नावे ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’; फडणवीस-पंकजा मुंडेंनी घडवली गणेशमूर्ती

Follow Us
Follow Us:
  • 10 हजार विद्यार्थ्यांच्या हातांनी साकारले बाप्पा!
  • पर्यावरणपूरक गणेशमूर्ती निर्मितीत महाराष्ट्राचा ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’
  • मुख्यमंत्र्यांनीही साकारला बाप्पा
 

ठाणे : गणेशमूर्तीच्या भव्यतेपेक्षा भक्ती आणि पर्यावरण संवर्धनाला अधिक महत्व असून, गणेशोत्सवासारखा सांस्कृतिक वारसा जपणारा सण पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करणे, ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. वाशी येथील सिडको एक्झिबिशन अँड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये आयोजित ‘पर्यावरणपूरक महा गणेश मूर्ती कार्यशाळा २०२६’ मध्ये ते बोलत होते. या भव्य कार्यशाळेत एकाच वेळी तब्बल १० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी शाडूच्या मातीपासून पर्यावरणपूरक गणेशमूर्तींची निर्मिती करून ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये महाराष्ट्राच्या नावावर नवा जागतिक विक्रम नोंदवला.

मूर्ती लहान असो वा मोठी, भक्ती सारखीच

मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की, गणराया ही बुद्धीची देवता असून आपल्या संस्कृतीत पर्यावरणाला अनन्यसाधारण महत्व आहे. सृष्टीची निर्मिती करणाऱ्या पंचमहाभूतांचे रक्षण झाले तरच मानवी जीवन सुरक्षित राहू शकते. मोठ्या गणेशमूर्ती, प्लास्टर ऑफ पॅरिस आणि कृत्रिम रंगांमुळे जलस्रोतांचे होणारे नुकसान टाळण्याचे आवाहन करताना ते म्हणाले की, मूर्ती लहान असो वा मोठी, भक्ती सारखीच असते. ईश्वराचा आशीर्वाद हा मूर्तीच्या आकारावर नव्हे, तर आपण पर्यावरण आणि समाजाची किती निस्वार्थ सेवा करतो यावर ठरतो.

Aaditya Thackeray : ‘दुसऱ्यावर धर्म लादणं ही हिंसाच!’ मिरा-भाईंदरच्या शाळेत कांदा-लसूण बंदी; आदित्य ठाकरे संतापले

‘वसुंधरा रक्षक’ म्हणून सिद्ध

गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या परीक्षकांनी निकाल जाहीर करताच मुख्यमंत्र्यांनी या यशाचे खरे शिलेदार सहभागी विद्यार्थी असल्याचे सांगत त्यांचे कौतुक केले. तसेच पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, पर्यावरण विभाग, जे. जे. स्कूल ऑफ आर्ट आणि कला संचालनालयाच्या प्रयत्नांची विशेष प्रशंसा केली. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करताना सांगितले की, शाडू मातीपासून बाप्पा घडवणाऱ्या या हजारो विद्यार्थ्यांनी स्वतःला ‘वसुंधरा रक्षक’ म्हणून सिद्ध केले आहे. संस्कृती जपत पर्यावरण रक्षणाचा हा संदेश घराघरात पोहोचविणे हाच या उपक्रमाचा मूळ हेतू आहे.

संपूर्ण परिसर भक्तिमय

ढोल-ताशांच्या मंगल गजरात आणि मूर्तिकारांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता. या कार्यशाळेचे मुख्य आकर्षण ठरले ते म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी स्वतः शाडू माती हातात घेऊन गणेशमूर्ती साकारली. राज्याच्या सर्वोच्च नेतृत्वाला आपल्यासोबत मूर्ती घडवताना पाहून विद्यार्थ्यांचा उत्साह शिगेला पोहोचला. आपण स्वतः करू शकतो तर प्रत्येक कुटुंबही पर्यावरणपूरक बाप्पा साकारू शकते, असा ठाम आणि प्रत्यक्ष कृतीतून दिलेला संदेश या उपक्रमाने संपूर्ण समाजाला दिला. शाळा-महाविद्यालयांचे विद्यार्थी, कला क्षेत्रातील तज्ज्ञ, प्राध्यापक आणि हजारो गणेशभक्तांच्या साक्षीने हा जागतिक विक्रम आणि पर्यावरण संवर्धनाचा जागर अत्यंत दिमाखात संपन्न झाला.

कलेक्टर होण्याचं स्वप्न स्वप्नच राहिलं; “घराची चिंता करू नको, अभ्यास कर…” आईचे शब्द आठवले; प्रथमेशच्या मृत्यूने गाव सुन्न

Web Title: Maharashtra guinness world record eco friendly ganesh idols over 10000 students devendra fadnavis pankaja munde

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 10, 2026 | 06:16 PM

Topics:  

  • Ganesh Chaturthi 2026
  • Ganeshotsav 2026
  • maharashtra

संबंधित बातम्या

FDA News: घाणेरडी फरशी, झुरळे-उंदीर अन् वापरलेले तेल! फरसाण-वेफर्स बनवणाऱ्या 11 आस्थापनांवर FDAची धडक कारवाई
1

FDA News: घाणेरडी फरशी, झुरळे-उंदीर अन् वापरलेले तेल! फरसाण-वेफर्स बनवणाऱ्या 11 आस्थापनांवर FDAची धडक कारवाई

Bhandara News: भंडारा जिल्ह्यात २६९ परवानाधारक सावकार! एकही तक्रार नाही; अवैध सावकारी नाही की तक्रारीच पोहोचत नाही?
2

Bhandara News: भंडारा जिल्ह्यात २६९ परवानाधारक सावकार! एकही तक्रार नाही; अवैध सावकारी नाही की तक्रारीच पोहोचत नाही?

Dharashiv News: भूमिपूजनाला 12 वर्षे उलटली, समाजमंदिराचा पत्ताच नाही! आता त्याच जागेवर RO प्लांट; धाराशिव पालिकेवर प्रश्नचिन्ह
3

Dharashiv News: भूमिपूजनाला 12 वर्षे उलटली, समाजमंदिराचा पत्ताच नाही! आता त्याच जागेवर RO प्लांट; धाराशिव पालिकेवर प्रश्नचिन्ह

Ratnagiri: मुसळधार पाऊस अन् खड्ड्यांचे साम्राज्य; गणेशोत्सवाआधी कोकणातील रस्ते दुरुस्तीसाठी प्रशासनाची मोहीम
4

Ratnagiri: मुसळधार पाऊस अन् खड्ड्यांचे साम्राज्य; गणेशोत्सवाआधी कोकणातील रस्ते दुरुस्तीसाठी प्रशासनाची मोहीम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.