संभाव्य पाणीटंचाई रोखण्यासाठी आतापासूनच उपाययोजना करा; भाऊसाहेब भोईर यांची मागणी
पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या ३० लाखांच्या पुढे गेली आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे पाण्याची मागणीही वाढत असून, भविष्यातील संभाव्य टंचाई लक्षात घेऊन पाणी व्यवस्थापनाचे नियोजन करणे आवश्यक आहे. त्यासाठी पाणीगळती रोखणारे फिरते दुरुस्ती पथक स्थापन करावे. घरांमधील नळ आणि पाइपलाइनमधील गळती मोफत किंवा नाममात्र शुल्कात दुरुस्त करून द्यावी. पिण्याच्या पाण्याने वाहने धुण्यास बंदी घालून नियम मोडणाऱ्यांना किमान एक हजार रुपयांचा दंड आकारावा, अशी मागणी भोईर यांनी केली आहे.
मोठ्या बांधकामांमधील पाणीवापरावर तात्पुरते निर्बंध घालावेत. सार्वजनिक आणि खासगी विहिरी तसेच बोअरवेलमधील पाणीवापराचे नियोजन करावे. पाणी व्यवस्थापनासाठी विशेष समिती स्थापन करून दर पंधरा दिवसांनी परिस्थितीचा आढावा घ्यावा. नागरिकांमध्ये पाणी बचतीबाबत जनजागृती करणे आणि सांडपाण्याचा पुनर्वापर वाढविण्यावरही भर द्यावा, असे त्यांनी सुचविले आहे.
संभाव्य पाणीटंचाईच्या काळात नागरिकांना दिलासा देण्यासाठी सेवाभावी संस्थांच्या सहकार्याने माफक दरात झुणका-भाकर केंद्रे सुरू करण्याचे आवाहनही भोईर यांनी केले आहे.
INDIA Alliance Public Impeachment Program: इंडिया अलायन्सचा ‘जनमहाभियोग’ कार्यक्रम रद्द
“शहरात पाणीटंचाई तीव्र होण्याची शक्यता लक्षात घेता महापालिकेने आतापासूनच सतर्क राहावे. पाण्याची नासाडी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी नागरिकांनीही महापालिका प्रशासनाला सहकार्य करावे,” असे भोईर यांनी म्हटले आहे.
Ans: पिण्याच्या पाण्याने वाहने धुतल्यास किमान १,००० रुपयांचा दंड आकारावा, पाणीगळती रोखण्यासाठी फिरते दुरुस्ती पथक स्थापन करावे आणि बांधकामांवरील पाण्याचा वापर मर्यादित करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
Ans: नागरिकांच्या घरांमधील आणि सार्वजनिक पाइपलाइनमधील नळ गळती मोफत किंवा नाममात्र शुल्कात दुरुस्त करून देण्यासाठी महापालिकेने 'फिरते दुरुस्ती पथक' सुरू करावे, असे सुचवले आहे.
Ans: पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या ३० लाखांहून अधिक झाली असून पाण्याची मागणी वेगाने वाढत आहे.






