Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

India Vs Pakistan: देहुतील आम्युनेशन्स फॅक्टरीला मोठा बंदोबस्त; पोलीस यंत्रणा अलर्ट

पिंपरी येथे रेल्वे स्थानकाजवळ दोन जुने बॉम्ब शेल आढळून आले. भारत-पाकिस्तान युद्धाचा तणाव वाढत असताना हे बॉम्ब शेल आढळल्याने शुक्रवारी शहरात एकच खळबळ उडाली.

  • By तेजस भागवत
Updated On: May 10, 2025 | 11:14 AM
India Vs Pakistan: देहुतील आम्युनेशन्स फॅक्टरीला मोठा बंदोबस्त; पोलीस यंत्रणा अलर्ट

India Vs Pakistan: देहुतील आम्युनेशन्स फॅक्टरीला मोठा बंदोबस्त; पोलीस यंत्रणा अलर्ट

Follow Us
Close
Follow Us:

पिंपरी : 22 एप्रिलला जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा भारताने बदला घेतला. बुधवारी 7 मेला भारतीय सैन्यदलाने पाकिस्तानात एअर स्ट्राईक केला. भारताने पाकिस्तानमधील दहशतवाद्यांची नऊ तळ उद्ध्वस्त केली. यात 100 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केल्याचं सांगितलं जात आहे. या हल्ल्यानंतर पाकिस्तानने देखील सीमेवर शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं असून अंदाधुंद फायरींग करायला सुरुवात केली आहे. पाकिस्तान कडून भारतावर हल्ले सुरु आहेत. मात्र भारताच्या लष्कराने योग्य प्रत्त्युत्तर दिलेले आहे.

सीमाभागात पाकिस्तानकडून सातत्याने ड्रोन हल्ले सुरू आहेत. अशात सीमेवरील भारत पाकिस्तान संघर्षाचा परिणाम आता थेट पुण्यावर होताना दिसत आहे. यातच देशाच्या संरक्षण खात्याला दारु गोळा साठा असणारे आम्युनेशन्स फॅक्टरी देहूरोड येथे आहे. हा भाग अत्यंत संवेदनशील असल्याने आताच्या परिस्थितीत या ठिकाणी तगडा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे.

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या परिसरात यापुर्वी काही बॉम्ब स्फोटातील आरोपी वास्तव करून गेल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. तसेच पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराला हाय अलर्ट देण्यात आलेला आहे. त्यामुळे पोलीस यंत्रणा सतर्क झालेली आहे. अनेक संशयित ठिकाणी काँबिग ऑपरेशन घेऊन तपासणी सुरू आहे. महत्वाच्या ठिकाणी योग्य तपासणी केल्या जात असून त्या ठिकाणी मोठा बंदोबस्त लावलेला आहे.

वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या मिटींग घेण्यात आलेल्या असून योग्य त्या सूचना आणि मार्गदर्शन करण्यात आलेले आहे. देशाच्या सैनिकांसोबत पोलीस अधिकारी, कर्मचारी यांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. तसेच अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. सर्व अधिकारी, कर्मचारी यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आलेल्या आहेत.

पिंपरीत सापडले ‘बॉम्ब शेल’

पिंपरी येथे रेल्वे स्थानकाजवळ शुक्रवारी (दि. ९) दुपारी दोन जुने बॉम्ब शेल आढळून आले. भारत-पाकिस्तान युद्धाचा तणाव वाढत असताना हे बॉम्ब शेल आढळल्याने शुक्रवारी शहरात एकच खळबळ उडाली. पिंपरीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कडलग यांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी रेल्वे स्थानकाच्या बाजूला असलेल्या भंगारच्या दुकानाजवळ शुक्रवारी दुपारी बारा वाजताच्या सुमारास हे जुने बॉम्ब शेल आढळून आले. घटनेची माहिती मिळताच पिंपरी पोलीस, बॉम्ब शोधक, नाशक पथक आणि गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पिंपरी रेल्वे स्थानकाजवळ धाव घेतली. बॉम्ब शोधक नाशक पथकाने बॉम्ब शेलची पाहणी करून ते ताब्यात घेतले आहेत.  पोलिसांनी घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली. मात्र आणखी बॉम्ब शेल अथवा इतर संशयित वस्तू आढळून आल्या नाहीत. आढळलेले बॉम्ब शेल पुढील तपासणीसाठी संरक्षण विभागाकडे दिले जाणार आहेत. हे बॉम्ब शेल भांगरमध्ये चोरट्या पद्धतीने आणले असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

Web Title: Pcmc police deployed big security in indian army ammunations factory dehu india pakistan war marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 10, 2025 | 11:14 AM

Topics:  

  • India vs Pakistan
  • PCMC News

संबंधित बातम्या

Women’s World Cup Points Table : गुणतालिकेत भारताचे पहिले स्थान गेले, हा संघ नंबर वन; पाकिस्तानच्या अडचणी वाढल्या
1

Women’s World Cup Points Table : गुणतालिकेत भारताचे पहिले स्थान गेले, हा संघ नंबर वन; पाकिस्तानच्या अडचणी वाढल्या

पाकिस्तानच्या जखमेवर MCA ने चोळले मीठ, भारताविरुद्ध मुनीबाच्या वादग्रस्त धावबादवर काय म्हटले आहे ते जाणून घ्या?
2

पाकिस्तानच्या जखमेवर MCA ने चोळले मीठ, भारताविरुद्ध मुनीबाच्या वादग्रस्त धावबादवर काय म्हटले आहे ते जाणून घ्या?

India vs Pakistan : ‘राग ठेव खिशात…’ हरमनप्रीतकडे पाकची गोलंदाज रागाने पाहत असताना शिवीने दिले कर्णधाराने उत्तर, Video Viral
3

India vs Pakistan : ‘राग ठेव खिशात…’ हरमनप्रीतकडे पाकची गोलंदाज रागाने पाहत असताना शिवीने दिले कर्णधाराने उत्तर, Video Viral

ICC Women Cricket World Cup Points Table : गुणतालिकेत उलटफेर! पाकिस्तानला हरवून भारताने मिळवले मोठे यश, पटकावले अव्वल स्थान
4

ICC Women Cricket World Cup Points Table : गुणतालिकेत उलटफेर! पाकिस्तानला हरवून भारताने मिळवले मोठे यश, पटकावले अव्वल स्थान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.