Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

उरली सुरली इज्जत काढली राव! Hockey World Cup मध्ये भारताने पाकिस्तानला अक्षरश: लोळवले

भारतीय हॉकी संघाने पाकिस्तानचा ५-३ दारुण पराभव केला आहे. या थरारक विजयासह भारताने पॉईंट्स टेबलमध्ये दुसरे स्थान पटकावले आहे. तर दुसऱ्या फेरीत भारताने दिमाखात प्रवेश केला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 19, 2026 | 09:35 PM
उरली सुरली इज्जत काढली राव! Hockey World Cup मध्ये भारताने पाकिस्तानला अक्षरश: लोळवले
Follow Us
Follow Us:
  • भारताने पाकिस्तानला ५-३ ने चारली धूळ
  • दणदणीत विजयासह पुढच्या फेरीत केला प्रवेश
  • पॉईंट्स टेबलमध्ये भारतीय संघ दुसऱ्या स्थानावर
Hockey World Cup 2026: एफआयएच पुरुष हॉकी वर्ल्डकप स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तानचा संघ आमनेसामने आले होते. पूल डी मध्ये महत्वाच्या सामन्यात भारतीय हॉकी संघाने आपली चुणूक दाखवली आहे. भारतीय हॉकी संघाने आपला पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा दारुण पराभव केला आहे. भारताने पाकिस्तानचा ५-३ असा दारुण पराभव केला आहे.
A decade of dominance continues as India book their place in the next round! 👊🇮🇳 India men's team defeated Pakistan 5–3 in a thrilling Pool D clash at the FIH Hockey World Cup Belgium & Netherlands 2026! 🏑🏆 Here are the moments from the big win! 📸🔥#DusSaalKaDabdaba… pic.twitter.com/TqyT1nKSAe — Hockey India (@TheHockeyIndia) August 19, 2026

भारतीय हॉकी संघाने पाकिस्तानचा ५-३ दारुण पराभव केला आहे. या थरारक विजयासह भारताने पॉईंट्स टेबलमध्ये दुसरे स्थान पटकावले आहे. तर दुसऱ्या फेरीत भारताने दिमाखात प्रवेश केला आहे. तर हॉकी वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्तानचे आव्हान संपुष्टात आले आहे. कर्णधार हरमनप्रीत आणि अभिषेकची चमकदार कामगिरी: भारताकडून कर्णधार हरमनप्रीत सिंग आणि स्टार फॉरवर्ड अभिषेक यांनी प्रत्येकी २ गोल केले.

Hockey Competition: हॉकीत चंदीगड अन् मध्य प्रदेशचा बोलबाला; महाराष्ट्राला मात्र पराभवाचा धक्का

दुसऱ्या सत्रात हरमनप्रीतने पुन्हा एकदा पेनल्टी कॉर्नरवरून गोल केला. पाकिस्तानकडून हन्नान शाहिदने पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला, परंतु अभिषेकने वैयक्तिक दुसरा गोल करत मध्यंतरापूर्वी भारताला ४-१ ने पुढे ठेवले. पाकिस्तानच्या सुफियान खानने गोल करत ही आघाडी ४-२ वर आणली.

इंग्लंडने वेल्सचा ८-२ असा पराभव केल्यामुळे भारताला पुढील फेरीत जाण्यासाठी या सामन्यात केवळ ड्रॉची गरज होती. मात्र, भारतीय संघाने विजय मिळवून पुढील फेरीतील आपले स्थान अधिक मजबूत केले. भारताने याआधी वेल्सचा ३-१ असा पराभव केला होता, तर इंग्लंडविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता. पाकिस्तानविरुद्धचा हा विजय मिळवून भारताने ‘पूल डी’ मध्ये ६ पॉईंट्ससह दुसरे स्थान मिळवले.

32 वर्षांची पराभवाची परंपरा कायम! FIH Hockey मध्ये भारताचा दारुण पराभव, इंग्लंडने थेट…

तिसऱ्या डावात हार्दिक सिंगने पेनल्टी स्ट्रोकवर गोल करत भारताला ५-२ अशा मजबूत स्थितीत आणून ठेवले. चौथ्या डावात पाकिस्तानच्या हन्नान शाहिदने आपला दुसरा गोल करत आघाडी ५-३ अशी कमी केली, मात्र भारतीय बचावाने उर्वरित वेळेत पाकिस्तानचे प्रयत्न उधळून लावले आणि भारताने दणदणीत विजय प्राप्त केला.

Web Title: Fih hockey world cup team india beat pakistan 5 3 points and get strong position at competition

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 19, 2026 | 09:25 PM

Topics:  

  • Hockey
  • Hockey Team India
  • India vs Pakistan

संबंधित बातम्या

Asian Games 2026 : हर कर मैदान फतेह ; ‘या’ पाच कारणांमुळे भारतासाठी खास राहिली ही स्पर्धा
1

Asian Games 2026 : हर कर मैदान फतेह ; ‘या’ पाच कारणांमुळे भारतासाठी खास राहिली ही स्पर्धा

Hockey: ओडिशाला सळो की पळो करून सोडलं! मेजर ध्यानचंद कॉलेजने उडवला थरकाप, थेट…
2

Hockey: ओडिशाला सळो की पळो करून सोडलं! मेजर ध्यानचंद कॉलेजने उडवला थरकाप, थेट…

IND vs PAK Final: अभिषेक-तिलकचा हल्लाबोल अन् शेवटच्या १२ चेंडूंचा थरार! पाकिस्तानला पुन्हा लोळवत टीम इंडियाने जिंकलं गोल्ड मेडल
3

IND vs PAK Final: अभिषेक-तिलकचा हल्लाबोल अन् शेवटच्या १२ चेंडूंचा थरार! पाकिस्तानला पुन्हा लोळवत टीम इंडियाने जिंकलं गोल्ड मेडल

Asian Games 2026 : ‘चक दे इंडिया’; अखेर पोरींनी करून दाखवलं, तब्बल 44 वर्षांनंतर भारतीय महिला हॉकी संघाने सुवर्ण जिंकले
4

Asian Games 2026 : ‘चक दे इंडिया’; अखेर पोरींनी करून दाखवलं, तब्बल 44 वर्षांनंतर भारतीय महिला हॉकी संघाने सुवर्ण जिंकले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.