Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पिंपरी चिंचवड शहर शिवसेनेची उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवरील निष्ठा अढळ…

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पडत्या काळात तमाम शिवसैनिक त्यांच्यावर अढळ निष्ठा ठेवून त्यांच्याच पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. पक्षात बंडखोरी करणाऱ्यांना शिवसैनिक कधीही माफ करणार नाही, असा निर्धारपूर्वक दावा शिवसेनेचे पिंपरी विधानसभा समन्वयक विजय गुप्ता यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 26, 2022 | 02:52 PM
पिंपरी चिंचवड शहर शिवसेनेची उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवरील निष्ठा अढळ…
Follow Us
Close
Follow Us:

पिंपरी : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पडत्या काळात तमाम शिवसैनिक त्यांच्यावर अढळ निष्ठा ठेवून त्यांच्याच पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. पक्षात बंडखोरी करणाऱ्यांना शिवसैनिक कधीही माफ करणार नाही, असा निर्धारपूर्वक दावा शिवसेनेचे पिंपरी विधानसभा समन्वयक विजय गुप्ता यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे. याबरोबरच बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांना परत या म्हणून भावनिक आवाहनदेखील त्यांनी केले आहे.

पत्रकात गुप्ता यांनी म्हटले आहे, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दादरच्या शिवतीर्थावर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना तुमच्या पदरात घालतोय, त्यांना सांभाळा, असे भावनिक आवाहन केले होते. ज्या बाळासाहेबांनी रिक्षावाला, टपरीवाला, पेपरवाला, कारखान्यावर पावती फाडणारा, खाजगी गाडीवर ड्रायव्हर असणार्‍या या बंडखोरांना आमदार, खासदार ते थेट मंत्री केलं. शिवसेनेच्या जिवावर ज्यांनी ४-४ आमदारक्या मिरवल्या, करोडो रुपयांची माया जमवली त्यांनी चक्क शिवसेना पक्षावर आणि धनुष्य बाण चिन्हावरच दावा ठोकण्याचा प्रयत्न केलाय. बाळासाहेबांनी शिवसैनिकांच्या साथीने रक्ताचं पाणी करून वाढवलेला अख्खा पक्षच स्वतःच्या नावावर करण्याचा आणि मालक होण्याचा डाव आखला हे तळपायाची आग मस्तकात जाणारी बाब आहे. निष्ठावंतपणाचे ढोंग करणारी ही मंडळी आता बाळासाहेब ठाकरेंच्या नावानेच उद्धव ठाकरे यांच्याशी गद्दारी करण्याचे पाप करीत होत आहे.

[read_also content=”मी फक्त दाेन ते तीन दिवस विरोधी पक्षात; रावसाहेब दानवेंनी राज्यात सत्ता स्थापनेचे दिले संकेत https://www.navarashtra.com/maharashtra/im-just-three-days-in-the-opposition-raosaheb-danve-signaled-the-establishment-of-power-in-the-state-nrdm-297239.html”]

पक्षात अनेक लोक येतात-जातात प्रत्येकाने विचार करूनच पुढचे पाऊल टाकावे. उद्या राजकारणात काहीही होवो पण या एका गोष्टीसाठी शिवसैनिक तुम्हाला कधीही माफ करणार नाही एवढं नक्की लक्षात ठेवा. भाजपाकडून वारंवार जाणीवपूर्वक त्रास दिला जात असतानाही उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून देशात सर्वोत्कृष्ट काम केले आहे. त्यांनी सत्तेचा मोह कधीही ठेवला नाही. त्यांच्यावर पिंपरी चिंचवड शहर शिवसेनेची निष्ठा अढळ राहील, असे या पत्रकात गुप्ता यांनी म्हटले आहे.

Web Title: Pimpri chinchwad city shiv senas loyalty to uddhav thackeray and shiv sena is unwavering nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 26, 2022 | 02:52 PM

Topics:  

  • aaditya thackeray
  • C M Uddhav Thackeray
  • NAVARASHTRA
  • Pimpri Chinchwad

संबंधित बातम्या

दसऱ्याच्या दिवशी हृदयद्रावक घटना; लिफ्टमध्ये अडकून 12 वर्षाच्या मुलाचा मृत्यू
1

दसऱ्याच्या दिवशी हृदयद्रावक घटना; लिफ्टमध्ये अडकून 12 वर्षाच्या मुलाचा मृत्यू

आदित्य बिरला ग्रुपचा ‘अल्का कलेक्शन’ लाँच! ‘दिल अभी भरा नही’च्या नव्या रुपातून सादर
2

आदित्य बिरला ग्रुपचा ‘अल्का कलेक्शन’ लाँच! ‘दिल अभी भरा नही’च्या नव्या रुपातून सादर

मुलांच्या जीवाशी खेळ! विद्यार्थ्यांची धोकादायक पद्धतीने वाहतूक; आरटीओ अन् वाहतूक पोलिसांनी केली मोठी कारवाई
3

मुलांच्या जीवाशी खेळ! विद्यार्थ्यांची धोकादायक पद्धतीने वाहतूक; आरटीओ अन् वाहतूक पोलिसांनी केली मोठी कारवाई

Pimpri-Chinchwad : फडणवीसांच्या पोस्टरमुळे शिवरायांचा अपमान झाल्याचा आरोप, अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल
4

Pimpri-Chinchwad : फडणवीसांच्या पोस्टरमुळे शिवरायांचा अपमान झाल्याचा आरोप, अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.