Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 24 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Moshi Garbage Depot Accident: मोशी दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना 10 लाखांची मदत; पहिली रक्कम खात्यात जमा

Moshi Garbage Depot Accident मोशी कचरा डेपो दुर्घटनेतील 9 मृतांच्या कुटुंबीयांना पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून प्रत्येकी 10 लाखांची आर्थिक मदत. अक्षय सावंत यांच्या कुटुंबीयांच्या खात्यात पहिली मदत जमा; इतरांची प्रक्रिया सुरू.

  • By anuradha sagar
Updated On: Jul 17, 2026 | 04:57 PM
Moshi Garbage Depot Accident, PCMC Compensation Moshi,

Moshi Garbage Depot Accident, PCMC Compensation Moshi,

Follow Us
Follow Us:

Moshi Garbage Depot Accident: मोशी येथील कचरा डेपोमध्ये 8 जुलै रोजी झालेल्या भीषण दुर्घटनेबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. या दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या 9 नागरिकांच्या कुटुंबीयांना पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून प्रत्येकी 10 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पीसीएमसीचे महापौर रवि लांडगे यांच्या निर्देशानुसार ही मदत तातडीने वितरित करण्याचे काम सुरू कऱण्यात आले आहे. मृत अक्षय सावंत यांच्या कुटुंबीयांच्या खात्यात मदतीची रक्कम जमा करण्यात आली आहे.

यासंदर्भात महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर मृत अक्षय सावंत (वय 32) यांच्या कुटुंबीयांच्या खात्यात 10 लाख रुपयांची आर्थिक मदत वर्ग करण्यात आली.

NCP Politics: पार्थ दादांचे राजकीय करिअर संपवण्याचा कट…! राष्ट्रवादीत लेटरबॉम्ब

मदतीची रक्कम कशी वाटप करण्यात आली?

10 लाख रुपयांच्या मदतीपैकी मृत अक्षय सावंत यांच्या पत्नी हर्षदा सावंत यांच्या खात्यात 34 टक्के रक्कम जमा करण्यात आली आहे. तर आई रेश्मा सावंत आणि वडील राजू सावंत यांच्या खात्यात प्रत्येकी 33 टक्के रक्कम वर्ग करण्यात आल्याचे सूर्यवंशी यांनी सांगितले.

इतर कुटुंबीयांनाही लवकरच मदत

विजय सुर्यवंशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेतील मृत भावेश वाणी, सुनील कोरके, सन्नी माने, महेश कुंभार, नागेश गायकवाड, रणजीत पाटील, राहुल गायकवाड आणि वामन कसबे यांच्या कुटुंबीयांच्या आवश्यक कागदपत्रांची पूर्तता जलद गतीने सुरू आहे. प्रक्रिया पूर्ण होताच त्यांच्या खात्यातही प्रत्येकी 10 लाख रुपयांची आर्थिक मदत जमा करण्यात येणार आहे.

बोटांचे ठसे जुळत नसल्याने ज्येष्ठांना मिळेना एसटीचे NCMC कार्ड; पर्यायी व्यवस्थाही नसल्याने अडचणींत वाढ

महापालिकेची भूमिका

आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी म्हणाले की, मोशी कचरा डेपो दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना तातडीने आर्थिक मदत उपलब्ध करून देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी वेगाने सुरू आहे. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता होताच संबंधित लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्याचे काम सुरू आहे.

अशा दु:खाच्या काळात बाधित कुटुंबांना सर्वतोपरी सहकार्य करण्यासाठी महानगरपालिका कटिबद्ध आहे. तसेच शहरातील सर्व कचरा व्यवस्थापन प्रकल्पांच्या सुरक्षा व्यवस्थेचा सर्वंकष आढावा घेऊन आवश्यक सुधारणा तातडीने राबविण्यात येत आहेत.

 

 

Web Title: Pimpri chinchwad mayor ravi landge commissioner vijay suryavanshi moshi tragedy financial aid

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 17, 2026 | 04:57 PM

Topics:  

  • building collapse
  • Moshi Building
  • PCMC News

संबंधित बातम्या

Cricket News: नाद खुळा! PCMC क्रिकेट लीगमध्ये ‘या’ टीम्सचा जलवा; २नाईन स्पोर्ट्‌स क्लब थेट…
1

Cricket News: नाद खुळा! PCMC क्रिकेट लीगमध्ये ‘या’ टीम्सचा जलवा; २नाईन स्पोर्ट्‌स क्लब थेट…

Cricket: क्रिकेटप्रेमींसाठी मोठी बातमी! पिंपरी-चिंचवडमध्ये रंगणार थरार! 16 संघ सहभागी अन्…
2

Cricket: क्रिकेटप्रेमींसाठी मोठी बातमी! पिंपरी-चिंचवडमध्ये रंगणार थरार! 16 संघ सहभागी अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.