Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra News : गोरगरिब धान्यापासून वंचित; मार्च संपत आला तरी रेशनदुकानांमध्ये धान्याचा पुरवठा नाही

गंगाखेड शहरात गुढीपाडवा आणि रमजान ईद यांसारख्या महत्त्वाच्या सणांच्या पार्श्वभूमीवर गोरगरीब नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Mar 27, 2026 | 05:39 PM
plight of the poor due to lack of food grains at the cheap food shops during Gudi Padwa and Ramadan

plight of the poor due to lack of food grains at the cheap food shops during Gudi Padwa and Ramadan

Follow Us
Close
Follow Us:

Nanded News : गंगाखेड : गुढीपाडवा व रमजान ईद सणाला गंगाखेडमधील गोरगरिबांना स्वस्त धान्यापासून वंचित रहावे लागले. गंगाखेड शहरात गुढीपाडवा आणि रमजान ईद यांसारख्या महत्त्वाच्या सणांच्या पार्श्वभूमीवर गोरगरीब नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. मार्च महिना संपत आला तरी स्वस्त धान्य दुकानांमध्ये अद्याप धान्याचा पुरवठा न झाल्याने अनेक कुटुंबांना धान्याविना रहावे लागत आहे. शहरातील (Nanded News) अनेक स्वस्त धान्य दुकानदारांनी सांगितले की, अद्याप धान्यच आलेले नाही. त्यामुळे नागरिकांना धान्य वितरित करणे शक्य होत नाही. सणासुदीच्या काळात तरी वेळेवर धान्य मिळेल, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली होती; मात्र ती पूर्ण झाली नाही. याबाबत गोदामपालांशी संपर्क साधला असता त्यांनी स्पष्ट केले की, आमच्याकडे वरूनच धान्य आलेले नाही. त्यामुळे पुरवठा करणे शक्य नाही. यामध्ये आमचा कोणताही संबंध नाही.

 

या वक्तव्यामुळे प्रशासनातील समन्वयाचा अभाव स्पष्ट होत आहे. गोदामपाल आणि वाहतूक ठेकेदाराच्या नियोजनशून्य कारभारामुळे दुकानदाराला वेळेत धान्य पुरवठा होत नाही. मार्च महिन्याची २४ तारीख उजाडली असतानाही गंगाखेड शहरातील एकाही दुकानत धान्य पोहोच झालेले नव्हते. तसेच ग्रामीण भागातील ५० टक्के दुकानात अजून धान्य पोहच झालेले नाही. अन्नसुरक्षा कायदा २०१३ मध्ये नमूद केल्याप्रमाणे ७ तारीख अन्न दिन आणि ७ ते १५ अन्न सप्ताह साजरा करून रास्त भाव दुकानातून लाभार्थ्यांना शंभर टक्के धान्य वाटप होणे अपेक्षित आहे.

हे देखील वाचा : झिरवळांना यावेळीही माफी की राजीनामा? CM फडणवीसांनी पहिल्यांदाच दिली आक्षेपार्ह व्हिडिओवर प्रतिक्रिया

त्यासाठी ७ तारखेच्या अगोदर रास्त भाव दुकानात धान्य पोहोच करणे ही वाहतूक ठेकेदार व संबंधित अधिकारी यांची जबाबदारी आहे असे असतानाही धान्य पुरवठा वेळेवर होत नाही. शासनाने तातडीने लक्ष देऊन धान्याचा पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. लाभधारक दुकानदारांना फोन करुन व दुकानावर चकरा मारुन परेशान करत असुन आम्हाला राशन द्यायचं कि नाही अशा उर्मट भाषेत लाभार्थी दुकानदारास बोलत आहेत.

हे देखील वाचा : कार्ला येथे पालखी सोहळ्यानंतर दोन गटात भीषण हाणामारी; दगडफेकीने उडाली खळबळ

उशीरा धान्य येण्याचा फटका रास्त भाव दुकानदारांना बसला असुन लाभधारकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. गंगाखेड तालुक्यामध्ये एकुण १६३ रास्तभाव दुकाने आहेत त्यापैकी शहरात १९ दुकाने असुन शासनाकडुन या दुकानदारांना द्वारपोच धान्य मिळत असते. नियमाने एक ते दोन तारखेलाच हे धान्य गोदामातुन प्रत्येक रास्तभाव दुकानावर पोहोचणे आवश्यक आहे परंतु २३ तारीख उलटुनही रास्त भाव दुकानावर धान्य पोहच झाले नाही या प्रकाराकडे वरीष्ठ अधिकारी यांनी लक्ष देऊन लवकरात लवकर धान्य देवुन दुकानदार व लाभार्थ्यांची होणारी घुसमट थांबवावी अशी मागणी स्वस्त धान्य दुकानदारांकडून होत आहे.

Web Title: Plight of the poor due to lack of food grains at the cheap food shops during gudi padwa and ramadan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 27, 2026 | 05:39 PM

Topics:  

  • Hingoli News
  • Nanded
  • nanded news

संबंधित बातम्या

Nanded News : नांदेडमध्ये पेट्रोलचा कोणताही तुटवडा नाही; जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्टपणे दिले ‘हे’ निर्देश
1

Nanded News : नांदेडमध्ये पेट्रोलचा कोणताही तुटवडा नाही; जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्टपणे दिले ‘हे’ निर्देश

Maharashtra Politics : परभणीमध्ये महायुतीत नाराजीनाट्य; भाजपने डावलल्याने शिंदे शिवसेना गटाची नाराजी
2

Maharashtra Politics : परभणीमध्ये महायुतीत नाराजीनाट्य; भाजपने डावलल्याने शिंदे शिवसेना गटाची नाराजी

धरणे भरले तरीही हिंगोलीत पाणीटंचाईचे सावट; थकबाकीमुळे शहरांचा पाणीपुरवठा धोक्यात
3

धरणे भरले तरीही हिंगोलीत पाणीटंचाईचे सावट; थकबाकीमुळे शहरांचा पाणीपुरवठा धोक्यात

Maharashtra Politics : नांदेड भाजपात ‘गटबाजीचा स्फोट’? पदनियुक्तीत निष्ठावंतांना डावलल्याची खदखद सुरूच
4

Maharashtra Politics : नांदेड भाजपात ‘गटबाजीचा स्फोट’? पदनियुक्तीत निष्ठावंतांना डावलल्याची खदखद सुरूच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.