Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कल्याण बाजारपेठेत पोलिसांची मोठी कारवाई; गर्दीचा फायदा घेत मोबाईल चोरणारे चोरटे गजाआड

कल्याण बाजारपेठेत गर्दीचा फायदा घेत मोबाईल चोरणाऱ्या दोन चोरट्यांना अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. शहबाज शेख आणि इरफान शेख अशी या सराईत चोरट्यांची नावे आहेत. कल्याण एपीएमसी मार्केटमध्ये भाजी आणि फळे खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांचे आणि भाजी विक्रेत्यांचे मोबाईल लंपास करत होते. याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 28, 2024 | 12:45 PM
कल्याण बाजारपेठेत पोलिसांची मोठी कारवाई; गर्दीचा फायदा घेत मोबाईल चोरणारे चोरटे गजाआड

कल्याण बाजारपेठेत पोलिसांची मोठी कारवाई; गर्दीचा फायदा घेत मोबाईल चोरणारे चोरटे गजाआड

Follow Us
Follow Us:

कल्याण बाजारपेठेत पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. बाजारपेठेत गर्दीचा फायदा घेत मोबाईल चोरणाऱ्या दोन चोरट्यांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी या चोरट्यांकडून सहा मोबाईल एक दुचाकी हस्तगत केली आहे. दोन्ही चोरटे बाजापेठेत गर्दीचा फायदा घेऊन भाजीविक्रेते आणि ग्राहक यांचे मोबाईल चोरत होते. पहाटेच्या सुमारास, सकाळी तसेच रात्रीचा सुमारास या घटना घडत होत्या. या चोरांमुळे नागरिक प्रचंड हैराण झाले होते. आता अखेर पोलिसांनी या मोबाईल चोरांना बेड्या ठोकल्या आहेत. या चोरट्यांकडून पोलिसांनी सहा मोबाईल आणि एक दुचाकी हस्तगत केली आहे.

हेदेखील वाचा- मुंबईकरांनो लक्ष द्या! पश्चिम रेल्वेवर आजपासून 35 दिवसांचा मेगाब्लॉक; आत्ताच प्रवासाचं नियोजन करा

याबाबत सविस्तर माहिती अशी की, कल्याण एपीएमसी मार्केटमध्ये भाजी आणि फळे खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांचे आणि भाजी विक्रेत्यांचे मोबाईल गर्दीचा फायदा घेत चोरणाऱ्या सराईत चोरट्यांना कल्याण बाजारपेठत पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. शहबाज शेख आणि इरफान शेख अशी या सराईत चोरट्यांची नावे आहेत. या दोघांविरोधात याआधी देखील मोबाईल चोरीचे गुन्हे दाखल आहेत. या चोरट्यांकडून पोलिसांनी सहा मोबाईल आणि एक दुचाकी हस्तगत केली आहे. शहबाज शेख आणि इरफान शेख या दोघांमुळे भाजीविक्रेते तसेच भाजी फळे खरेदी करण्यासाठी येणारे नागरिक प्रचंड हैराण झाले होते. मात्र आता अखेर पोलिसांनी या दोघांना अटक केली आहे.

हेदेखील वाचा- दक्षिण मुंबईतील काळबादेवी परिसरात कोसळली 7 फूट उंच भिंत; दोघांचा जागीच मृत्यू

कल्याण एपीएमसी मार्केटमध्ये भाजीविक्रेते तसेच भाजी फळे खरेदी करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांचे मोबाईल चोरीला गेल्याच्या अनेक घटना घडल्या होत्या. पहाटेच्या सुमारास, सकाळी तसेच रात्रीचा सुमारास या घटना घडत होत्या. गर्दीचा फायदा घेत चोरटे कल्याण एपीएमसी मार्केटमध्ये भाजी आणि फळे खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांचे आणि भाजी विक्रेत्यांचे मोबाईल लंपास करत होते. याचप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर याप्रकरणी बाजारपेठ पोलिसांनी तपास सुरू केला.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेशसिंग गौड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी नवनाथ रूपवते बाबासाहेब डुकले, ए एस आय सुरेश पाटील, हवालदार सचिन साळवी यांच्या पथकाने चोरट्याचा शोध सुरू केला. सराईत चोरटा शहबाज शेख याला गोविंदवाडी परिसरातून अटक करण्यात आली आहे, तर त्याचा साथीदार इरफान हा एपीएमसी मार्केटमध्ये येणार असल्याची माहिती मिळताच सापळा रचत इरफानला देखील पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. शहबाज शेख आणि इरफान शेख या दोघांविरोधात याआधी देखील मोबाईल चोरीचे गुन्हे दाखल आहेत. या दोघांकडून चोरीची दुचाकी आणि सहा महागडे मोबाईल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. शहबाज आणि त्याचा साथीदार इरफान याने आणखी मोबाईल चोरले असावेत असा संशय पोलीसांना असून पोलीस पुढील तपास करत आहेत .

Web Title: Police arrested mobile thief in kalyan market

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 28, 2024 | 12:45 PM

Topics:  

  • Kalyan Police
  • Thane news

संबंधित बातम्या

Thane Dahi handi 2026: संकल्प दहीहंडीचा थरार! विश्वविक्रम मोडणाऱ्या गोविंदांना मिळणार २१ लाख
1

Thane Dahi handi 2026: संकल्प दहीहंडीचा थरार! विश्वविक्रम मोडणाऱ्या गोविंदांना मिळणार २१ लाख

Thane News: ठाण्यात दहीहंडीच्या मडक्यांना मोठी मागणी; महागाईमुळे यंदा किमतीत किमान ५० रुपयांची वाढ
2

Thane News: ठाण्यात दहीहंडीच्या मडक्यांना मोठी मागणी; महागाईमुळे यंदा किमतीत किमान ५० रुपयांची वाढ

Thane Dahi Handi 2026: रेमंडमध्ये सलग दुसऱ्या वर्षी दहीहंडीचा उत्साह; ११ थरांसाठी २१ लाखांचे बक्षीस
3

Thane Dahi Handi 2026: रेमंडमध्ये सलग दुसऱ्या वर्षी दहीहंडीचा उत्साह; ११ थरांसाठी २१ लाखांचे बक्षीस

SIR Voter List: मतदारांनो, नाव तपासा! SIR ची प्रारूप यादी प्रसिद्ध, नागरिकांना नाव तपासण्याचे आवाहन
4

SIR Voter List: मतदारांनो, नाव तपासा! SIR ची प्रारूप यादी प्रसिद्ध, नागरिकांना नाव तपासण्याचे आवाहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.