
Thane News: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
तरुण आणि विविध ग्राहकवर्ग असलेले ठाणे हे वेगाने विकसित होणारे शहरी केंद्र असून सुमारे 18,000 चौ. फूट क्षेत्रफळात विस्तारलेल्या या दालनामध्ये पुरुष, महिला आणि मुलांसाठी युनिक्लोची लाइफवेअर उत्पादनश्रेणी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या दालनाची आधुनिक अंतर्गत रचना आणि युनिक्लोची वैशिष्ट्यपूर्ण दृश्यात्मक ओळख यांमुळे ग्राहकांना खरेदीचा सहज, आनंददायी आणि आकर्षक अनुभव मिळणार आहे.
युनिक्लो इंडियाचे मुख्य वित्तीय अधिकारी आणि मुख्य कामकाज अधिकारी केन्जी इनोउए म्हणाले, “ठाण्यातील लेक शोअर येथे आमचे नवीन दालन सुरू करताना आम्हाला आनंद होत आहे. भारतभर युनिक्लोच्या सातत्यपूर्ण विस्ताराच्या प्रवासातील हे आणखी एक महत्त्वाचे पाऊल आहे. मुंबई महानगर प्रदेशाचा वेगाने विकसित होणारा भाग म्हणून ठाणे ही आमच्यासाठी एक महत्त्वाची बाजारपेठ आहे आणि शहरातील अधिकाधिक ग्राहकांपर्यंत लाइफवेअर पोहोचवण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. स्थानिक समुदायाचा एक भाग बनण्यासोबतच ग्राहकांच्या बदलत्या गरजा पूर्ण करणारे आणि दैनंदिन जीवन अधिक समृद्ध करणारी उच्च दर्जाची, उपयुक्त आणि कार्यक्षम वस्त्रप्रावरणे उपलब्ध करून देण्याची आम्हाला अपेक्षा आहे.”
दालनाच्या उद्घाटनानिमित्त ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स देण्यात आल्या. रांगेतील पहिल्या 200 ग्राहकांना युनिक्लोची राउंड मिनी शोल्डर बॅग आणि थर्ड वेव्ह कॉफी देण्यात आली. तसेच, 16 ऑक्टोबर रोजी 6,000 रु. किंवा त्याहून अधिक किमतीची खरेदी करणाऱ्या ग्राहकांनाही खास टोट बॅग भेट म्हणून देण्यात आली.
या स्टोअरमध्ये युनिक्लोचा 2026 चा फॉल/विंटर संग्रह उपलब्ध आहे. यामध्ये कॅज्युअल आऊटरवेअर, फ्लीस, निटवेअर, हीटटेक आणि पफटेक यांसारख्या त्या त्या हंगामानुसार उपयुक्त उत्पादनांचा समावेश आहे. आधुनिक शहरी जीवनशैलीसाठी दैनंदिन वापरात आराम, सहजता आणि विविध प्रकारे वापरण्याची सुविधा मिळावी या दृष्टीने ही उत्पादने तयार करण्यात आली आहेत.
युनिक्लो आणि त्याच्या विविध उत्पादनसंग्रहांविषयी अधिक माहितीसाठी कृपया कंपनीच्या वेबसाइटला भेट द्या किंवा युनिक्लो इंडिया अधिकृत ॲप डाउनलोड करा.
Ans: ठाण्यातील लेक शोअर येथे युनिक्लोचे पहिले स्टोअर सुरू करण्याची घोषणा करण्यात आली आहे.
Ans: पुरुष, महिला आणि मुलांसाठी लाइफवेअर कपडे तसेच फॉल/विंटर २०२६ संग्रहातील उत्पादने मिळणार आहेत.
Ans: पहिल्या २०० ग्राहकांना राउंड मिनी शोल्डर बॅग आणि कॉफी देण्यात आली. १६ ऑक्टोबरला ६,००० रुपये किंवा अधिक खरेदीवर टोट बॅग भेट देण्याची ऑफर होती.