Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्मशानभूमीतील लाकडावर रक्ताचे डाग; ‘त्या’ खुनाचा लागला छडा

स्मशानभूमीतील चितेजवळ सापडलेल्या लाकडावरील रक्ताच्या डागावरुन पुणे ग्रामीण पोलिसांनी खुनाचा गु्न्हा उघडकीस आणला आहे. इंदापूरमधील मौजे तावशी गावात ही घटना घडली.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 26, 2024 | 02:39 PM
स्मशानभूमीतील लाकडावर रक्ताचे डाग; ‘त्या’ खुनाचा लागला छडा
Follow Us
Follow Us:

पुणे : पुण्यात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे, पुण्यात दररोज गुन्हेगारीच्या घटना उघडकीस येत आहेत. यामुळे नागरिकांसोबतचं पोलिसही हैराण झाले आहेत. अशातच आता स्मशानभूमीतील चितेजवळ सापडलेल्या लाकडावरील रक्ताच्या डागावरुन पुणे ग्रामीण पोलिसांनी खुनाचा गु्न्हा उघडकीस आणला आहे. इंदापूरमधील मौजे तावशी गावात ही घटना घडली. ज्येष्ठ नागरिकाच्या खून प्रकरणात पोलिसांनी दोघांना अटक केली असून, कोणतेही धागेदोरे हाती नसताना पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपास करुन या खुनाच्या गुन्ह्याचा छडा लावला आहे.

हरिभाऊ धुराजी जगताप (वय ७४ रा. गंगाखेड, जि. परभणी) असे खून झालेल्यांचे नाव आहे. याप्रकरणी दादासाहेब मारुती हरिहर (वय ३० रा. गोखळी, ता. फलटण, जि. सातारा) आणि त्याचा मित्र विशाल सदाशिव खिलारे (वय २३ , रा. गोखळी, ता. फलटण, जि. सातारा ) यांना अटक करण्यात आली आहे.

वालचंदनगर परिसरात तावशी गावातील स्मशानभुमीत एक मृतदेह जळत आहे. पण, चितेजवळ पडलेल्या लाकडावर मोठ्या प्रमाणात रक्ताचे डाग पडले आहेत, अशी माहिती पोलीस पाटलांनी १६ नोव्हेंबर रोजी पोलिसांना दिली. नंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जाळीवर पुर्णपणे जळालेली हाडे, तसेच काही अंतरावर रक्त सांडलेले दिसत होते. चितेजवळ पडलेल्या लाकडावरही रक्ताचे डाग दिसत होते. सरणावर फक्त काही हाडे उरली होती. यामुळे नेमका प्रकार लक्षात येत नव्हता. मात्र, रक्ताचे डाग ताजे असल्याने हा खूनाचा प्रकार असू शकतो, असा संशय पोलिसांना होता. हे प्रकरण गुंतागुंतीचे असल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथकही तपासात सहभागी झाले होते. दोन्ही पथकांनी इंदापूर, माळशिरस आणि फलटण तालुक्यात तपास केला. मात्र, काही धागेदोरे हाती लागले नव्हते.

त्याचदरम्यान, पोलीस या लाकडांबाबत माहिती घेताना ती लाकडे एका वखारीमधील असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर फलटण येथील गुणवरे गावातील एका वखारीत पोलिसांचे पथक पोहोचले. आरोपी दादासाहेब आणि विशाल हे दोघे अंत्यविधीसााठी लाकडे घेऊन गेल्याची माहिती तपासात मिळाली. त्यानंतर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली. तेव्हा त्यांनी खुनाची कबुली दिली.

पोलीस अधिक्षक पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे, कुलदीप संकपाळ यांच्या याप्रकरणाचा तपास केला.

हे सुद्धा वाचा : पुण्यात मोठा दरोडा टाकण्याचा प्लॅन फसला; ‘चूहा गँग’च्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळला

जगताप नात्यातील एका महिलेकडे वाईट नजरेने बघत असल्याचा संशय आरोपी दादासाहेबला संशय होता. त्यामुळे त्याने मित्र विशाल याच्याशी संगनमत केले. जगताप यांना १५ नोव्हेंबर रोजी माण तालुक्यातील सतोबाची यात्रा येथे जाऊ, असे सांगितले. त्यानंतर इंदापुर येथील तावशी गावातील स्मशानभुमीजवळ त्यांनी गाडी थांबवली. तेथे जगताप यांच्या डोक्यात दांडके मारुन खून केला. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्यांनी मृतदेह स्मशानभुमीत जाळून टाकला.

Web Title: Police have arrested two people in the case of murder of a senior citizen in indapur nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 26, 2024 | 02:39 PM

Topics:  

  • crime news

संबंधित बातम्या

Pune News : पिंपळवंडीत भरदिवसा घरफोडी; शिक्षिकेच्या घराचे कुलूप तोडून सव्वातीन लाखांचा ऐवज लंपास
1

Pune News : पिंपळवंडीत भरदिवसा घरफोडी; शिक्षिकेच्या घराचे कुलूप तोडून सव्वातीन लाखांचा ऐवज लंपास

जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूची सेक्सटॉर्शन आणि खंडणीप्रकरणी मोठी कारवाई; क्राईम ब्रँचकडून १५०० पानांचे दोषारोपपत्र दाखल!
2

जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूची सेक्सटॉर्शन आणि खंडणीप्रकरणी मोठी कारवाई; क्राईम ब्रँचकडून १५०० पानांचे दोषारोपपत्र दाखल!

Suicide News : इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; शाळेतून उशीरा येण्याचे कारण विचारले अन् नंतर…
3

Suicide News : इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; शाळेतून उशीरा येण्याचे कारण विचारले अन् नंतर…

धक्कादायक ! गुंतवणुकीतून चांगला परतावा देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाला गंडा; 20 लाखांची केली फसवणूक
4

धक्कादायक ! गुंतवणुकीतून चांगला परतावा देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाला गंडा; 20 लाखांची केली फसवणूक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.