Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime: पुण्यात खळबळ! भाचा गेला, सून माहेरी निघून गेली… मामाच्या मनात पेटला संताप, पुढे घडलं धक्कादायक

Pune Crime: पुण्यातील महंमदवाडी परिसरात कौटुंबिक वादातून ४३ वर्षीय सैफन बाबूलाल सय्यद यांच्या मृत्यूची घटना समोर आली आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, हनुमंत ऊर्फ सागर सुग्रीव कांबळे याने सय्यद यांच्या डोक्यात दगडाने हल्ला केल्याचा आरोप आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Aug 11, 2026 | 03:48 PM
कोल्हापुरात भररस्त्यात नगरसेविकेचा विनयभंग; अश्लील हावभाव करत शिवीगाळही केली, आरोपीविरोधात गुन्हा दाखल

कोल्हापुरात भररस्त्यात नगरसेविकेचा विनयभंग; अश्लील हावभाव करत शिवीगाळही केली, आरोपीविरोधात गुन्हा दाखल

Follow Us
Follow Us:
  • महंमदवाडीत कौटुंबिक वादातून ४३ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
  • २५ वर्षीय संशयिताला पोलिसांकडून अटक
  • घटनेनंतर आरोपी स्वतः पोलीस ठाण्यात पोहोचल्याचा दावा
Man Arrested for Alleged Murder of Nephew’s Father-in-Law: पुण्यातील महंमदवाडी परिसरात रविवारी रात्री घडलेल्या एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. कौटुंबिक वादातून एका तरुणाने आपल्या भाच्याच्या सासऱ्याच्या डोक्यात मोठा दगड घालून त्यांचा जीव घेतल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, घटना घडल्यानंतर आरोपी स्वतःच रक्ताने माखलेल्या कपड्यांमध्ये पोलीस ठाण्यात पोहोचला आणि त्याने पोलिसांसमोर खुनाची कबुली दिली.

ही घटना रात्री साडेदहाच्या सुमारास महंमदवाडी येथील लक्ष्मी पार्कजवळ असलेल्या टेकडीच्या भागात घडली. या घटनेत सैफन बाबूलाल सय्यद (४३) यांचा मृत्यू झाला. ते हडपसरमधील राजीव गांधी कॉलनी, तरवडे वस्ती येथे राहत होते. या प्रकरणात हनुमंत ऊर्फ सागर सुग्रीव कांबळे (२५), रा. आशीर्वाद पार्क, महंमदवाडी, याला पोलिसांनी अटक केली आहे. Pune Crime:

पोलिसांच्या प्राथमिक तपासात कौटुंबिक वादातून हा प्रकार घडल्याचे स्पष्ट झाले आहे. सैफन सय्यद यांची मुलगी सना हिचे लग्न लखन काळोखे याच्याशी झाले होते. लखन हा आरोपी हनुमंत कांबळेचा भाचा होता. मात्र, काही काळापूर्वी लखनचा मृत्यू झाला. त्यानंतर सना आणि तिच्या सासरच्या मंडळींमध्ये वारंवार मतभेद होऊ लागले होते.

नेमकं काय प्रकरण?

रविवारीही घरातील याच वादाला पुन्हा तोंड फुटले. परिस्थिती चिघळल्यानंतर सना घरातून बाहेर पडली आणि जवळच्या जंगलाच्या दिशेने निघून गेली. मुलगी कुठे गेली याची चिंता असल्याने तिचे वडील सैफन सय्यद तिचा शोध घेण्यासाठी बाहेर पडले. त्याच वेळी आरोपी हनुमंत कांबळेही तिचा शोध घेत असल्याची माहिती आहे.

दोघेही लक्ष्मी पार्कजवळील टेकडीवर पोहोचले. सना हिच्याबाबत बोलताना त्यांच्यात वाद सुरू झाला. सुरुवातीला झालेली शाब्दिक बाचाबाची काही वेळातच हातघाईपर्यंत पोहोचली. राग अनावर झाल्यानंतर हनुमंतने जवळ पडलेला मोठा दगड उचलला आणि सैफन यांच्या डोक्यावर जोरदार प्रहार केला.

आरोपीला अटक

दगडाचा घाव डोक्यात बसल्याने सैफन गंभीर जखमी झाले. मात्र, मदत मिळण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. घटनास्थळी काही काळ शांतता होती. त्यानंतर आरोपी हनुमंत तेथून निघून थेट काळेपडळ पोलीस ठाण्याकडे गेला.

कामाच्या शोधात आलेल्या तरुणाची आत्महत्या; ट्रकखाली येऊन उडी मारली अन्…

रात्री साडेअकराच्या सुमारास तो पोलीस ठाण्यात दाखल झाला. त्याच्या कपड्यांवर रक्ताचे डाग होते आणि गळ्यावरही जखम दिसत होती. तो रडत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. ड्युटीवर असलेल्या महिला पोलीस अंमलदार विजया जयदीप चव्हाण यांनी त्याची चौकशी केली. त्यावेळी आपणच सैफन सय्यद यांना मारल्याचे त्याने सांगितले.

घटनास्थळी धाव

आरोपीच्या कबुलीनंतर पोलिसांनी विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली. सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित शेठे आणि त्यांच्या पथकाने टेकडीवर जाऊन पाहणी केली. तेथे सैफन सय्यद रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळून आले. त्यानंतर पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली.

या प्रकरणी महिला पोलीस अंमलदार विजया चव्हाण यांच्या तक्रारीवरून भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

पुणे हादरलं! रक्तबंबाळ अवस्थेत पोलीस स्टेशनमध्ये आरडाओरड; मी खून केला म्हणाला अन्…

कौटुंबिक वाद किती टोकाला जाऊ शकतो, याची जाणीव करून देणारी ही घटना आहे. एका जुन्या कौटुंबिक प्रश्नातून सुरू झालेला वाद काही मिनिटांत हिंसक झाला आणि त्यात एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला. सध्या या संपूर्ण घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण अब्दागिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या घटनेमागील इतर कारणे, वादाची नेमकी पार्श्वभूमी आणि त्या रात्री घडलेल्या घटनांची अधिक माहिती तपासातून समोर येणार आहे.

Web Title: Pune mahamadwadi laxmi park uncle killed nephew father in law

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 11, 2026 | 03:45 PM

Topics:  

  • crime news
  • maharashtra news
  • pune crime case

संबंधित बातम्या

जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूची सेक्सटॉर्शन आणि खंडणीप्रकरणी मोठी कारवाई; क्राईम ब्रँचकडून १५०० पानांचे दोषारोपपत्र दाखल!
1

जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूची सेक्सटॉर्शन आणि खंडणीप्रकरणी मोठी कारवाई; क्राईम ब्रँचकडून १५०० पानांचे दोषारोपपत्र दाखल!

Suicide News : इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; शाळेतून उशीरा येण्याचे कारण विचारले अन् नंतर…
2

Suicide News : इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; शाळेतून उशीरा येण्याचे कारण विचारले अन् नंतर…

धक्कादायक ! गुंतवणुकीतून चांगला परतावा देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाला गंडा; 20 लाखांची केली फसवणूक
3

धक्कादायक ! गुंतवणुकीतून चांगला परतावा देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाला गंडा; 20 लाखांची केली फसवणूक

Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं ! महिन्याभराच्या बाळाचा पैशांत सौदा; आईच्या तक्रारीनंतर धक्कादायक प्रकार उघड
4

Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं ! महिन्याभराच्या बाळाचा पैशांत सौदा; आईच्या तक्रारीनंतर धक्कादायक प्रकार उघड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.