Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बारामतीत ‘बुलेट’ चोरट्यांचा धुमाकूळ, तीन बुलेट लंपास; CCTV फुटेज पोलिसांच्या हाती

बारामती तालुका पोलीस ठाणे हद्दीतही तीन बुलेट चोरीच्या घटना घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या पार्श्वभूमीवर बुलेट मोटारसायकलींना लक्ष्य करणारी टोळी सक्रिय असण्याची शक्यता आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 11, 2026 | 05:59 PM
मुलाकडून आईला कड्याने मारहाण

मुलाकडून आईला कड्याने मारहाण

Follow Us
Follow Us:

बारामती : बारामती शहर व परिसरात रॉयल एनफिल्ड बुलेट मोटारसायकली चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने वाहनधारकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. बारामती शहर पोलीस ठाणे हद्दीत अलीकडच्या काळात तीन बुलेट चोरीस गेल्या असून, बारामती तालुका पोलीस ठाणे हद्दीतही तीन बुलेट चोरीच्या घटना घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या पार्श्वभूमीवर बुलेट मोटारसायकलींना लक्ष्य करणारी टोळी सक्रिय असण्याची शक्यता असून, संबंधित चोरट्याचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती आले असून त्या आधारे पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरविली आहेत.

बारामती शहर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यानुसार, ६ ऑगस्ट रोजी रात्री दहा ते ७ ऑगस्ट रोजी सकाळी दहा या कालावधीत प्रगतीनगर येथील प्रभावती अपार्टमेंटच्या पार्किंगमधून दोन रॉयल एनफिल्ड मोटारसायकली चोरीस गेल्या. यामध्ये एमएच-४२/एव्ही-२१२१ क्रमांकाची क्लासिक ३५० आणि एमएच-४२/बीके-०७४९ क्रमांकाची हंटर ३५० या सुमारे २ लाख ६० हजार रुपये किमतीच्या मोटारसायकलींचा समावेश आहे. त्यानंतर ९ ऑगस्टच्या रात्री ११ ते १० ऑगस्टच्या सकाळी सात या कालावधीत तांदुळवाडी रोड, के-मार्टच्या पाठीमागील प्रगतीनगर येथील आर्या पॅराडाईस अपार्टमेंटच्या पार्किंगमधून एमएच-४२/बीके-९७०९ क्रमांकाची मेटल ग्रे रंगाची रॉयल एनफिल्ड क्लासिक ३५०, सुमारे १ लाख १० हजार रुपये किमतीची, चोरीस गेली.

चेन लॉकचा वापर करावा

दरम्यान, नागरिकांनी वाहन पार्क करताना केवळ हँडल लॉकवर अवलंबून न राहता डिस्क लॉक, व्हील लॉक किंवा चेन लॉकचा वापर करावा. शक्य असल्यास वाहन सीसीटीव्हीच्या निगराणीखाली व प्रकाश असलेल्या ठिकाणी पार्क करावे. वाहनामध्ये जीपीएस ट्रॅकर किंवा चोरीविरोधी अलार्म बसविण्याचे आवाहनही पोलिसांनी केले आहे.

हे सुद्धा वाचा : दारु नका बनवू, रोजगार करा! पुणे ग्रामीण पोलीस ‘त्या’ शंभर कुटुंबांना दाखवणार नवी वाट

माहिती देणाऱ्याची ओळख गोपनीय ठेवू

या घटनांनंतर बारामती शहर पोलिसांनी परिसरातील विविध ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून, त्याचे बारकाईने विश्लेषण सुरू आहे. संशयित चोरट्यांच्या हालचालींबाबत महत्त्वपूर्ण माहिती पोलिसांच्या हाती लागली असून, त्यांच्या शोधासाठी तपास पथके कार्यरत आहेत. संशयास्पद व्यक्ती किंवा वाहन आढळल्यास नागरिकांनी तत्काळ बारामती शहर पोलीस ठाणे अथवा डायल ११२ वर संपर्क साधावा. माहिती देणाऱ्याची ओळख गोपनीय ठेवण्यात येईल, असे, आवाहन पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांनी केले आहे.

Web Title: Incidents of bullet motorcycle theft have occurred in baramati

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 11, 2026 | 05:59 PM

Topics:  

  • Baramati Crime
  • CM Devedra Fadnavis
  • crime news

संबंधित बातम्या

बेपत्ता अल्पवयीनाचा नदीपात्रात आढळला मृतदेह; नातेवाईकांचा पोलिसांच्या तपासावर आक्षेप
1

बेपत्ता अल्पवयीनाचा नदीपात्रात आढळला मृतदेह; नातेवाईकांचा पोलिसांच्या तपासावर आक्षेप

Police Destroy Seized Drugs: छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई! ३४३ किलोहून अधिक गांजाची विल्हेवाट
2

Police Destroy Seized Drugs: छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई! ३४३ किलोहून अधिक गांजाची विल्हेवाट

Crime News: मेरठच्या ‘ब्लू ड्रम’ हत्याकांडाचा आज निकाल; मुस्कान-साहिलच्या शिक्षेचा मार्ग मोकळा होणार?
3

Crime News: मेरठच्या ‘ब्लू ड्रम’ हत्याकांडाचा आज निकाल; मुस्कान-साहिलच्या शिक्षेचा मार्ग मोकळा होणार?

कसायाचा भयंकर प्रकार! महिलेचा गळा चिरला अन् तुकडे करून कालव्यात फेकले; टॅटूवरुन झाला खुलासा
4

कसायाचा भयंकर प्रकार! महिलेचा गळा चिरला अन् तुकडे करून कालव्यात फेकले; टॅटूवरुन झाला खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.