Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

धक्कादायक ! पती-पत्नीमधील वाद गेला टोकाला; पत्नीची हत्या करून पती फरार

संशयित पती विलास गायकवाड हा घटनास्थळावरून फरार झाला. घटनेची माहिती मिळताच कळवण पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला असून, फरार पतीच्या शोधासाठी विशेष पथक रवाना करण्यात आले आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 11, 2026 | 04:06 PM
सासूने मोलकरणीला दिली सुनबाईच्या हत्येची सुपारी; तीन लाखांत सौदेबाजी केली अन्...

सासूने मोलकरणीला दिली सुनबाईच्या हत्येची सुपारी; तीन लाखांत सौदेबाजी केली अन्...

Follow Us
Follow Us:

नाशिक : कळवण तालुक्यातील मानूर येथे पती-पत्नीमधील वादातून पत्नीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी दुपारी घडली. बहिणीच्या घरी पाहुणे म्हणून आलेल्या दाम्पत्यामध्ये वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर पतीने पत्नीला मारहाण करून ठार केल्याचा प्राथमिक आरोप असून, त्यानंतर पती फरार झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बोरपाडा पोस्ट पिंपळे खुर्द येथील रहिवासी विलास दत्तू गायकवाड आणि त्यांची पत्नी अंजना विलास गायकवाड हे मानूर येथे त्यांच्या बहिणीच्या घरी पाहुणे म्हणून आले होते. सोमवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घरात कोणी नसल्याचा फायदा घेत विलास गायकवाड याने पत्नी अंजना यांच्यावर छाती, पोट व पाठीवर जबर मारहाण केली, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. या मारहाणीत अंजना यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

हत्येमागील अन्य कारणांचा तपास सुरू

घटनेनंतर संशयित पती विलास गायकवाड हा घटनास्थळावरून फरार झाला. घटनेची माहिती मिळताच कळवण पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला असून, फरार पतीच्या शोधासाठी विशेष पथक रवाना करण्यात आले आहे. कळवणचे पोलीस निरीक्षक खगेंद्र टेंभेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहिदास ठोंबरे तसेच पोलीस हवालदार मन्साराम बागुल, निलेश शेवाळे, संतोष गवळी आणि तुषार देवरे यांचे पथक संशयित विलास गायकवाड याचा शोध घेत आहे.

वाद नेमका कशासाठी?

या घटनेमुळे मानूर परिसरात खळबळ उडाली असून, नेमका वाद कशामुळे झाला आणि हत्येमागील अन्य कारणे काय आहेत, याचा तपास कळवण पोलीस करत आहेत.

प्रियकराने आवळला महिलेचा गळा

दुसऱ्या एका घटनेत, नात्यांमध्ये विश्वास आणि आपुलकी असेल तर वयाचा फरक अनेकदा गौण ठरतो. मात्र, त्याच नात्यात संशय, हट्ट आणि वाद वाढत गेले तर परिस्थिती किती गंभीर होऊ शकते, याचा धक्कादायक अनुभव नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात आला आहे. एका ४५ वर्षीय महिलेचा तिच्यापेक्षा दहा वर्षांनी लहान असलेल्या प्रियकराने गळा आवळून जीव घेतल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून निघून गेला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Nanded Crime News : ‘मंगल, माझ्याशी लग्न कर !’ नकार मिळताच नात्याला रक्तरंजित वळण; तरुणीचा मृत्यू, प्रियकर फरार !

Web Title: Husband absconding after murdering wife incident nashik

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 11, 2026 | 04:06 PM

Topics:  

  • crime news
  • Murder Case
  • Nashik News

संबंधित बातम्या

बेपत्ता अल्पवयीनाचा नदीपात्रात आढळला मृतदेह; नातेवाईकांचा पोलिसांच्या तपासावर आक्षेप
1

बेपत्ता अल्पवयीनाचा नदीपात्रात आढळला मृतदेह; नातेवाईकांचा पोलिसांच्या तपासावर आक्षेप

Police Destroy Seized Drugs: छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई! ३४३ किलोहून अधिक गांजाची विल्हेवाट
2

Police Destroy Seized Drugs: छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई! ३४३ किलोहून अधिक गांजाची विल्हेवाट

ठाण्यात शिवसेना यूबीटी विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकरांची गोळ्या झाडून हत्या; मुलाचे गंभीर आरोप
3

ठाण्यात शिवसेना यूबीटी विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकरांची गोळ्या झाडून हत्या; मुलाचे गंभीर आरोप

Crime News: मेरठच्या ‘ब्लू ड्रम’ हत्याकांडाचा आज निकाल; मुस्कान-साहिलच्या शिक्षेचा मार्ग मोकळा होणार?
4

Crime News: मेरठच्या ‘ब्लू ड्रम’ हत्याकांडाचा आज निकाल; मुस्कान-साहिलच्या शिक्षेचा मार्ग मोकळा होणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.