Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 26 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Ganesh Visarjan : गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी पुण्यातील वाहतुकीत बदल; ‘हे’ 17 रस्ते बंद

गणेश विसर्जन सोहळ्यानिमित्त शनिवारी (०६ सप्टेंबर) वाहतूक पोलिसांनी वाहतूकीत मोठा बदल केला आहे. या वाहतूक बदलाचे आदेश जारी करण्यात आले असून, एकूण १७ रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवले जाणार आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 05, 2025 | 11:45 AM
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी पुण्यातील वाहतुकीत बदल; 'हे' 17 रस्ते बंद

गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी पुण्यातील वाहतुकीत बदल; 'हे' 17 रस्ते बंद

Follow Us
Follow Us:

पुणे : गणेश विसर्जन सोहळ्यानिमित्त शनिवारी (०६ सप्टेंबर) वाहतूक पोलिसांनी वाहतूकीत मोठा बदल केला आहे. या वाहतूक बदलाचे आदेश जारी करण्यात आले असून, एकूण १७ रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवले जाणार आहेत. या रस्त्यावर शनिवारी सकाळी सातपासून दुसऱ्या दिवशी मिरवणूक संपेपर्यंत वाहतूक बंद राहणार आहे. त्यामुळे वाहनचालकांनी पर्यायी रस्त्याचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे. विसर्जन मिरवणुकीनिमित्त पोलिसांनी नियोजन केले आहे. विसर्जन सोहळ्यासाठी वाहतूक शाखेतील अधिकाऱ्यांसह सातशे पोलिस कर्मचारी व होमगार्ड वाहतूक नियोजन करणार आहेत. वाहतुकीसाठी बंद असणारे रस्ते मिरवणुकीची सांगता झाल्यानंतर वाहतुकीसाठी खुले करून दिले जाणार आहेत.

वाहतुकीसाठी बंद असणारे रस्ते पुढीलप्रमाणे

शिवाजी रस्ता, लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता, कुमठेकर रस्ता, गणेश रस्ता, टिळक रस्ता, केळकर रस्ता, शास्त्री रस्ता, जंगली महाराज रस्ता (झाशीची राणी चौक ते खंडुजीबाबा चौक), कर्वे रस्ता (नळस्टॉप चौक ते खंडुजीबाबा चौक), ना. गोपाळ कृष्ण गोखले रस्ता (खंडुजीबाबा चौक ते फर्ग्युसन महाविद्यालय प्रवेशद्वार), भांडारकर रस्ता (पीवायसी जिमखाना ते गोखले स्मारक चौक), पुणे-सातारा रस्ता (व्होल्गा चौक ते जेधे चौक), सोलापूर रस्ता (ढोले पाटील चौक-सेव्हन लव्हज चौक ते जेधे चौक), प्रभात रस्ता (डेक्कन पोलिस ठाणे; तसेच शेलारमामा चौक), बगाडे रस्ता (सोन्या मारुती चौक ते फडके हौद चौक), गुरुनानक रस्ता (देवजीबाबा चौक ते हमजेखान चौक ते गोविंद हलवाई चौक).

वाहतुकीसाठी वर्तुळाकार मार्ग

विसर्जन सोहळ्यानिमित्त वाहतूक पोलिसांनी पर्यायी वर्तुळाकार मार्ग तयार केला आहे. शहराबाहेर पडण्यासाठी वाहनचालकांनी पर्यायी वर्तुळाकार मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे. वर्तुळाकार मार्ग पुढीलप्रमाणे- कर्वे रस्ता, नळस्टॉप चौक, विधी महाविद्यालय रस्ता, सेनापती बापट रस्ता, गणेशखिंड रस्ता, सिमला ऑफिस चौक, संचेती हॉस्पिटल, अभियांत्रिकी महाविद्यालय, शाहीर अमर शेख चौक, मालधक्का चौक, बोल्हाई चौक, नरपतगिरी चौक, नेहरू रस्ता, संत कवीर पोलिस चौकी, सेव्हन लव्हज चौक, वखार महामंडळ चौक, मार्केट यार्ड, शिवनेरी रस्ता, सातारा रस्ता, लक्ष्मीनारायण चित्रपटगृह, मित्रमंडळ चौक, सिंहगड रस्ता, शास्त्री रस्ता, सेनादत्त पोलिस चौकी, म्हात्रे पूल, नळस्टॉप चौक.

  • रुग्णवाहिकेसाठी मार्ग खुला करून देण्याच्या सूचना बंदोबस्तावरील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
  • विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी येणाऱ्या भाविकांसाठी वाहने लावण्यासाठी पोलिसांनी जागा उपलब्ध करून दिल्या आहेत.

Web Title: Police have made traffic changes in pune for the ganesh visarjan procession

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 05, 2025 | 11:45 AM

Topics:  

  • Ganesh Utsav 2025
  • pune news
  • Traffic Police

संबंधित बातम्या

Badminton कोर्टवर भारताचा डंका! आंतरराष्ट्रीय स्पर्धेत अर्जुन रेड्डीचा आदित्य किरणवर थरारक विजय
1

Badminton कोर्टवर भारताचा डंका! आंतरराष्ट्रीय स्पर्धेत अर्जुन रेड्डीचा आदित्य किरणवर थरारक विजय

Pune Election Department: पुण्यातील २२ लाख मतदारांवर टांगती तलवार! जिल्हा निवडणूक शाखेचा मोठा निर्णय
2

Pune Election Department: पुण्यातील २२ लाख मतदारांवर टांगती तलवार! जिल्हा निवडणूक शाखेचा मोठा निर्णय

COEP राडाप्रकरणी महत्त्वाची अपडेट; काँग्रेस-एनएसयूआय कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल, मीडियाविरोधातही तक्रार
3

COEP राडाप्रकरणी महत्त्वाची अपडेट; काँग्रेस-एनएसयूआय कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल, मीडियाविरोधातही तक्रार

Maharashtra Breaking News Today 2026:उत्तर नेपाळच्या काही भागात पुरामुळे हाहाकार, पुरस्थितीमुळे 132 जणांचा मृत्यू
4

Maharashtra Breaking News Today 2026:उत्तर नेपाळच्या काही भागात पुरामुळे हाहाकार, पुरस्थितीमुळे 132 जणांचा मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.