Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara News : वाहतूक नियमभंगाविरोधात पोलिसांची धडक कारवाई; फॅन्सी नंबर प्लेट, मॉडिफाइड सायलेन्सरवर विशेष लक्ष

सायलेन्सर, नियमबाह्य फॅन्सी नंबर प्लेट, वाहनांवरील काळ्या काचा तसेच अनधिकृत सायरन बसवलेल्या वाहनांवर कारवाई करण्यात आली. अनेक वाहनधारकांकडून जागीच दंड वसूल करण्यात आला.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 07, 2026 | 03:13 PM
वाहतूक नियमभंगाविरोधात पोलिसांची धडक कारवाई; फॅन्सी नंबर प्लेट, मॉडिफाइड सायलेन्सरवर विशेष लक्ष

वाहतूक नियमभंगाविरोधात पोलिसांची धडक कारवाई; फॅन्सी नंबर प्लेट, मॉडिफाइड सायलेन्सरवर विशेष लक्ष

Follow Us
Follow Us:

सातारा : सातारा शहरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांविरोधात वाहतूक पोलिसांनी व्यापक मोहीम सुरू केली असून, मॉडिफाईड वाहनांवर कठोर कारवाई करण्यात येत आहे. शहरातील प्रमुख चौक, गर्दीचे रस्ते तसेच शाळा आणि बाजारपेठ परिसरात विशेष तपासणी मोहीम राबवून नियमभंग करणाऱ्या वाहनांची तपासणी केली जात आहे.

या मोहिमेदरम्यान मोठा आवाज करणारे बदल केलेले सायलेन्सर, नियमबाह्य फॅन्सी नंबर प्लेट, वाहनांवरील काळ्या काचा तसेच अनधिकृत सायरन बसवलेल्या वाहनांवर कारवाई करण्यात आली. अनेक वाहनधारकांकडून जागीच दंड वसूल करण्यात आला असून, काहींना वाहनांमधील बेकायदेशीर बदल तात्काळ हटवण्याच्या सूचना देण्यात आल्या.

वाहतूक शाखेकडून गेल्या काही दिवसांपासून सातत्याने ही मोहीम राबवली जात आहे. विशेषतः भरधाव वेग, कर्णकर्कश आवाज आणि वाहनांवरील अनधिकृत बदलांमुळे नागरिक त्रस्त होत असल्याच्या तक्रारी वाढल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई अधिक तीव्र केली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित यादव यांच्या नेतृत्वाखाली वाहतूक विभागाचे पथक विविध भागांत तपासणी करत असून, नियम मोडणाऱ्यांवर कोणतीही सवलत दिली जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

तसेच वाहनांवरील काळ्या फिल्ममुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो, तर सायरनच्या गैरवापरामुळे आपत्कालीन सेवांबाबत संभ्रम निर्माण होऊ शकतो, असेही पोलिसांनी नमूद केले. वाहतूक शिस्त राखण्यासाठी नागरिकांनी नियमांचे पालन करावे आणि वाहनांमध्ये अनधिकृत बदल टाळावेत, असे आवाहन वाहतूक विभागाकडून करण्यात आले आहे.

‘माझ्या नराधम बापाला फाशीच द्या’; पर्वती अत्याचार प्रकरणातील आईचा टाहो, चिमुरडीने सांगितलेला थरार ऐकून जळेल काळजाचं पाणी

पुण्यातही पोलिसांकडून कारवाई

दुसरीकडे, अवैध गावठी दारू विक्री करणारे तसेच जुगार खेळणे, संघटित गुन्हेगारी अशा गंभीर प्रकरणातील तब्बल १० गुन्हेगारांना शहर व जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. परिमंडळ सातचे पोलिस उपायुक्त सोमय मुंढे यांनी या तडीपारीचे आदेश दिले आहेत.

Web Title: Police launch crackdown against traffic violations

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 07, 2026 | 03:13 PM

Topics:  

  • Police Action
  • Satara News

संबंधित बातम्या

Satara Water Crisis: साताऱ्याच्या दुष्काळी भागात पाण्यासाठी वणवण!; माण, खटाव अन् फलटणमध्ये ३५ टँकर सुरू
1

Satara Water Crisis: साताऱ्याच्या दुष्काळी भागात पाण्यासाठी वणवण!; माण, खटाव अन् फलटणमध्ये ३५ टँकर सुरू

Satara Drought: पावसाअभावी उभी पिके करपली; वाई तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्याची काँग्रेसची मागणी
2

Satara Drought: पावसाअभावी उभी पिके करपली; वाई तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्याची काँग्रेसची मागणी

Satara News: सातारा-लोणंद मार्गावर जनक्षोभ!; NHAI च्या निष्काळजीपणाविरोधात ‘सगळी गावे’ उतरणार रस्त्यावर
3

Satara News: सातारा-लोणंद मार्गावर जनक्षोभ!; NHAI च्या निष्काळजीपणाविरोधात ‘सगळी गावे’ उतरणार रस्त्यावर

भैरवनाथाच्या देवस्थानात ‘विकासा’च्या नावाखाली सिमेंटचा मारा? काँक्रीटीकरणावर ठाकरे गटाचा सवाल; ठेकेदारावर कारवाईची मागणी
4

भैरवनाथाच्या देवस्थानात ‘विकासा’च्या नावाखाली सिमेंटचा मारा? काँक्रीटीकरणावर ठाकरे गटाचा सवाल; ठेकेदारावर कारवाईची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.