शिवसेनेने सुरू केली निवणुकीची तयारी (फोटो - ani)
राज्यात लवकरच होणार महापालिकांच्या निवडणुका
महायुती व महाविकास आघाडीने सुरू केली तयारी
ठाकरे बंधूंची भेट होताच शिंदे यांनी फुंकले रणशिंग
Eknath Shinde On Maharashtra Politics: राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या वर्षाच्या अखेरीस राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. महायुतीमधील शिवसेना, राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि भाजप तसेच महाविकास आघाडीतील सर्व पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.आता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी देखील निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारण्यांमध्ये सतत चर्चेचा विषय असलेले ठाकरे बंधू आज पुन्हा एकमेकांना भेटले. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) बुधवारी सकाळी अचानक राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या दादर येथील शिवतीर्थ निवासस्थानी दाखल झाले. त्यामुळे राज्याच्या राजकरणात पुन्हा एकदा ठाकरे बंधू एकत्र येणार का अशी चर्चा सुरू झाली आहे. आज ठाकरे बंधू यांनी भेट घेताच एकनाथ शिंदे यांनी देखील आता रणशिंग फुंकले आहे.
मुंबई महापालिका जिंकण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी कंबर कसली आहे. शिवसेनेने महापालिका निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने आपली मुख्य कार्यकारी समिती जाहीर केली आहे. या समितीमध्ये 21 नेत्यांचा समावेश करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता एकनाथ शिंदे यांनी 21 जणांची समिती नेमली आहे. या समितीच्या माध्यमातून पक्षासाठी महत्वाचे निर्णय निवडणुकीच्या दृष्टीने घेतले जाणार आहेत. या समितीमध्ये आजी – माजी खासदार, प्रमुख नेते, आजी-माजी आमदारांना संधी देण्यात आली आहे.
ठाकरे बंधू एकत्र येणार?
राजकीय दृष्टिकोनातून ठाकरे बंधू कधी एकत्र येणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिल. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्येही याबद्दल उत्सुकता पाहायला मिळत आहे. याचदरम्यान, आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे संजय राऊत आणि अनिल परब यांच्यासह राज ठाकरे यांच्या निवासस्थानी पोहोचले. आता खऱ्या अर्थाने दोन राजकीय पक्ष एकत्र येणाच्या दृष्टीने चर्चा सुरू होऊ शकते.
मुंबई महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. त्यासाठी अवघा तीन ते चार महिन्यांचा कालावधी आहे. अशा परिस्थितीत, सर्व राजकीय पक्षांनी आपापली तयारी कसून सुरुल केली. महायुती असो किंवा महाविकास आघाडी अंतर्गत पक्ष असोत, दोन दिवसांपूर्वी काँग्रेस नेत्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि नगरपालिका निवडणुका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबद्दल सविस्तर चर्चा केली.