Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

इस्लामपुरात तब्बल 57 लाखांची दारू पोलिसांनी पकडली; ट्रकमधून नेल्या जात होत्या 48 हजार बाटल्या

राष्ट्रीय महामार्गावर पेठ नाका येथे पोलिसांनी गोवा बनावटीची तब्बल ५७ लाखांची (Islampur Crime) दारू नाकाबंदी करून पकडली. एक हजार बॉक्समधून ४८ हजार बाटल्या बेकायदेशीररित्या नेताना एका ट्रकसह ७५ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 26, 2023 | 02:50 PM
इस्लामपुरात तब्बल 57 लाखांची दारू पोलिसांनी पकडली; ट्रकमधून नेल्या जात होत्या 48 हजार बाटल्या
Follow Us
Close
Follow Us:

इस्लामपूर : राष्ट्रीय महामार्गावर पेठ नाका येथे पोलिसांनी गोवा बनावटीची तब्बल ५७ लाखांची (Islampur Crime) दारू नाकाबंदी करून पकडली. एक हजार बॉक्समधून ४८ हजार बाटल्या बेकायदेशीररित्या नेताना एका ट्रकसह ७५ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. मंगळवारी रात्री नऊ वाजता पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली. ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर दारू साठा पकडल्याने खळबळ माजली आहे.

याप्रकरणी अवैधरित्या दारू वाहतूक करणारा ट्रक चालक सल्लू उर्फ सलमान नजरुद्दीन मकानदार (वय २८, रा. डफळापुर, तालुका जत) याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस विनायक देवळेकर यांनी फिर्याद दिली आहे. इस्लामपूर पोलिसांना मंगळवारी रात्री आठ वाजता गोपनीय खबऱ्यामार्फत अवैधरित्या दारू वाहतूक करणाऱ्या ट्रकबाबत माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक संजय हारुगडे यांनी पोलीस पथक बनवून पेठनाका येथे नाकाबंदी केली. तपासणीदरम्यान हा ट्रक (एमच ५० एन ३९९९) हा संशयास्पदरित्या मिळाला.

पोलीस असल्याचे पाहून ट्रकचा चालक सलमान मकानदार घाबरला होता. त्याला विचारणा केली असताना त्याने ट्रकमध्ये दारूचे बॉक्स असल्याचे सांगितले. हा दारूसाठा कराड येथील जमीर पटेल याला विक्रीसाठी नेत असल्याचे सांगितले. ट्रक पोलीस ठाण्याच्या आवारात आणून झडती घेतली असता या ट्रकमधून एक हजार बॉक्स मिळून आले. यात १८० मिलीच्या तब्बल ४८ हजार बाटल्या मिळाल्या. ५७ लाख ६०० रुपयांची ही दारू व १८ लाख रुपयांचा ट्रक असा तब्बल ७५ लाख ६० हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

जिल्हा पोलीस प्रमुख बसवराज तेली, पोलीस उपाधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलीस निरीक्षक संजय हारुगडे, पोलीस शिपाई विनायक देवळकेर, उदय पाटील, अभिजित पाटील यांच्या पथकाने कारवाईत भाग घेतला.

संबंधित ट्रकचालक एवढा मोठा दारू साठा नेमका कुठे नेणार होता? दारूचा साठा कोणाच्या सांगण्यावरून केला जात होता? याच्या मूळापर्यंत जाऊन तपास केला जाईल. याच्या मुख्य सूत्रधाराला लवकर गजाआड करू.

– संजय हारुगडे, पोलीस निरीक्षक, इस्लामपूर पोलीस ठाणे.

Web Title: Police seized liquor worth rs 57 lakh in islampur 48 thousand bottles were being transported

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 26, 2023 | 02:50 PM

Topics:  

  • Islampur
  • Islampur Crime
  • maharashtra

संबंधित बातम्या

Mumbai News : मुंबईत ९० हजार भटके श्वान, शल्टर मात्र केवळ आठ; निवासस्थानांसाठी पायाभूत सुविधांचा अभाव
1

Mumbai News : मुंबईत ९० हजार भटके श्वान, शल्टर मात्र केवळ आठ; निवासस्थानांसाठी पायाभूत सुविधांचा अभाव

Sambhajinagar : धक्कादायक! जेवणात आढळली पाल, समाज कल्याणच्या वसतिगृहातील 28 विद्यार्थ्यांना विषबाधा
2

Sambhajinagar : धक्कादायक! जेवणात आढळली पाल, समाज कल्याणच्या वसतिगृहातील 28 विद्यार्थ्यांना विषबाधा

Nashik News : आधारभूत किंमतीची मका खरेदी पडणार लांबणीवर, खरेदीसाठी राज्य शासनाकडून तारीख पे तारीख
3

Nashik News : आधारभूत किंमतीची मका खरेदी पडणार लांबणीवर, खरेदीसाठी राज्य शासनाकडून तारीख पे तारीख

Eknath Shinde : “विकास विरोधी प्रवृत्ती हद्दपार करा…”, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन
4

Eknath Shinde : “विकास विरोधी प्रवृत्ती हद्दपार करा…”, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.