Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोळसा खाणींमुळे वाढले प्रदूषण! नागरिकांचा श्वास गुदमरतोय; धुळीवर नियंत्रणासाठी हवी ठोस उपाययोजना

कोळसा खाणीतून कोळसा वाहून नेताना वाहनांवर ताडपत्री झाकणे आवश्यक असते. मात्र वेकोलि प्रशासन नियम धाब्यावर बसवून कोळसा वाहतूक करीत असल्याने कोळसा रस्त्यावर खाली पडून धूळ प्रदूषण होत आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 21, 2026 | 02:14 PM
कोळसा खाणींमुळे वाढले प्रदूषण! नागरिकांचा श्वास गुदमरतोय; धुळीवर नियंत्रणासाठी हवी ठोस उपाययोजना

कोळसा खाणींमुळे वाढले प्रदूषण! नागरिकांचा श्वास गुदमरतोय; धुळीवर नियंत्रणासाठी हवी ठोस उपाययोजना

Follow Us
Follow Us:

वणी तालुक्यातील वेकोलिच्या कोळसा खाणीत मोठ्या प्रमाणात धूळ प्रदूषण होत असल्याने येथे काम करणाऱ्या कामगारांसह परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. वर्षाकाठी कोट्यवधी रुपयांचा नफा मिळविणाऱ्या वेकोलि प्रशासनाने धुळीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. मात्र वेकोलीच्या नियोजन शुन्य धोरणामुळे धूळ नियंत्रणाची तोकडी उपाययोजना नागरिकांना जीवघेणी ठरत आहेत. वणी तालुक्यात वेकोलिच्या मोठ्या प्रमाणात खुल्या कोळसा खाणी आहेत. साखरा, कोलगाव, मुंगोली, नायगाव, उकणी, निलजई, माथोली या परिसरात दगडी कोळश्याचे मोठ्या प्रमाणात साठे उपलब्ध असल्याने वेकोलिने या परिसरात खुल्या कोळसा खाणी निर्माण केल्या आहे.(फोटो सौजन्य – AI)

एनसीएमसी कार्डसाठी आगारात गर्दी! यवतमाळ आगारात ५ हजार कार्ड अ‍ॅक्टिव्ह; जिल्ह्यात ९ ठिकाणी सुविधा उपलब्ध

मात्र कोळसा खाण तयार करताना परिसरात धूळ होणार नाही, यांची काळजी वेकोलि प्रशासनाने घेणे आवश्यक आहे. कोळसा खाणीतून होणाऱ्या जीवघेण्या प्रदूषणाने कामगारांसह परिसरातील साखरा, मुंगोली, कोलगाव, कैलाशनगर, माथोली या गावातील नागरिकांना धूळीचा प्रचंड त्रास सहन करावा लागतो आहे. मात्र वेकोलि प्रशासनाकडून थातूरमातूर पाणी मारून धुळीवर नियंत्रण मिळविण्यासाठी केविलवाणा प्रयत्न करण्यात येतो. परंतु कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात वेकोलि प्रशासन अपयशी ठरल्याचे दिसून येत आहेत. कोळश्याच्या धुळीमुळे प्रदूषण वाढल्याने कामगारांसह परिसरातील नागरिकांना धोका निर्माण झाला आहे.

कोळसा खाणीतून कोळसा वाहून नेताना वाहनांवर ताडपत्री झाकणे आवश्यक असते. मात्र वेकोलि प्रशासन नियम धाब्यावर बसवून कोळसा वाहतूक करीत असल्याने कोळसा रस्त्यावर खाली पडून धूळ प्रदूषण होत आहे. त्याचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागतो. मात्र वेकोलिकडून एवढ्या मोठ्या प्रमाणात धूळ प्रदूषण करण्यात येत असूनही या गंभीर बाबीकडे प्रदूषण मंडळाचे दुर्लक्ष का होतेय, हे एक कोडंच आहे.

रेती धोरणाची अंमलबजावणी होईना! नदी, नाल्यांच्या गडचिरोली जिल्ह्यात रेतीचे भाव कडाडले

वणी क्षेत्राअंतर्गत मोठ्या प्रमाणात खुल्या कोळसा खाणींचे जाळे निर्माण झाले आहे. धुळीवर नियंत्रण मिळविण्यासाठी वेकोलिने फॉग मशीन, पाणी मारण्यासाठी पाणी टँकर आहे मात्र ते निरुपयोगी ठरत आहे. यात वेकोलि प्रशासन लाखो रुपये खर्च करून विविध उपाययोजना करीत आहे मात्र अद्यापही धुळीच्या नियंत्रणावर कायमस्वरूपी उपाययोजना करता आली नाही.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Increased pollution due to coal mines citizens are suffocating concrete measures are needed to control dust

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 21, 2026 | 02:14 PM

Topics:  

  • Coal india
  • maharashtra
  • yavatmal latest news

संबंधित बातम्या

Gondiya News: जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपारच्या खुनाचा उलगडा! दोघांसह २ विधिसंघर्षग्रस्त ताब्यात
1

Gondiya News: जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपारच्या खुनाचा उलगडा! दोघांसह २ विधिसंघर्षग्रस्त ताब्यात

Pratap Sarnaik: शेतकऱ्यांना लवकरच मिळणार मदत; जीआर काढण्याची प्रक्रिया सुरू – प्रताप सरनाईक
2

Pratap Sarnaik: शेतकऱ्यांना लवकरच मिळणार मदत; जीआर काढण्याची प्रक्रिया सुरू – प्रताप सरनाईक

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव
3

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव

Kolhapur Ganesh Visarjan: विद्युत तारेला स्पर्श अन् क्षणात 21 फुटी गणेशमूर्ती कोसळली; कोल्हापुरात विसर्जन मिरवणुकीला गालबोट
4

Kolhapur Ganesh Visarjan: विद्युत तारेला स्पर्श अन् क्षणात 21 फुटी गणेशमूर्ती कोसळली; कोल्हापुरात विसर्जन मिरवणुकीला गालबोट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.