Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्यात जेवण न मिळाल्याने पोलीस कर्मचाऱ्यावर चाकूने वार, लोहगावमधील धक्कादायक घटना; कर्मचारी गंभीर जखमी

रात्री उशिरापर्यंत सुरू असणारे चायनिज सेंटर (Chinese Center) गस्तीवरील पोलिसांनी (Police) बंद केल्यानंतर जेवण न मिळाल्याने एकाने चायनिज सेंटरमधील चाकूनेच पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला केला. या हल्ल्यात पोलीस कर्मचारी गंभीररित्या जखमी झाले आहेत. पावणे तीनच्या सुमारास लोहगाव परिसरात ही घटना घडली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jan 16, 2023 | 09:08 AM
पुण्यात जेवण न मिळाल्याने पोलीस कर्मचाऱ्यावर चाकूने वार, लोहगावमधील धक्कादायक घटना; कर्मचारी गंभीर जखमी
Follow Us
Follow Us:

पुणे : रात्री उशिरापर्यंत सुरू असणारे चायनिज सेंटर (Chinese Center) गस्तीवरील पोलिसांनी (Police) बंद केल्यानंतर जेवण न मिळाल्याने एकाने चायनिज सेंटरमधील चाकूनेच पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला केला. या हल्ल्यात पोलीस कर्मचारी गंभीररित्या जखमी झाले आहेत. पावणे तीनच्या सुमारास लोहगाव परिसरात ही घटना घडली आहे.

पोलीस नाईक सचिन उत्तम जगदाळे (वय ३८) असे जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात महानंदेश्वर उर्फ मल्या महादेव बताले (वय २४, रा. नळदुर्ग, जि. उस्मानाबाद) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

तक्रारदार रात्रगस्तीवर होते. या दरम्यान, लोहगाव येथील धानोरी जकात नाका येथील समायरा चायनिज सेंटर रात्री अडीच वाजता देखील सुरू होते. हे सेंटर पोलीस कर्मचारी सचिन व त्यांच्या सहकार्यांनी बंद केले. त्याच दरम्यान, महानंदेश्वर हा त्याठिकाणी जेवणासाठी आला होता. सेंटर बंद केल्याने त्याला जेवण मिळाले नाही. त्याचा राग आल्याने त्याने सेंटरमधील चाकू घेऊन सचिन यांच्यावर हल्ला केला. त्यांच्या गालावर चाकू मारल्याने ते यात गंभीर जखमी झाले असून, त्यांचा गाल फाटला गेला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

रात्रीच्या मध्यापर्यंत हातगाडे सुरूच…

शहरातील अनेक भागात त्यातही उपनगरांमध्ये अंडाभुर्जी तसेच चायनिज सेंटरचे हातगाडे पहाटेपर्यंत सुरू असतात. हे गाडे पोलिसांच्याच आर्शिवादाने सुरू असल्याचे पाहिला मिळत आहे. स्थानिक पोलिसांना त्यातून मलिदा मिळतो. त्यामुळे हे गाडे बंद होत नसल्याचे वास्तव आहे. स्वारगेट, हडपसर तसेच उपनगरांमध्ये हातगाडे मोठ्या प्रमाणात आहेत. याठिकाणी रात्रीपर्यंत गर्दी पाहिला मिळते. तर, अनेक गाड्यांवर दारूचे प्यागही रिचवले जातात. हाणामारीच्या देखील घटना यापुर्वी अशा ठिकाणी घडलेल्या आहेत. पण, पोलिसांकडून याकडे सरास दुर्लक्ष होताना दिसत आहे.

Web Title: Policeman stabbed with knife for not getting food in pune shocking incident in lohgaon the employee was seriously injured nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 16, 2023 | 09:08 AM

Topics:  

  • devendra fadanvis
  • Lohgaon
  • maharashtra
  • Pune
  • Pune Crime

संबंधित बातम्या

Ahilyanagar News: अहिल्यानगरमध्ये दुष्काळसदृश स्थिती; चापडगाव परिसरात खरीप पिके उद्ध्वस्त
1

Ahilyanagar News: अहिल्यानगरमध्ये दुष्काळसदृश स्थिती; चापडगाव परिसरात खरीप पिके उद्ध्वस्त

Breaking News: मोठी बातमी! अखेर राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर; देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय
2

Breaking News: मोठी बातमी! अखेर राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर; देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय

Mumbai News: गोवंडी-मानखुर्दला ‘विषारी हवे ‘पासून मिळणार दिलासा! बेकायदेशीर आरएमसी काँक्रिट प्लाण्ट होणार बंद
3

Mumbai News: गोवंडी-मानखुर्दला ‘विषारी हवे ‘पासून मिळणार दिलासा! बेकायदेशीर आरएमसी काँक्रिट प्लाण्ट होणार बंद

Gondiya News: जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपारच्या खुनाचा उलगडा! दोघांसह २ विधिसंघर्षग्रस्त ताब्यात
4

Gondiya News: जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपारच्या खुनाचा उलगडा! दोघांसह २ विधिसंघर्षग्रस्त ताब्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.