Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शिवरायांचा पुतळ्यावरून राजकारण तापलं; सुप्रिया सुळेंचा आरोप, रविंद्र चव्हाणांनी थेट पत्रचं दाखवलं

विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं असून उद्धव ठाकरे  यांच्या पक्षाचे आमदार वैभव नाईक यांनी तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाचीच तोडफोड  केल्याचे समोर आले आहे. तर, खासदार सुप्रिया सुळे यांनीदेखील कॉन्ट्रॅक्टर हा ठाणे जिल्ह्यातला असल्याचे सांगत थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेच बोट दाखवले आहे. 

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Aug 27, 2024 | 10:10 AM
शिवरायांचा पुतळ्यावरून राजकारण तापलं; सुप्रिया सुळेंचा आरोप, रविंद्र चव्हाणांनी थेट पत्रचं दाखवलं
Follow Us
Close
Follow Us:

सिंधुदुर्ग:  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यामुळे राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. अवघ्या वर्षभरापूर्वीच नौदल दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते. पण हा पुतळा अचानक कोसळल्याने राज्यभरातून त्याची तीव्र पडसाद उमटू लागले आहेत.

विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं असून उद्धव ठाकरे  यांच्या पक्षाचे आमदार वैभव नाईक यांनी तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाचीच तोडफोड  केल्याचे समोर आले आहे. तर, खासदार सुप्रिया सुळे यांनीदेखील कॉन्ट्रॅक्टर हा ठाणे जिल्ह्यातला असल्याचे सांगत थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेच बोट दाखवले आहे.

हेदेखील वाचा: विखे-पाटील म्हणजे महादेवाच्या पिंडीवर बसलेले विंचू; भाजपच्याच नेत्याचा गंभीर आरोप

“हा पुतळा नेमका कोणी उभारला, कोणाला टेंडर देण्यात आलं, पुतळ्याचा दर्जा कसा होता, पुतळ्याचा नीट अभ्यास केला होता का, ह्या पुतळा उभारणीचं कॉन्ट्रॅक्ट ठाण्यातील व्यक्तीला देण्या आलं होतं,’ असे अनेक प्रश्न खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करून उपस्थित केले आहेत.  तर, हा पुतळा नौदलाने उभारला असून त्याच्या देखभालीचं कामही  नौदलाकडेच होते,  अशी माहिती सिंधुदुर्गचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिली आहे.

रविंद्र चव्हाण म्हणाले, ‘राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या शिवरायांच्या पुतळ्याच्या कामाची आणि त्याची निगा राखण्याची, तेथील स्वच्छतेची संपूर्ण जबाबदारी नौदलाची होती.  महाराजांचा हा पुतळा नौदलाच्या अखत्यारीत येतो. नौदलानेच या पुतळ्याची उभारणी केली होती. मेसर्स आर्टीस्ट्री नावाच्या कंपनीला या पुतळा उभारणीचे काम देण्यात आले होते. जयदीप आपटे हे या कंपनीचे संचालक आणि केतन पाटील हे स्ट्रक्चरल कन्सल्टंट म्हणून काम पाहत होते. एक वर्षापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या पुतळ्याचे अनावरण केले होते. पण वर्षभरातच पुतळ्याला गंज लागला असल्याचे निदर्शनास आले होते.  आठ दिवसांपूर्वीच म्हणजेच 20 ऑगस्ट रोजी सार्वजनिक बांधकाम विभागानं पत्र लिहून ही बाबत नौदलाच्या निदर्शनास आणून दिली होती.

हेदेखील वाचा: भाजपने डाव टाकला; माजी मुख्यमंत्री गळाला लागला, ‘या’ दिवशी होणार प्रवेश

दरम्यान या प्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल व्हावा, दोषींवर कडक कारवाई करावी, यासाठी रविंद्र चव्हाण यांनी मालवण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तसेच, शिवरायांच्या पुतळ्यासंदर्भात हलगर्जी सहन केली जाणार नाही. येत्या दोन महिन्यात पुतळा पुन्हा बसवण्यात येईल असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे.

Web Title: Politics heated up over shivaji maharajs statue nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 27, 2024 | 10:10 AM

Topics:  

  • Chhatrapati Shivaji Maharaj
  • Ravindra Chavan
  • supriya sule

संबंधित बातम्या

पुणे भाजपची कार्यकारिणी जाहीर; सरचिटणीसपदी साळेगावकर तर युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी मोहोळ
1

पुणे भाजपची कार्यकारिणी जाहीर; सरचिटणीसपदी साळेगावकर तर युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी मोहोळ

Kalyan News: ‘या’ इमारतींच्या रखडलेल्या पुनर्विकास लागणार मार्गी, रवींद्र चव्हाण यांची माहिती
2

Kalyan News: ‘या’ इमारतींच्या रखडलेल्या पुनर्विकास लागणार मार्गी, रवींद्र चव्हाण यांची माहिती

Uttarkashi Cloudburst: उत्तरकाशीत अडकले पुण्यातील २४ पर्यटक; सुप्रिया सुळेंकडून बेपत्ता पर्यटकांची नावांची यादी जाहीर
3

Uttarkashi Cloudburst: उत्तरकाशीत अडकले पुण्यातील २४ पर्यटक; सुप्रिया सुळेंकडून बेपत्ता पर्यटकांची नावांची यादी जाहीर

मशिदीत शिवाजी महाराज का आणतो? फ्रान्समध्ये ‘कान’ देऊन ऐकलेल्या ‘खालिद का शिवाजी’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित
4

मशिदीत शिवाजी महाराज का आणतो? फ्रान्समध्ये ‘कान’ देऊन ऐकलेल्या ‘खालिद का शिवाजी’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.