Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur News: कोल्हापुरात राजकारण तापणार; शक्तीपीठ महामार्ग विरोधात एक जुलैला चक्काजाम आंदोलन

शक्तीपीठ महामार्गासाठी नुकतीच राज्य सरकारने वीस हजार कोटींची तरतूद केली आहे. भूसंपादनाची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jun 27, 2025 | 02:55 PM
Kolhapur News: कोल्हापुरात राजकारण तापणार; शक्तीपीठ महामार्ग विरोधात एक जुलैला चक्काजाम आंदोलन
Follow Us
Close
Follow Us:

Kolhapur Shaktipeeth Expressway Politics: शेतकऱ्यांच्यावर लादण्यात येतं असलेल्या शक्तीपीठ महामार्ग विरोधात, कृषी दिना दिवशी एक जुलैला रस्त्यावर उतरण्याचा निर्णय ऑनलाईन झालेल्या बैठकीत सर्व जिल्ह्यांमध्ये महामार्ग रोखून चक्काजाम आंदोलन करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. तर राज्य सरकारने दडपशाही करू नये. आणि पोलिसांनी यामध्ये हस्तक्षेप करू नये. असे आवाहन या बैठकीच्या निमित्ताने विधानपरिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी केले.

नागपूर -गोवा प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाविरोधातील लढा आणखी तीव्र करण्यासाठी शेतकऱ्यांनी कंबर कसली आहे . या राज्यव्यापी आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी राज्यभरातील शेतकऱ्यांची ऑनलाईन बैठक संपन्न झाली. १२ जिल्ह्यातील बाधीत शेतकऱ्यांच्या बरोबरच राज्यातील इतर जिल्ह्यांमधील शेतकरी या बैठकीत सहभागी झाले होते. त्याच बरोबर विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, खासदार विशाल पाटील, खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील, खासदार नागेश पाटील, आमदार विश्वजीत कदम, आमदार अरुण लाड, आमदार दिलीप सोपल, आमदार चंद्रकांत नवघरे, आमदार प्रविण स्वामी ऑनलाइन सहभागी झाले होते.

Thackeray Brothers Alliance: राज ठाकरेंचा संजय राऊतांना फोन, राजकीय घडामोडींना वेग; नेमकं घडलं काय?

शक्तीपीठ महामार्गासाठी नुकतीच राज्य सरकारने वीस हजार कोटींची तरतूद केली आहे. भूसंपादनाची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली आहे. त्यामुळं, शेतकऱ्यांच्यात उद्रेक असून, गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग आमच्यावर लादू नका, अशा तीव्र भावना या बैठकीत शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या. आमदार सतेज पाटील यांनी, पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यानंतर शक्तीपीठ महामार्गाबद्दल आम्ही अधिवेशनात आवाज उठवू. मात्र आता रस्त्यावरची लढाई देखील करावी लागणार असल्याचं त्यांनी सांगितले. शक्तीपीठ महामार्ग विरोधात आता जिल्ह्यात जाऊन जनजागृती करुया. शेतकऱ्यांच्या जमिनीच्या मोजणीची प्रक्रिया हाणून पाडूया. राज्य सरकारनं शेतकऱ्यावर दडपशाही करू नये. तर शेतकऱ्यांचा विरोध होत असताना पोलिसांनी यामध्ये हस्तक्षेप करू नये. असा इशाराही आमदार सतेज पाटील यांनी दिला.याशिवाय, एक जुलै रोजी होणाऱ्या चक्काजाम आंदोलनात मोठ्या संख्येन शेतकऱ्यांनी सहभागी होऊन रस्त्यावरची ही लढाई यशस्वी करण्याच आवाहनही त्यांनी या बैठकीच्या निमित्ताने केले.

Sanjay Raut Live : एकत्रित मोर्चासाठी ठाकरे बंधूंपैकी कोणी घेतला पुढाकार? संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं

माजी खासदार राजू शेट्टी यांनी, राज्य सरकारला वठणीवर आणायच असेल तर, संघर्ष अधिक तीव्र करूया. रस्त्यावरच्या लढाई शिवाय पर्याय नसून एकीकडे एक जुलैला राज्य सरकार कृषी दिन साजरा करत असेल आणि दुसरीकड शेतकऱ्यांच्या जमिनी सरकार हिराऊन घेणार असेल, तर सरकाराला शेतकऱ्यांची ताकद दाखवून देऊया. असे आवाहन त्यांनी केले. खासदार विशाल पाटील यांनी, शक्तीपीठ महामार्ग विरोधात रस्त्यावरच्या लढाईत शेतकऱ्यांच्या सोबत आपणं असणार आहे.. सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांची बैठक घेऊन एक जुलै रोजी होणारे चक्काजाम आंदोलन अधिक ताकतीन करण्याबाबत नियोजन करण्याच आश्वासन त्यांनी दिले. आमदार विश्वजीत कदम यांनी, शक्तीपीठ महामार्गाला आमचा विरोध कायम असून सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांची बैठक घेऊन, हा लढा अधिक तीव्र करणारं असल्याचं त्यांनी सांगितले. आमदार कैलास पाटील यांनी , शक्तीपीठ महामार्ग विरोधी लढ्यात शेतकऱ्यांच्या तरुण मुलांना सामावून घेऊया. सरकारला तरुण शेतकऱ्यांची ताकद देखील दाखवून देण्याच आवाहन त्यांनी केले.

यावेळी, धाराशिव नगर येथील शेतकरी एडवोकेट गजेंद्र येळकर, नांदेड जिल्ह्यातील सतीश कुलकर्णी, गोविंद घातोळ, महेश खराडे, डॉक्टर सुधीन दळवे, गणेश घोडके, एडवोकेट वीरेंद्र फोंडके आदी शेतकऱ्यांनी या बैठकीत आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. या बैठकीला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजन क्षीरसागर, बापूराव ढोरे, अजय बुरांडे, अभिजित देशमुख, गणेश घोडके, उमेश एडके, अभिजीत देशमुख, दिगंबर कांबळे, शिवाजी मगदूम, प्रकाश पाटील, कृष्णा पाटील शिवाजी कांबळे अशा विविध जिल्ह्यातील शेतकरी या बैठकीला ऑनलाइन सहभागी झाले होते..

Web Title: Politics will heat up in kolhapur chakkajam protest against shakti peeth highway on july 1

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 27, 2025 | 02:45 PM

Topics:  

  • kolhapur news
  • Shaktipeeth Highway

संबंधित बातम्या

Kolhapur News : नगरपालिका, नगरपंचायतींसाठी तब्बल 2036 इच्छुकांचा उमेदवारी अर्ज दाखल
1

Kolhapur News : नगरपालिका, नगरपंचायतींसाठी तब्बल 2036 इच्छुकांचा उमेदवारी अर्ज दाखल

Kolhapur : जयसिंगपूरमध्य़े आघाडीचा उमेदवार ठरला; निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडे इच्छुकांची संख्या मोठी
2

Kolhapur : जयसिंगपूरमध्य़े आघाडीचा उमेदवार ठरला; निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडे इच्छुकांची संख्या मोठी

Kolhapur News : महायुतीत ‘नाराजीनाट्य’नगराध्यक्षपदासाठी सात जागेवर भाजपाचा दावा; राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा
3

Kolhapur News : महायुतीत ‘नाराजीनाट्य’नगराध्यक्षपदासाठी सात जागेवर भाजपाचा दावा; राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा

Kolhapur News : पात्र लाभार्थीना रेशनचा लाभ मिळत नसल्याने आंदोलन; पुरवठा निरीक्षकांसमोरच नागरिकांचा ठिय्या
4

Kolhapur News : पात्र लाभार्थीना रेशनचा लाभ मिळत नसल्याने आंदोलन; पुरवठा निरीक्षकांसमोरच नागरिकांचा ठिय्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.