खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याची घोषणा केली (फोटो - टीम नवराष्ट्र)
Sanjay Raut Marathi Live : मुंबई : मनसे नेते राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे हे मराठी अस्मितेसाठी एकत्रित मोर्चा काढणार आहेत. पहिली ते चौथी प्राथमिक शाळांमध्ये हिंदी भाषा न शिकवण्याबाबत दोन्ही नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मराठी भाषेसाठी हे नेते एकत्र आल्यामुळे मराठी माणसांनी समाधान व्यक्त केले आहे. या मोर्चासाठी राज ठाकरे यांनी पुढाकार घेत फोन केल्याची कबुली खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.
खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले आहे. खासदार राऊत यांनी राज ठाकरे यांनी दोन्ही पक्षांचा मोर्चा एकत्र काढण्याबाबत फोन केला असल्याचे देखील संजय राऊत म्हणाले आहेत. ते म्हणाले की, “महाराष्ट्रात सध्या शालेय शिक्षणात हिंदी भाषा सक्तीचा विषय सुरु आहे शालेय शिक्षण त्रीसुत्री भाषा धोरणाच्या खाली लहान मुलांवर एक तिसरी भाषा लादली जाते. हे ओझं मुलांना पेलवलं जाणार नाही असं भाषा तज्ज्ञांचं म्हणणं आहे. आमचा हिंदीला विरोध नाहीये, शिक्षणात महाराष्ट्रात अशा प्रकारची जबरदस्ती तुम्हाला करता येणार नाही, नेहमी प्रमाणे गुजरातला यातून वगळेलं आहे,” अशी स्पष्ट भूमिका खासदार राऊत यांनी घेतली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, “मराठी भाषिक संस्थांनी राज आणि उद्धव ठाकरेंची भेट घेतली. सरकारच्या वतीने काही माणसं राज ठाकरेंकडे आली होती. मात्र त्यांना हे सादरीकरण मान्य नसल्याने त्यांनी देखील मोर्चाची घोषणा केली. यावेळी आम्ही पत्रकार परिषद घेत असतानाच राज ठाकरे यांनी आंदोलनाची घोषणा केली. ते ६ तारखेला याची आहे, आम्हाला कल्पना नव्हती. आम्ही पत्रकार परिषेदेतून बाहेर पडल्यानंतर राज ठाकरे यांचा आम्हाला फोन आला, त्यांची अशी भुमिका आहे मराठी भाषेसंदर्भात दोन वेगळे मोर्चे निघणं हे बरं दिसत नाही हे एकत्र आंदोलन झालं तर त्याचा जास्त प्रभाव पडेल, आणि मराठी भाषिकांना त्याचा आनंद होईल, अशी बोलणी झाली असल्याचे खासदार संजय राऊत यांनी कबुल केले आहे.
मराठी भाषेसाठी सर्वांनी एकत्र यावं
पुढे संजय राऊत म्हणाले की, “मी या संदर्भात उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. उद्धव ठाकरे बोलत आहे. महाराष्ट्राच्या मनात आहे ते मी करेन. कालच्या बैठकीत देखील त्यांनी समन्वयाची भूमिका घेतली. 5 तारखेला आंदोलन एकत्र होईल. ते मनाने एकत्र आलेले आहे. हा एक महत्त्वाचा विषय आहे. मराठी भाषेसाठी सर्वांनी एकत्र यावं असं आवाहन दोन्ही ठाकरे यांनी केलेले आहे. आम्ही सगळ्यांना सोबत घेऊ,” असे मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मराठी भाषा आणि हिंदी सक्तीवर खासदार राऊत यांनी सत्ताधारी भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले की, “आम्ही तुम्हाला मराठी भाषेचा दर्जा देतो, आणि शालेय शिक्षणात हिंदीचा शक्ती करतो असे कुठे पत्र आहे का? कोणत्या राज्यात सक्ती आहे दाखवा मला. शिंदे आणि फडणवीस आमच्या सारख्याला तुरुंगात टाकायला कमी नाही करणार,” असा मोठा दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे.