
फोटो सौजन्य सोशल मिडिया
Prakash Ambedkar Urges : सध्या राज्यात आणि राजधानी दिल्ली येथे काॅक्रोच जनता पार्टीचे आंदोलन सुरू असून हे आंदोलन निवडणुक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजिनाम्यासाठी आणि MPSC – UPSC तसेच NEET च्या पेपर फुट्टी विरुद्ध जोरदार आंदोलन झाल्याचे दिसून आले. या आंदोलनात विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हजारो विद्यार्थी रस्त्यावर लढताना दिसत असून आपल्या न्याय हक्का साठी लढत आहेत.
कुछ महीनों से मैं देख रहा हूँ कि दलित हो, ओबीसी हो या आदिवासी, इनको टीवी, अख़बार या राजनीतिक दलों ने नज़रअंदाज़ कर दिया है और इनको कहीं भी स्थान नहीं मिल रहा है। ये एक तरीका है इनको नकारे जाने का। लोगों के सामने ये दिखें नहीं, तो लोग भूल जाएँगे। ये एक तरीका है। मैं तमाम ओबीसी, आदिवासी, दलित, बौद्धों से गुज़ारिश करता हूँ कि क्या इस बात को आपने महसूस किया है या नहीं? ज्ञानेश कुमार के खिलाफ़ जो आंदोलन चला, उसमें न मायावती दिखीं, न चंद्रशेखर आज़ाद दिखे। इसीलिए आपसे मैं कह रहा हूँ कि आपको अपना मीडिया बनाना होगा, तब जाकर आप अपना वजूद बचा पाएँगे। आप अपना अस्तित्व बनाएँ, चाहे फिर वोट के माध्यम से हो या सोशल मीडिया के माध्यम से। जय भीम, जय संविधान! #OBC #SC #ST — Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) October 12, 2026
गेल्या काही महिन्यांपासून मी पाहत आहे की, दलित, ओबीसी किंवा आदिवासी या सर्वांकडे टीव्ही, वर्तमानपत्रे आणि राजकीय पक्षांनी पूर्णपणे दुर्लक्ष केले असून त्यांना कुठेही स्थान मिळत नाही. त्यांना नाकारण्याचा किंवा त्यांच्या अस्तित्वाला पुसून टाकण्याचा हा एक मार्ग आहे. जर ते लोकांसमोर आले नाहीत, तर लोक त्यांना विसरून जातील; ही एक पद्धतच आहे. असे मत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या एक्स अकांऊटच्या माध्यमातून केले.
काॅक्रोच जनता पार्टीच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरू आहे. पण ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जी चळवळ चालवली गेली जात आहे, त्यात तुम्हाला ही गोष्ट जाणवली आहे की नाही? विरोधी पक्ष नेत्या- बसपा अध्यक्ष मायावती आणि चंद्रशेखर आझाद हे कुठेच आंदोलनात दिसले नाहीत. किंवा पाठींबा सुद्धा दर्शवताना दिसले नाहीत.
यासाठी तुम्हाला तुमचे स्वतःचे माध्यम (मीडिया) निर्माण करावे लागेल; तरच तुम्ही तुमचे अस्तित्व वाचवू शकता. मग ते मतदानाद्वारे असो किंवा सोशल मीडियाद्वारे, तुमची स्वतःची ओळख निर्माण करावी लागेल; असे आवाहान वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकरांनी केले.
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या एक्स अंकाऊटवर व्हिडिओ शेअर करून म्हणाले की, गेल्या काही महिन्यांपासून मी पाहत आहे की, दलित, ओबीसी किंवा आदिवासी यांच्या प्रश्नाकडे सर्वांनी दुर्लक्ष केले आहे. तर त्यांना कोठेही स्थान मिळत नाही आहे. त्यांना नाकारण्याचा किंवा त्यांच्या अस्तित्वाला पुसून टाकण्याचा हा एक मार्ग आहे. जर हे लोक लोकांसमोर आले नाहीत, तर लोक त्यांना विसरून जातील, ही एक पद्धतच आहे. मी सर्व ओबीसी, आदिवासी, दलित आणि बौद्धांना आवाहन करतो—तुम्हाला ही गोष्ट जाणवली आहे की नाही ? असा प्रश्न चित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे.