Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 13 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रवाशांच्या सेवेसाठी एसटीचा ताफा होणार अधिक सक्षम; तब्बल 5 हजार ‘लालपरी’ बसेसची निविदा प्रक्रिया पूर्ण

प्रवाशांना अधिक सुरक्षित, आरामदायी, दर्जेदार आणि विश्वासार्ह सार्वजनिक वाहतूक सेवा देण्याच्या उद्देशाने एसटी महामंडळाने बस ताफ्याच्या विस्तारासोबतच आधुनिकीकरणाला वेग दिला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 13, 2026 | 03:19 PM
प्रवाशांच्या सेवेसाठी एसटीचा ताफा होणार अधिक सक्षम; तब्बल 5 हजार ‘लालपरी’ बसेसची निविदा प्रक्रिया पूर्ण

प्रवाशांच्या सेवेसाठी एसटीचा ताफा होणार अधिक सक्षम; तब्बल 5 हजार ‘लालपरी’ बसेसची निविदा प्रक्रिया पूर्ण

Follow Us
Follow Us:

मुंबई : महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील सर्वसामान्य प्रवाशांच्या जीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या एसटी अर्थात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बस ताफ्याला आता आधुनिकतेची नवी झळाळी मिळणार आहे. प्रवाशांना अधिक सुरक्षित, आरामदायी, दर्जेदार आणि विश्वासार्ह सार्वजनिक वाहतूक सेवा देण्याच्या उद्देशाने एसटी महामंडळाने बस ताफ्याच्या विस्तारासोबतच आधुनिकीकरणाला वेग दिला आहे. नव्या बसेसच्या माध्यमातून एसटीची सेवा अधिक सक्षम करण्याचा संकल्प करण्यात आला असून, त्याच दिशेने ५,००० ‘लालपरी’ बसेसच्या खरेदीची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.

या निविदा प्रक्रियेत सर्वांत कमी दराचा देकार टाटा मोटर्ससारख्या नामांकित आणि विश्वासार्ह संस्थेने सादर केला आहे. त्यामुळे बसेसच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असा विश्वास मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला. मंत्री सरनाईक म्हणाले की, नव्या ५,००० ‘लालपरी’ बसेस एसटीच्या ताफ्यात दाखल झाल्यानंतर ग्रामीण महाराष्ट्राची ‘लोकवाहिनी’ असलेल्या एसटीला मोठी बळकटी मिळणार आहे. नव्या बसेसमुळे जुन्या बसेसवरील ताण कमी होईल, बसफेऱ्यांची उपलब्धता वाढविणे शक्य होईल आणि प्रवाशांना अधिक चांगली सेवा देता येईल. जुन्या व गळक्या बसेस तसेच प्रवासादरम्यान बसेस बंद पडण्याच्या समस्येवरही नव्या ताफ्यामुळे प्रभावीपणे मात करता येणार आहे.

पुढील सहा महिन्यांत सुमारे ५,००० हून अधिक बसेस प्रवासी सेवेतून कालबाह्य होऊन भंगारात जाणार आहेत. सध्या महामंडळाला नाईलाजास्तव १२ ते १४ वर्षे जुन्या झालेल्या बसेसची दुरुस्ती करून त्यांचा प्रवासी सेवेसाठी वापर करावा लागत आहे. या बसेस सातत्याने रस्त्यात नादुरुस्त होत असल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो. चालकांनाही अशा जुन्या बसेस चालविताना मोठी कसरत करावी लागते. या सर्व समस्यांना लवकरच पूर्णविराम मिळणार आहे. एसटी महामंडळाने यापूर्वीच बसताफ्याच्या आधुनिकीकरणाला सुरुवात केली आहे. २ बाय २ आसन व्यवस्थेच्या २,६४० ‘लालपरी’ बसेस ताफ्यात दाखल झाल्या आहेत. त्याचबरोबर ३ बाय २ आसन व्यवस्थेच्या ३,००० ‘राजमाता जिजाऊ’ बसेस ताफ्यात दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. नव्या बसेसच्या समावेशामुळे एसटीचा ताफा अधिक तरुण, सक्षम आणि प्रवाशांच्या गरजांशी सुसंगत होत आहे.

मागेल त्याला बस

सध्या एसटीकडे बसेसची कमतरता असल्याने अनेक शालेय फेऱ्या अचानक रद्द करणे, ग्रामीण भागातील मुक्कामी बसेस उपलब्ध न होणे, अशा कटू प्रसंगांना सामोरे जावे लागत आहे. नव्या ५,००० बसेस ताफ्यात दाखल झाल्यानंतर ‘मागेल त्याला बसफेरी’ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. बसफेरीचा फायदा झाला नाही तरी चालेल; मात्र बसफेरीची मागणी करणाऱ्यांनी ती फेरी तोट्यात चालणार नाही, याची हमी घ्यावी, असे आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे.

हे सुद्धा वाचा : जांभुळवाडीतील दरी पुलावर ट्रकचा भीषण अपघात, दोघांचा मृत्यू; जखमींचाही आकडा समोर

विशेष म्हणजे, ५,००० ‘लालपरी’ बसेसचा हा टप्पा एसटीच्या पारंपरिक डिझेल बसच्या युगातील महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. यानंतर पर्यावरणपूरक ई-बसेसच्या दिशेने एसटी महामंडळाचा प्रवास अधिक वेगाने सुरू होणार आहे. त्यामुळे प्रवाशांना आधुनिक वाहतूक सुविधा उपलब्ध करून देतानाच पर्यावरण संवर्धनालाही प्राधान्य मिळणार आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी, शेतकरी, कामगार, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य प्रवाशांपासून लाखो नागरिकांच्या दैनंदिन प्रवासाची विश्वासू सोबती असलेल्या एसटीच्या ताफ्यात होणारी ही मोठी भर म्हणजे केवळ बसेसची संख्या वाढविणे नव्हे, तर प्रवाशांच्या सुरक्षित, सुखकर आणि दर्जेदार प्रवासाला नवी दिशा देणारे महत्त्वपूर्ण पाऊल आहे. ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब्रीद अधिक प्रभावीपणे साकार करण्यासाठी एसटी आता नव्या दमाने, नव्या तंत्रज्ञानासह आणि पर्यावरणपूरक भविष्यासाठी सज्ज होत आहे, असे प्रतिपादन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले.

Web Title: Pratap sarnaik stated that many lalpari buses are set to join the st fleet

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 13, 2026 | 03:19 PM

Topics:  

  • pratap sarnaik
  • st bus

संबंधित बातम्या

Nashik Bus Stand: बसस्थानकच आले रस्त्यावर! तीन महिने प्रवाशांचे हाल, सिटीलिंकच्या केवळ एका बसला जागा
1

Nashik Bus Stand: बसस्थानकच आले रस्त्यावर! तीन महिने प्रवाशांचे हाल, सिटीलिंकच्या केवळ एका बसला जागा

Pratap Sarnaik: ॲप टॅक्सी चालकांसाठी मोठी बातमी! कंपन्यांना 3 महिन्यांत द्यावी लागणार चालकांची संपूर्ण माहिती
2

Pratap Sarnaik: ॲप टॅक्सी चालकांसाठी मोठी बातमी! कंपन्यांना 3 महिन्यांत द्यावी लागणार चालकांची संपूर्ण माहिती

MSRTC News: एसटी महामंडळ संकटात; 4,500 कोटींहून अधिक वैधानिक देणी थकीत, 200 कोटींच्या कर्ज परतफेडीचाही मागितला हिशोब
3

MSRTC News: एसटी महामंडळ संकटात; 4,500 कोटींहून अधिक वैधानिक देणी थकीत, 200 कोटींच्या कर्ज परतफेडीचाही मागितला हिशोब

Pratap Sarnaik: ‘आमदार मोठा की कायदा?’ बेकायदा बांधकामांवरून प्रताप सरनाईकांचा नरेंद्र मेहतांवर निशाणा
4

Pratap Sarnaik: ‘आमदार मोठा की कायदा?’ बेकायदा बांधकामांवरून प्रताप सरनाईकांचा नरेंद्र मेहतांवर निशाणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.