Pregnant cow finally released after 10 hours on Tadiwala Road in Pune
पुणे : पुण्यामध्ये अग्निशमन दलाची परिक्षा पाहणारी घटना घडली. आज (दि.25) पहाटे सहाच्या सुमारास ताडीवाला रोड येथील झोपडपट्टीत एका अरुंद गल्लीमध्ये गाय अडकून बसली. ही गल्ली अगदी अरुंद असल्यामुळे गायीला यामधून बाहेरही पडता येत नव्हते आणि पुढेही जाता येत नव्हते. तसेच गाय आठ महिन्यांची गरोदर असल्यामुळे ती अडकलेल्या अवस्थेत अनेक तास अडकली होती. दरम्यान, अग्निशमन दलाची दोन वाहने दाखल होत सुटकेसाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले.
अग्निशमन दलाच्या जवानांनी सेफ्टी बेल्ट, रश्शी, पुली अशा विविध उपकरणांच्या साह्याने अडकलेल्या गायीला बाहेर काढण्यास सुरुवात केली. यामध्ये अरुंद असलेली बोळ ही एल (L) आकार अरुंद गल्ली दीड ते दोन फुट असल्यामुळे मोठ्या प्रमाणात अडचणी येत होत्या. पुली लावून गायीचे अडकलेले पाय बाहेर काढून उभे करण्याचा प्रयत्न केला. जवळपास सर्व प्रकारे प्रयत्न करीत असताना गाय बाहेर निघत नव्हती. यामुळे मदतीकरिता वाईल्ड लाईफ रेस्क्यु टिमला देखील बोलवण्यात आली. अग्निशमन दल आणि वाईल्ड लाईफ रेस्क्यु टीम एकत्रितपणे हे काम करत होते. त्याचवेळी त्यांनी ही विविध उपकरणे वापरत सुटकेचे प्रयत्न केले. सकाळपासून संध्याकाळपर्यंत गाय बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु होते.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मात्र गाय ही पूर्णपणे अडकली गेली होती. त्यामुळे सकाळपासून गाईला बाहेर काढण्याचे प्रयत्न अगदी सायंकाळपर्यंत सुरु होते. गाय गरोदर असल्याने अतिशय संवेदनशीलतेने पूर्ण प्रयत्न केले जात होते. मात्र गाय अडकलेली गल्ली ही अत्यंत बारीक गल्ली होती. तसेच पुढे घरांचे जीने होते. यामुळे दलाला अडथळा होत असल्याने जीना तोडण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. पुली, रश्शी, सेफ्टी बेल्ट वापरुन गायीला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु झाले. शेवटी गल्लीमधील रहिवाशांच्या घराबाहेरील चार जीने व कट्टे काढून हळुवारपणे गायीला बाहेर काढण्यात यश आले. या सर्व कामगिरीकरिता जवळपास दहा तासांचा अवधी लागला. गाय बाहेर येताच नागरिकांनी आनंद व्यक्त केला. त्यामुळे गरोदर असणारी गोमाता ही तब्बल 10 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर बाहेर काढण्यात यश आले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
यावेळी वरिष्ठ अग्निशमन अधिकारी विजय भिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशमन दल, वाईल्ड लाईफ रेस्क्यु टिम, अँब्युलंस, पोलीस विभाग, ढोले पाटील क्षेत्रिय कार्यालय, स्थानिक नागरिक या सर्व यंत्रणांनी सहभाग घेत कामगिरी यशस्वीरित्या पूर्ण केली.
मागील आठवण्यामध्ये पुण्यातील रविवार पेठेत असणाऱ्या एका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर गाय अडकली होती. रविवार पेठेतील कापड गल्ली येथे एका इमारतीत गाय वर चढत गेली. अग्निशमन दलाचे अधिकारी आणि जवान घटनास्थळी दाखल होऊन दुसऱ्या मजल्यावरून गो- मातेला खाली आणण्याचे प्रयत्न केला. अग्निशमन दलाकडून क्रेन देखील आता मागवण्यात आलेली आहे. दुसऱ्या मजल्यावर अडकलेल्या गाईला अग्निशमन दलाने सुखरूप आणले खाली पुण्यातील रविवार पेठ एका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर एक गाय अडकली होती. अग्निशामक दलाकडून क्रेनच्या सहाय्याने गाईला खाली आणण्यात यश आले होते.