पत्नीने केला पतीचा खून (फोटो - istock)
शिक्रापूर : खंडाळे ता. शिरुर गावच्या हद्दीमध्ये तिहेरी हत्याकांडाचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यामध्ये एका महिलेसह दोन लहान बालकांचा खून करुन पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेह जाळून टाकण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या प्रकरणामध्ये रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे अज्ञात व्यक्तीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खंडाळे ता. शिरुर येथील ग्रोवेल कंपनीचे कामगार कंपनीत आले असताना काही कामगारांना कंपनीच्या पाठीमागे लक्ष्मी मंदिराजवळ एका महिलेसह दोन लहान बालकांचे मृतदेह पावसामध्ये पडले असल्याचे दिसून आले. याबाबतची माहिती पोलीस पाटील सीमा पंडित यांनी पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब येळे, पोलीस हवालदार तेजस रासकर, हेमंत इनामे, केशव कोरडे, पोलीस शिपाई उमेश कुतवळ, यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यावेळी अंदाजे २५ ते ३० वर्षे वयाची महिला तसेच अंदाजे ३ ते ४ वर्षे व १ ते २ वर्षे वयाच्या एका मुलाचा मृतदेह आढळून आला.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मात्र यावेळी तिघांचे मृतदेह पेट्रोल टाकून पेटवून देण्यात आल्याचे समोर आले, दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांनी देखील घटना स्थळी भेट देऊन पाहणी केली तसेच घटनास्थळी अंगुली पथक व श्वान पथकाने भेट देत चौकशी केली आहे, मात्र सदर महिला व मुलांबाबत काहीही माहिती मिळाली नसून पोलिसांनी तिघांचे मृतदेह शवविच्छेदन साठी पाठवून दिले आहेत. याबाबत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब भीमराव येळे वय ५५ वर्षे रा. कारेगाव ता. शिरुर जि. पुणे यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी अज्ञात व्यक्तीवर खून व खुनाचा पुरावा नष्ट करण्याबाबत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे हे करत आहे.
खंडाळे येथे खून झालेल्या ठिकाणी काहीही पुरावा मिळून आला नसून सदर घटना पूर्ण निर्जनस्थळी घडली असून फक्त सदर महिलेच्या एका हातावर जयभीम आणि एका हातावर काहीतरी गोंधलेले दिसून आले असल्याने पोलीस सदर खुनाचा तपास करण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहे.
क्राईम न्यूज वाचण्यासाठी क्लिक करा
जेवणासाठी बनवलेले मासे कुत्र्याने खाल्ल्याने आईचा खून
धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील वाठोडे गावातील देवेंद्र बिलेसिंग राजपूत यांच्या ताजपुरी शिवारातील शेतात काम करणाऱ्या टिपाबाई रेबला पावरा या महिलेने जेवणासाठी मासे बनवले होते. जेवणासाठी बनवलेले मासे कुत्र्याने खाल्ल्याच्या रागातून टिपाबाई रेबला पावरा यांचा मुलगा आवलेस रेबला पावरा याने आईच्या डोक्यात लाकडी दांडक्याने मारहाण केली. यामध्ये टिपाबाई पावरा यांचा मृत्यू झाला आहगे. यानंतर अवघ्या काही तासातच पोलिसांनी आरोपी आवलेस पावरा याला ताब्यात घेतले आहे. जेवणासाठी बनवलेले मासे कुत्र्याने खाल्ल्याच्या रागातून मुलाने आईला संपवलं. मुलाने थेट आईच्या डोक्यात लाकडी दांडका मारल्याने आईचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. टिपाबाई रेबला पावरा असं मृत्यू झालेल्या आईचा नाव आहे. तर आवलेस रेबला पावरा असे आरोपी मुलाचं नाव आहे.