Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gudi Padwa 2026: ‘पुरणपोळी’ गोड होणार; चणाडाळ, साखरेच्या दरात घट, मात्र इंधन….

पिंपरी-चिंचवडमधील किरकोळ बाजारपेठेत गेल्या आठवड्यापर्यंत ६८ रुपये किलो दराने मिळणारी चणाडाळ आता ६४ रुपयांपर्यंत खाली आली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 17, 2026 | 02:35 AM
Gudi Padwa 2026: ‘पुरणपोळी’ गोड होणार; चणाडाळ, साखरेच्या दरात घट, मात्र इंधन….
Follow Us
Follow Us:

अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला गुढीपाडवा
चणाडाळ आणि साखरेच्या दरात घसरण
सर्वसामान्यांना मिळाला मोठा दिलासा

पिंपरी: मराठी नववर्षाचा स्वाभिमान आणि उत्साहाचा सण असलेला ‘गुढीपाडवा‘ आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. औद्योगिक नगरीत सणाचे वातावरण तयार झाले असतानाच गृहिणींसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. पुरणपोळीसाठी लागणारे मुख्य साहित्य म्हणजेच चणाडाळ आणि साखरेच्या दरात घसरण झाल्याने सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, दुसरीकडे घरगुती गॅस आणि संभाव्य इंधन दरवाढीमुळे सणाच्या आनंदावर महागाईचे विरजण पडण्याची भीतीही व्यक्त होत आहे.

डाळींच्या आयातीमुळे दर घसरले
पिंपरी-चिंचवडमधील किरकोळ बाजारपेठेत गेल्या आठवड्यापर्यंत ६८ रुपये किलो दराने मिळणारी चणाडाळ आता ६४ रुपयांपर्यंत खाली आली आहे. केंद्र सरकारने परदेशातून मोठ्या प्रमाणावर डाळींची आयात केल्यामुळे स्थानिक बाजारपेठेत पुरवठा वाढला असून त्याचे थेट प्रतिबिंब दरांमध्ये उमटले आहे. साखरेचे दरही सध्या स्थिर असल्याने पाडव्याच्या गोडधोड पदार्थांच्या खरेदीसाठी बाजारपेठेत ग्राहकांची लगबग सुरू झाली आहे. मुबलक साठ्यामुळे साखरेचे भाव नियंत्रणात असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ
एकीकडे स्वस्त डाळींमुळे ग्राहकांचे बजेट सावरले असले, तरी हरभरा उत्पादक शेतकरी मात्र संकटात सापडला आहे. आयात वाढल्यामुळे स्थानिक हरभऱ्याचे भाव कोसळले असून, वाढत्या उत्पादन खर्चाच्या तुलनेत अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांकडून खंत व्यक्त होत आहे. “ग्राहकांचे हित जपताना शेतकऱ्यांच्या श्रमाचे मोल मिळणेही तितकेच गरजेचे आहे, यासाठी सरकारने संतुलित धोरण आखण्याची गरज आहे,” असे मत कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

Gudi Padwa 2026: गुढी पाडव्याच्या दिवशी काय करावे? गुढी उभारण्याची पद्धत जाणून घ्या

गॅस आणि पेट्रोल-डिझेलची टांगती तलवार
चणाडाळ स्वस्त झाली असली तरी इतर आघाड्यांवर महागाईचा तडाखा बसताना दिसत आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे नुकतीच घरगुती गॅसच्या दरात ६० रुपयांची मोठी वाढ झाली आहे. त्यातच कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती पाहता पेट्रोल आणि डिझेलचे दरही वाढण्याची दाट शक्यता आहे. जर इंधन दर वाढले, तर वाहतूक खर्च वाढून सणासुदीच्या इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमती कडाडतील, अशी भीती व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

थोडक्यात स्थिती:
चणाडाळ: ६८ रुपयांवरून ६४ रुपयांवर (प्रतिकिलो).
साखर: दर स्थिर, साठा मुबलक.
घरगुती गॅस: ६० रुपयांची वाढ.

Gudi Padwa 2026: नववर्ष स्वागतयात्रेची सुरुवात कधी आणि कशी झाली तुम्हाला माहीत आहे का? जाणून घ्या इतिहास

चिंता: इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढण्याची शक्यता.
एकूणच, डाळ-साखरेच्या घसरलेल्या दरांनी पाडव्याची पुरणपोळी गोड होणार असली, तरी गॅस आणि इंधनाच्या झळा या आनंदावर किती परिणाम करतात, हे येणाऱ्या दिवसांत स्पष्ट होईल.

Web Title: Price dropped at sugar and chana dal before hindu marathi gudi padwa festival 2026 pcmc news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 17, 2026 | 02:35 AM

Topics:  

  • Gudi Padwa
  • Hindu Festival
  • Pimpri Chinchwad

संबंधित बातम्या

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीने घेतला ‘हा’ महत्त्वपूर्ण निर्णय; सभापती अभिषेक बारणे यांनी दिली माहिती
1

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीने घेतला ‘हा’ महत्त्वपूर्ण निर्णय; सभापती अभिषेक बारणे यांनी दिली माहिती

सोलापूरच्या विद्यार्थ्यांसाठी पिंपरी-चिंचवडमध्ये वसतिगृह; २० गुंठे जमीन देण्याचे आमदार शंकर जगताप यांचे आश्वासन
2

सोलापूरच्या विद्यार्थ्यांसाठी पिंपरी-चिंचवडमध्ये वसतिगृह; २० गुंठे जमीन देण्याचे आमदार शंकर जगताप यांचे आश्वासन

पिंपरी-चिंचवडमधील खड्डे 48 तासांत बुजवा, कामचुकारपणा केल्यास…; आयुक्तांचे महापालिका अधिकाऱ्यांना कडक निर्देश
3

पिंपरी-चिंचवडमधील खड्डे 48 तासांत बुजवा, कामचुकारपणा केल्यास…; आयुक्तांचे महापालिका अधिकाऱ्यांना कडक निर्देश

पिंपरी-चिंचवड पोलीस दलात मोठे फेरबदल, 12 नव्या निरीक्षकांची एन्ट्री; सहा निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या
4

पिंपरी-चिंचवड पोलीस दलात मोठे फेरबदल, 12 नव्या निरीक्षकांची एन्ट्री; सहा निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.