Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 26 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Risod News : महागाईचा वाढता फटका! गॅस, पेट्रोल-डिझेल दरवाढीने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले

गेल्या दोन महिन्यांत एलपीजी, पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांवरील आर्थिक ताण मोठ्या प्रमाणात वाढला आहे. घरगुती गॅस सिलिंडरची किंमत १,००० रुपयांच्या उंबरठ्यावर पोहोचल्याने गृहिणींचे मासिक बजेट कोलमडले आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jun 30, 2026 | 08:03 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

रिसोड : गेल्या दोन महिन्यांत घरगुती एलपीजी, व्यावसायिक गॅस सिलिंडर तसेच पेट्रोल आणि डिझेलच्या दरात झालेल्या वाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांवर आर्थिक ताण वाढला आहे. आधीच महागाईने हैराण झालेल्या कुटुंबांसाठी इंधन दरवाढीने आणखी अडचणी निर्माण केल्या असून, “महागाईच्या काळात जगायचे कसे?” असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

प्रभाग 25 मधील स्वच्छता अन् सफाईची कामे तातडीने पूर्ण करा; राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या प्रशासनाला सूचना

केंद्र सरकारने एप्रिल २०२६ मध्ये घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात सुमारे ७५ रुपयांची वाढ केली. त्यानंतर अनेक शहरांमध्ये १४.२ किलोच्या घरगुती सिलिंडरची किंमत ९८० ते १,००० रुपयांहून अधिक झाली आहे. याचा थेट परिणाम गृहिणींच्या मासिक बजेटवर झाला असून, स्वयंपाकासाठी लागणाऱ्या गॅसचा खर्च वाढल्याने अनेक कुटुंबांचे आर्थिक गणित विस्कळीत झाले आहे.

व्यावसायिक वापराच्या १९ किलो एलपीजी सिलिंडरच्या किमतीतही टप्प्याटप्प्याने वाढ झाली असून, त्याची किंमत २,२०० ते २,३०० रुपयांपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे हॉटेल, खानावळ, भोजनालय, नाश्ता केंद्र, चहाच्या टपऱ्या, बेकरी आणि लघुउद्योजकांवर मोठा आर्थिक भार पडला आहे. परिणामी, खाद्यपदार्थांच्या किमती वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

महागाईमुळे खाद्यतेल, साखर, चहा, डाळी, साबण यांसारख्या दैनंदिन वापराच्या वस्तूंचे दरही वाढले आहेत. मात्र, उत्पन्नात त्यानुसार वाढ न झाल्याने सर्वसामान्य कुटुंबांचे मासिक बजेट कोलमडले आहे. मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबांसाठी तर ही परिस्थिती अधिक गंभीर बनली असून, वाढत्या खर्चामुळे घर चालवणे कठीण झाल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.

Buldhana News : पावसाची संथ गती, टंचाईची तीव्रता कायम! पेरण्यांची गतीही चांगली मंदावली

रिसोड परिसरातील गंगासागर चोपडे, तेजस्विनी रोडगे, ज्योती गाहे आणि लता खंदारे यांनी महागाईमुळे घरखर्चाचा ताळमेळ बसवणे अवघड झाले असून, सरकारने दरवाढीवर नियंत्रण आणण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. नागरिकांच्या मते, जीवनावश्यक वस्तू आणि इंधनाच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्यांचे जगणे दिवसेंदिवस अधिक कठीण होत आहे.

Web Title: Price hikes in lpg petrol and diesel have thrown the common mans budget out of gear in risod

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 30, 2026 | 08:03 PM

Topics:  

  • Risod Taluka
  • Washim

संबंधित बातम्या

Washim crime: अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध, आंतरजातीय विवाहाला घरच्यांचा विरोध; प्रेमीयुगलाने मोर्णा तलावात उडी घेत संपवलं जीवन
1

Washim crime: अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध, आंतरजातीय विवाहाला घरच्यांचा विरोध; प्रेमीयुगलाने मोर्णा तलावात उडी घेत संपवलं जीवन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.