Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 10 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Washim: पीक कापणी प्रयोग अचूक आणि पारदर्शकपणे राबवा; जिल्हाधिकाऱ्यांकडून इलखी येथे पाहणी

Washim Soybean crop yield assessment: वाशिमचे जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी इलखी येथे सोयाबीन पीक कापणी प्रयोगाची प्रत्यक्ष पाहणी करून प्रक्रिया अचूक, पारदर्शक आणि निर्धारित नियमांनुसार राबविण्याच्या सूचना दिल्या.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Oct 10, 2026 | 08:58 PM
Washim Soybean crop yield assessment

Washim Soybean crop yield assessment

Follow Us
Follow Us:
  • सोयाबीन उत्पादकतेचे अचूक मूल्यमापन करा
  • जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांचे निर्देश
  • वाशिमच्या जिल्हाधिकाऱ्यांनी तपासली प्रक्रिया

वाशिम: पीक कापणी प्रयोगातून प्राप्त होणारी आकडेवारी ही जिल्ह्यातील विविध पिकांची उत्पादकता, उत्पादनाची वास्तविक स्थिती आणि हंगामातील पिकांच्या कामगिरीचे मूल्यमापन करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची असते. त्यामुळे पीक कापणी प्रयोगाची प्रक्रिया अचूक, पारदर्शक आणि वस्तुस्थितीदर्शक असणे आवश्यक आहे. क्षेत्रीय यंत्रणांनी निर्धारित नियम व कार्यपद्धतीनुसार पीक कापणी प्रयोग काळजीपूर्वक राबवावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी दिल्या.

Washim: केंद्रीय पथकाकडून दुष्काळग्रस्त भागाची पाहणी; वाशिम जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा घेतला आढावा

वाशिम तालुक्यातील इलखी येथे बुधवारी घेण्यात आलेल्या सोयाचीन पीक कापणी प्रयोगाची जिल्हाधिकारी कुंभेजकर यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी पीक कापणी प्रयोगासाठी निश्चित करण्यात आलेले क्षेत्र, पीक कापणीची पद्धत, कापणी केलेल्या उत्पादनाचे वजन तसेच प्रयोगानंतर करण्यात येणारी नोंदणी याचाबतची माहिती घेतली. इलखी येथील प्रयोगादरम्यान सोयाबीन पिकाचे एकूण वजन २ किलो ८०५ ग्रॅम नोंदविण्यात आले. या प्रयोगाच्या माध्यमातून प्राप्त होणारी आकडेवारी शासनाच्या विविध कृषीविषयक निर्णयांसाठी महत्त्वाची असल्याने नोंदी करताना कोणत्याही प्रकारची त्रुटी राहू नये, याची दक्षता घेण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

पीक कापणी प्रयोगातून मिळणाऱ्या उत्पादनाच्या आकडेवारीचा उपयोग पिकांची सरासरी उत्पादकता निश्चित करण्यासाठी तसेच कृषी क्षेत्रातील परिस्थितीचे मूल्यमापन करण्यासाठी केला जातो. त्यामुळे केवळ प्रशासकीय प्रक्रिया म्हणून प्रयोग न राबविता प्रत्यक्ष शेतातील परिस्थितीचे अचूक प्रतिबिंब त्यातून उमटले पाहिजे, याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष वेधले. यावेळी तहसीलदार नीलेश पळसकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरिफ शाह, पर्यवेक्षक अधिकारी तथा तालुका कृषी अधिकारी अतुल जावळे, मंडळ कृषी अधिकारी शिवाजी जाधव, कृषी अधिकारी गंगाधर इंगोले आणि सहाय्यक कृषी अधिकारी सुनील गोटे उपस्थित होते.

निकषांचे काटेकोर पालन करणे गरजेचे

पीक कापणी प्रयोगाची निवड, प्रत्यक्ष कापणी, उत्पादनाचे वजन आणि त्याची नोंद या प्रत्येक टप्प्यावर निर्धारित निकषांचे काटेकोर पालन करणे गरजेचे आहे. क्षेत्रीय स्तरावर प्राप्त होणारी आकडेवारी ही शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष उत्पादनस्थितीशी सुसंगत असावी. त्यामुळे प्रयोगाच्या वेळी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासोबतच अचूक मोजमाप व नोंदणीवर विशेष भर द्यावा, असेही जिल्हाधिकारी कुंभेजकर यांनी स्पष्ट केले.

Washim: आठवड्यात दोनवेळा पाणीपुरवठा करा, तंटामुक्त समिती अध्यक्षांचे ग्रामपंचायतला निवेदन

Web Title: Washim soybean crop cutting experiment yield collector yogesh kumbhejkar inspect pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 10, 2026 | 08:58 PM

Topics:  

  • Benefit to farmers
  • soyabin
  • Washim
  • Washim news

संबंधित बातम्या

Washim: केंद्रीय पथकाकडून दुष्काळग्रस्त भागाची पाहणी; वाशिम जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा घेतला आढावा
1

Washim: केंद्रीय पथकाकडून दुष्काळग्रस्त भागाची पाहणी; वाशिम जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा घेतला आढावा

Washim: आठवड्यात दोनवेळा पाणीपुरवठा करा, तंटामुक्त समिती अध्यक्षांचे ग्रामपंचायतला निवेदन
2

Washim: आठवड्यात दोनवेळा पाणीपुरवठा करा, तंटामुक्त समिती अध्यक्षांचे ग्रामपंचायतला निवेदन

वाशिममधील २९१ ‘शून्य निपुण’ शाळांवर विशेष लक्ष; जिल्हाधिकाऱ्यांनी दिले निर्देश, प्रभावी उपाययोजनांसाठी जिल्हा सुकाणू समितीची सभा
3

वाशिममधील २९१ ‘शून्य निपुण’ शाळांवर विशेष लक्ष; जिल्हाधिकाऱ्यांनी दिले निर्देश, प्रभावी उपाययोजनांसाठी जिल्हा सुकाणू समितीची सभा

Handball Tournament: अजित-ओमची भरारी! गुरुकुलच्या दोन शिलेदारांची थेट महाराष्ट्राच्या राष्ट्रीय संघात निवड
4

Handball Tournament: अजित-ओमची भरारी! गुरुकुलच्या दोन शिलेदारांची थेट महाराष्ट्राच्या राष्ट्रीय संघात निवड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.