Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

19 जानेवारीला मुंबईत पंतप्रधान मोदींची सभा, विविध प्रकल्पाचं होणार भूमिपूजन, खर्चाचा बोजा मात्र महापालिकेवर!

पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 जानेवारी रोजी मुंबई दौरा आयोजीत आहेत. यावेळी ‘बीकेसी’ येथे ‘एमएमआरडीए’ मैदानावर त्यांची सभाही होणार आहे. याच कार्यक्रमात महापालिकेच्या अनेक कामांचे भूमिपूजन करण्यात येणार आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Jan 17, 2023 | 09:19 AM
19 जानेवारीला मुंबईत पंतप्रधान मोदींची सभा, विविध प्रकल्पाचं होणार भूमिपूजन, खर्चाचा बोजा मात्र महापालिकेवर!
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : येत्या काही दिवसात मुंबई महानगरपालिका निवडणूक (Bmc Election) होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते विविध प्रकल्पांच भुमिपूजन करण्यात येणार आहे. मात्र, ठाकरे सरकारच्या काळात झालेल्या कामांच्या भूमिपूजनही यावेळी करण्यात येणार असून आता कार्यक्रमासाठीचा संपूर्ण खर्चदेखील महापालिकेच्याच माथी मारण्यात आला आहे. असा आरोप सामनातून करण्याता आला आहे. विशेष म्हणजे, या भूमिपूजनात राज्य सरकारच्या अखत्यारीतील प्रकल्प, ठाण्यातील प्रकल्पांचाही समावेश असल्याची माहिती आहे. शिवाय श्रेय लाटण्यासाठी ‘मिंधे’ सरकारच्या दबावाखाली याआधी भूमिपूजन झालेल्या प्रकल्पांचेही पुन्हा भूमिपूजन करण्यात येणार आहे. पालिकेची संपूर्ण यंत्रणा कार्यक्रमाच्या तयारीसाठी जुंपली आहे.

[read_also content=”पुुणे बंगळुरू महामार्गावरील दोन बोगद्यांच काम प्रगतीपथावर, प्रवाशांचा वेळ वाचणार! अपघातही टाळता येणे शक्य https://www.navarashtra.com/maharashtra/the-work-of-two-tunnels-on-the-pune-bangalore-highway-is-in-progress-the-time-of-the-passengers-will-be-saved-accidents-can-also-be-avoided-nrps-362230.html”]

19 जानेवारीला मोंदीचा मुंबई दौरा

पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 जानेवारी रोजी मुंबई दौरा आयोजीत आहेत. यावेळी ‘बीकेसी’ येथे ‘एमएमआरडीए’ मैदानावर त्यांची सभाही होणार आहे. याच कार्यक्रमात महापालिकेच्या अनेक कामांचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. यामध्ये मुंबईतील 6000 कोटींचे 400 किमीचे सिमेंट काँक्रीटचे रस्ते, 26 हजार कोटींच्या सिव्हरेज ट्रिटमेंट प्लांट, नवी मोठी रुग्णालये यांचा समावेश आहे. तर, तिकडे ठाण्याचे कॅन्सर हॉस्पिटल, नवी मुंबई मेट्रो भूमिपूजन तर मुंबई मेट्रो मार्ग – 7, मेट्रो-2च्या दुसऱया टप्प्याचे उद्घाटन करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर कार्यक्रमासाठी होणाऱया खर्चाची जबाबदारीही संबंधित सर्व आस्थापनांनी विभागून घेणे आवश्यक होते. मात्र केवळ ‘मिंधे’ सरकारच्या दबावामुळेच कार्यक्रमाचा संपूर्ण खर्च महापालिकेच्या माथी मारण्यात आल्याबद्दल मुंबईकरांमधून तीक्र संताप व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे पालिकेची यंत्रणा-प्रशासन  या कार्यक्रमाच्या नियोजनात जुंपण्यात आल्याने अधिकारी-कर्मचाऱयांकडूनही संताप व्यक्त होत आहे.

75 हजार लोकांची व्यवस्था

पंतप्रधान येत असलेल्या कार्यक्रमासाठी 75 हजार लोक येण्याचा अंदाज असून यासाठीची व्यवस्था महापालिकेला करावी लागणार आहे.
यामध्ये बैठक व्यवस्था, पाणी, फिरती शौचालये, स्वच्छता आणि महत्त्वाचे म्हणजे पालिकेच्या कामांची ऑडिओ, व्हिडीओ आणि प्रसारमाध्यमांमध्ये जाहिरात करण्याची जबाबदारी राहणार आहे.

पालिकेच्या कोटय़वधींच्या कामांचे भूमिपूजन होणार

समुद्रात जाणारे दूषित पाणी रोखण्यासाठी सात सिकरेज ट्रिटमेंट प्लांट सुरू करण्यात येणार आहेत. यामध्ये भांडुप प्रकल्प – 2537 हजार कोटी, करळी – 5811, कर्सेका – 1604, कांद्रे – 4293, मालाड 7107, धाराकीसाठी – 4636 हजार कोटी असा एकूण 25 हजार 988 कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. सिमेंट काँक्रीटच्या 400 किमीच्या रस्त्यांसाठी सहा हजार कोटी, भांडुप सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल 670 कोटी, सौंदर्यीकरणांच्या कामांसाठी एकूण 1750 कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे.

Web Title: Prime minister modis meeting in mumbai on january 19 inauguration will be held for various projects but the burden of expenses is on the municipal corporation nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 17, 2023 | 09:13 AM

Topics:  

  • BJP
  • BMC
  • BMC Election
  • Eknath Shinde
  • narendra modi

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: ‘बेस्ट’मध्ये पराभव अन् इकडे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, ‘या’ नेत्यांनी सोडली साथ
1

Maharashtra Politics: ‘बेस्ट’मध्ये पराभव अन् इकडे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, ‘या’ नेत्यांनी सोडली साथ

परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर मॉस्को दौऱ्यावर; २६ व्या भारत-रशिया सहकार्य बैठकीत होणार सहभागी
2

परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर मॉस्को दौऱ्यावर; २६ व्या भारत-रशिया सहकार्य बैठकीत होणार सहभागी

Mumbai Monorail: मुंबईतील मोनोरेलमध्ये अडकलेल्या प्रवाशांची सुखरुप सुटका; मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश
3

Mumbai Monorail: मुंबईतील मोनोरेलमध्ये अडकलेल्या प्रवाशांची सुखरुप सुटका; मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

Nagpur News: नरेंद्र मोदींना निवृत्त करून गडकरींना पंतप्रधान करा…; मोहन भागवतांकडे मोठी मागणी
4

Nagpur News: नरेंद्र मोदींना निवृत्त करून गडकरींना पंतप्रधान करा…; मोहन भागवतांकडे मोठी मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.