Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोल्हापूर जिल्ह्यात आजपासून 15 दिवसांसाठी जमावबंदी

कर्नाटक सरकारविरोधी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आणि ग्रामपंचायत निवडणुकीच्या (Gram Panchayat Election) पार्श्वभूमीवर जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात 9 डिसेंबरपासून 23 डिसेंबरपर्यंत जमावबंदीचे आदेश लागू असतील.

  • By Pooja Pawar
Updated On: Dec 09, 2022 | 09:18 AM
कोल्हापूर जिल्ह्यात आजपासून 15 दिवसांसाठी जमावबंदी
Follow Us
Follow Us:

कोल्हापूर : महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद पुन्हा पेटला आहे. दररोज आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्याजात असून महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं आहे. अशातच कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून आजपासून कोल्हापूरमध्ये जमावबंदी (Section 144) आदेश लागू करण्यात आला आहे. ही जमावबंदी 15 दिवसांसाठी लागू असेल. या काळात पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास बंदी असणार आहे. तसेच मिरवणुका आणि सभांनाही बंदी असेल.

अप्पर जिल्हा दंडाधिकारी दत्तात्रय कवितके यांनी काल (8 डिसेंबर) जमावबंदीचे आदेश जारी केले आहेत. आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असं जिल्हा प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आलं आहे. महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न आणि छत्रपती शिवाजी महाराज अवमानाच्या निषेधार्थ शनिवारी (10 डिसेंबर) कोल्हापुरातील शाहू समाधी स्थळावर आंदोलन करण्याची घोषणा जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली आहे.

कर्नाटक सरकारचे सीमावासियांवर होणारे अत्याचार यावर विचारविनिमय करण्यासाठी मविआ नेत्यांची बैठक झाली. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीम, काँग्रेसचे सतेज पाटील, जयश्री जाधव, शिवसेनेचे संजय पवार यांच्यासह मविआचे नेते उपस्थित होते. कर्नाटक सरकारविरोधी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आणि ग्रामपंचायत निवडणुकीच्या (Gram Panchayat Election) पार्श्वभूमीवर जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात 9 डिसेंबरपासून 23 डिसेंबरपर्यंत जमावबंदीचे आदेश लागू असतील. महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 चे पोट कलम (1)अ ते फ आणि कलम 37 (3) अन्वये जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत.

Web Title: Prohibition in kolhapur district for 15 days from today

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 09, 2022 | 09:18 AM

Topics:  

  • Congress
  • kolhapur
  • Mahavikas Aghadi
  • narendra modi
  • Section 144

संबंधित बातम्या

Kolhapur Ekvira Devi: कोल्हापुरात ‘तांदळाची देवी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री एकवीरा देवीचा इतिहास!
1

Kolhapur Ekvira Devi: कोल्हापुरात ‘तांदळाची देवी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री एकवीरा देवीचा इतिहास!

SIR आंदोलनाचा देशभर भडका! मुंबईपासून दिल्लीपर्यंत राजकीय घमासान, आता काँग्रेसने आखली देशव्यापी रणनीती
2

SIR आंदोलनाचा देशभर भडका! मुंबईपासून दिल्लीपर्यंत राजकीय घमासान, आता काँग्रेसने आखली देशव्यापी रणनीती

Congress Job Fair: ३० हून अधिक कंपन्या, ८४६ मुलाखती, ४८६ जॉब ऑफर्स; काँग्रेसच्या रोजगार मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद
3

Congress Job Fair: ३० हून अधिक कंपन्या, ८४६ मुलाखती, ४८६ जॉब ऑफर्स; काँग्रेसच्या रोजगार मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

Delhi Protest : ‘घाबरलेला माणूस आज नाहीतर उद्या मरेल’, खर्गेंचा केंद्रावर निशाणा, दिल्ली मेट्रो-रेल्वे निर्बंधांवरून राजकारण तापलं
4

Delhi Protest : ‘घाबरलेला माणूस आज नाहीतर उद्या मरेल’, खर्गेंचा केंद्रावर निशाणा, दिल्ली मेट्रो-रेल्वे निर्बंधांवरून राजकारण तापलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.