Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 11 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

40 वर्षांची प्रतीक्षा संपली! भारत-न्यूझीलंडमध्ये मोठा करार, तब्बल 35000 कोटींचा होणार व्यापार, ‘या’ क्षेत्रांचं नशीब चमकणार

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील द्विपक्षीय संबंधांना नवी दिशा देणार आहे. ४० वर्षांचा व्यापारी दुष्काळ संपवणाऱ्या 'व्हिजन २०३०' हा करार आहे. या करारामध्ये 2030 पर्यंत व्यापार 35000 कोटींवर नेण्याचा लक्ष आहे. देशातील बऱ्याच क्षेत्रांना याचा फायदा होणार आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jul 11, 2026 | 02:45 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • 40 वर्षांची प्रतीक्षा संपली!
  • भारत-न्यूझीलंडमध्ये मोठा करार
  • तब्बल 35000 कोटींचा होणार व्यापार
भारत-न्यूझीलंड संबंधांमध्ये एक मोठे स्थित्यंतर घडून आले आहे. जवळपास ४० वर्षांनंतर न्यूझीलंडच्या पंतप्रधानांनी केलेला भारत दौरा आणि दोन्ही देशांमधील महत्त्वपूर्ण चर्चांमुळे व्यापारी संबंधांसाठी नवीन मार्ग खुले झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन यांनी दोन्ही देशांमधील आर्थिक भागीदारी अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने ‘व्हिजन २०३०’ नावाचा एक आराखडा संयुक्तपणे तयार केला आहे. येत्या काही वर्षांत द्विपक्षीय व्यापार अंदाजे ३५,००० कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचे दोन्ही देशांचे उद्दिष्ट आहे.

Flipkart-Myntra चा डिस्काउंटच्या नावाखाली 3000 कोटींचा Scam! 33 चाहत्या सेलर्सना फायदा दिल्याचा आरोप; प्रकरण काय?

भारत-न्यूझीलंड संबंधांना नवी दिशा

पंतप्रधान नरेंद्र मोदी न्यूझीलंडच्या अधिकृत दौऱ्यावर असून, या दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी दोन्ही देशांच्या द्विपक्षीय संबंधांना नवी दिशा देणारे अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.याशिवाय, मुक्त व्यापार करार (Free Trade Agreement) लवकरात लवकर लागू करण्यावरही सहमती दर्शवली आहे. याशिवाय कृषी, दुग्धव्यवसाय, पर्यटन, सागरी सहकार्य, कौशल्य विकास, स्वच्छ ऊर्जा आणि नवोपक्रम यांसारख्या क्षेत्रांमध्ये सहकार्य अधिक बळकट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

 

This has been a great year for the India-New Zealand partnership. Earlier this year, our nations concluded a Free Trade Agreement in record time and now, we have elevated our ties to a Strategic Partnership. Next up, we wish to double bilateral trade by 2030! https://t.co/IyR5qpUt2X — Narendra Modi (@narendramodi) July 11, 2026

भारत-न्यूझीलंड संबंधांमध्ये नवी सुरुवात

भारत आणि न्यूझीलंड यांचे दीर्घकाळापासून चांगले राजनैतिक संबंध आहेत, परंतु दोन्ही देशांमधील आर्थिक व्यापार अपेक्षेप्रमाणे वाढलेला नाही. ही दरी भरून काढण्यासाठी दोन्ही देशांनी आता ‘व्हिजन २०३०’ ची आखणी केली आहे. पंतप्रधान मोदी आणि पंतप्रधान लक्सन यांनी त्यांच्या भेटीत सहमती दर्शवली की, दोन्ही देश एकमेकांच्या बाजारपेठांमध्ये प्रवेश सुलभ करण्यासाठी, गुंतवणूक वाढवण्यासाठी आणि व्यावसायिक सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी प्रयत्न करतील. याशिवाय पुढील चार वर्षांत कृषी, दुग्धव्यवसाय, पर्यटन, सागरी सहकार्य, कौशल्य विकास, स्वच्छ ऊर्जा आणि नवोपक्रम यांसारख्या क्षेत्रांमध्ये सहकार्य अधिक बळकट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

३५,००० कोटी रुपयांचा व्यापार

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील व्यापार वाढवणे हे एक प्रमुख उद्दिष्ट राहिले आहे. दोन्ही देशांना भविष्यात व्यापारामध्ये जलद वाढ आणि कंपन्यांसाठी नवीन संधी निर्माण व्हाव्यात असे वाटते. न्यूझीलंड कृषी, दुग्धव्यवसाय आणि तंत्रज्ञान यांसारख्या क्षेत्रांमध्ये भारतासाठी एक महत्त्वपूर्ण भागीदार बनू शकतो. तर दुसरीकडे, भारत औषधनिर्माण, माहिती तंत्रज्ञान, उत्पादन आणि सेवा क्षेत्रांमध्ये न्यूझीलंडसाठी एक प्रमुख बाजारपेठ बनू शकतो.

न्यूझीलंडच्या निर्यातीला टॅरिफ फ्री प्रवेश

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील व्यापार करारामुळे न्यूझीलंडच्या निर्यातदारांना सर्वाधिक फायदा होण्याची अपेक्षा आहे. न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन यांच्या म्हणण्यानुसार, व्यापार कराराच्या अंमलबजावणीच्या पहिल्या दिवसापासून न्यूझीलंडच्या ५७% निर्यातीला भारतात शुल्कमुक्त प्रवेश मिळेल. यामुळे न्यूझीलंडच्या कृषी, अन्न प्रक्रिया आणि दुग्ध उत्पादनांना भारतीय बाजारपेठेत प्रवेश मिळण्यास मदत होईल. भारतालाही न्यूझीलंडच्या बाजारपेठेत आपल्या उत्पादनांसाठी अधिक संधी मिळण्याची अपेक्षा आहे. हा करार दोन्ही देशांमधील व्यापारासाठी नवीन मार्ग खुले करेल.

प्रमुख करार कोणते ?

१. व्यापार आणि गुंतवणूक – भारत आणि न्यूझीलंड व्यवसायांसाठी गुंतवणूक सुलभ करण्यावर आणि नवीन भागीदारी वाढवण्यावर लक्ष केंद्रित करतील.
२. शिक्षण – दोन्ही देश विद्यार्थी, विद्यापीठे आणि संशोधन संस्था यांच्यातील सहकार्य वाढवण्यासाठी काम करतील.
३. कृषी आणि दुग्धव्यवसाय – न्यूझीलंड आपल्या दुग्धव्यवसाय आणि कृषी तंत्रज्ञानासाठी प्रसिद्ध आहे. या करारामुळे भारताला फायदा होऊ शकतो.
४. सुरक्षा – दोन्ही देशांनी संरक्षण आणि सागरी सुरक्षा क्षेत्रात सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा केली आहे. इंडो-पॅसिफिक प्रदेशातील बदलत्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
५. तंत्रज्ञान – दोन्ही देशांनी डिजिटल तंत्रज्ञान आणि स्टार्टअप्समध्ये एकत्र काम करण्यासही सहमती दर्शवली आहे.

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ‘या’ तारखेला मिळणार PM Kisan योजनेचा 24 वा हफ्ता, ‘ही’ चूक टाळा नाहीतर अडकतील 2000 रुपये

Web Title: Agreement between india and new zealand trade worth 35000 crore

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 11, 2026 | 02:45 PM

Topics:  

  • Business
  • Business News
  • narendra modi
  • New Zealand
  • Tarrif

संबंधित बातम्या

Digital India: पंतप्रधान मोदींची ऑकलंडमध्ये मोठी घोषणा; आता न्यूझीलंडमध्येही चालणार भारताचे UPI! विद्यार्थ्यांसह पर्यटकांची चंगळ
1

Digital India: पंतप्रधान मोदींची ऑकलंडमध्ये मोठी घोषणा; आता न्यूझीलंडमध्येही चालणार भारताचे UPI! विद्यार्थ्यांसह पर्यटकांची चंगळ

Flipkart-Myntra चा डिस्काउंटच्या नावाखाली 3000 कोटींचा Scam! 33 चाहत्या सेलर्सना फायदा दिल्याचा आरोप; प्रकरण काय?
2

Flipkart-Myntra चा डिस्काउंटच्या नावाखाली 3000 कोटींचा Scam! 33 चाहत्या सेलर्सना फायदा दिल्याचा आरोप; प्रकरण काय?

DA Hike News: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट! महागाई भत्ता 63% वर जाणार? नवीन आकडेवारीतून ‘इतक्या’ वाढीचे संकेत
3

DA Hike News: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट! महागाई भत्ता 63% वर जाणार? नवीन आकडेवारीतून ‘इतक्या’ वाढीचे संकेत

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ‘या’ तारखेला मिळणार PM Kisan योजनेचा 24 वा हफ्ता, ‘ही’ चूक टाळा नाहीतर अडकतील 2000 रुपये
4

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ‘या’ तारखेला मिळणार PM Kisan योजनेचा 24 वा हफ्ता, ‘ही’ चूक टाळा नाहीतर अडकतील 2000 रुपये

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.