Maharashtra Drought: डिंभे उजव्या कालव्याला तातडीने पाणी सोडा; ४५ गावांतील शेतकऱ्यांची आर्त हाक
पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे शेतातील उभी पिके डोळ्यांदेखत करपू लागली आहेत. पिकांना वाचवण्यासाठी शेतकरी पाण्याच्या शोधात धावपळ करत असून, वेळेत पाणी न मिळाल्यास हाती आलेले पीक वाया जाण्याची दाट भीती निर्माण झाली आहे. शेतीच्या पाण्याचा प्रश्न तर गंभीर झालाच आहे, शिवाय पाळीव जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा आणि चाऱ्याचा प्रश्नही बिकट झाल्याने ग्रामीण भागात चिंता व्यक्त केली जात आहे. डिंभे उजव्या कालव्याला त्वरित पाणी सोडल्यास या भागातील विहिरी व कूपनलिकांच्या पाण्याच्या पातळीत वाढ होऊन शेतीला मोठा दिलासा मिळेल, तसेच गावांतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही तात्पुरता सुटण्यास मदत होईल.
परिसरातील परिस्थिती अत्यंत नाजूक बनली असून प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. या पार्श्वभूमीवर, डिंभे उजव्या कालव्यातून तातडीने आवर्तन सोडण्यासाठी शेतकऱ्यांचे एक शिष्टमंडळ लवकरच माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेऊन निवेदन देणार आहे, अशी माहिती पंचायत समिती सदस्य निलेश टेमकर यांनी दिली. वाढत्या टंचाईची तीव्रता ओळखून पाटबंधारे विभागाने विलंब न करता कालव्याला पाणी सोडावे, अशी एकमुखी मागणी दोन्ही तालुक्यांतील ग्रामस्थ करत आहेत.
Pune Drunk and Drive: दारूच्या नशेत भरधाव कार थेट बंगल्याच्या गेटवर; गेट तोडून डस्टरचेही नुकसान
“डिंभे उजव्या कालव्यावर अवलंबून असणाऱ्या ४५ गावांमधील पाणीटंचाई दिवसेंदिवस बिकट बनत आहे. पाणी नसल्यामुळे शेतातील उभी पिके करपू लागली असून जनावरांचा चारा आणि पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे. कालव्याला तातडीने पाणी सोडण्याबाबत प्रशासनावर दबाव आणण्यासाठी आमचे शिष्टमंडळ लवकरच माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेणार आहे.”
— निलेश टेमकर (सदस्य, पंचायत समिती)
Ans: हुतात्मा बाबू गेनू सागर डिंभे धरणाच्या उजव्या कालव्याला तातडीने पाण्याचे आवर्तन सोडून ४५ गावांतील शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवावा, ही मुख्य मागणी आहे.
Ans: कालव्याला पाणी सोडल्यामुळे परिसरातील विहिरी, पाझर तलाव आणि कूपनलिकांच्या पाण्याच्या पातळीत वाढ होईल, ज्यामुळे करपणारी पिके वाचतील आणि पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटेल.
Ans: डिंभे उजव्या कालव्यातून तात्काळ पाणी सोडण्यासाठी शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ माजी गृहमंत्री व स्थानिक नेते दिलीप वळसे पाटील यांची भेट घेऊन निवेदन देणार आहे.






