Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 19 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Drought 2026: दुष्काळाची भीषण कुऱ्हाड! ‘आम्हाला सांभाळता येत नाही, तुम्हीच वाचवा’; अश्रू ढाळत शेतकरी सोडतायत गोवंश

Maharashtra Drought 2026: महाराष्ट्रातील भीषण दुष्काळामुळे शेतकऱ्यांसमोर जनावरांच्या संगोपनाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. चारा आणि पाण्याच्या टंचाईमुळे हतबल झालेले शेतकरी 'आम्हाला सांभाळता येत नाही, तुम्हीच वाचवा', अशी विनवणी करत निसर्गसृष्टी गोपालन संस्थेत आपला गोवंश सोडत आहेत.

  • By श्वेता झगडे
Updated On: Oct 19, 2026 | 11:44 AM
दुष्काळाची भीषण कुऱ्हाड! 'आम्हाला सांभाळता येत नाही, तुम्हीच वाचवा'; अश्रू ढाळत शेतकरी सोडतायत गोवंश

दुष्काळाची भीषण कुऱ्हाड! 'आम्हाला सांभाळता येत नाही, तुम्हीच वाचवा'; अश्रू ढाळत शेतकरी सोडतायत गोवंश

Follow Us
Follow Us:
  • दुष्काळाची भीषण कुऱ्हाड!
  • ‘आम्हाला सांभाळता येत नाही, तुम्हीच वाचवा’
  • निसर्गसृष्टी गोपालन संस्थेत अश्रू ढाळत शेतकरी सोडून जात आहेत गोवंश
पोपट पिटेकर,अहिल्यानगर : दुष्काळाच्या भयानक छायेमुळे ग्रामीण भागातील शेतकरी पूर्णपणे कोलमडला आहे. छावणीत किंवा स्वतःच्या दावणीला जनावरांना पाजायला पाणी आणि खायला चारा उरलेला नसल्याने हतबल झालेले शेतकरी आता गोपालन संस्थांचा आसरा घेत आहेत. ईसळक येथील निसर्गसृष्टी गोपालन संस्थेत सध्या 600 हून अधिक जनावरे असतानाच, दुष्काळ अधिकृतपणे जाहीर होण्याआधीच 60 ते 70 गोवंश नव्याने संस्थेत आणून सोडण्यात आले आहेत. एवढेच नाही तर तब्बल 300 ते 400 शेतकरी संस्थेच्या संपर्कात असून, आम्हाला सांभाळणे शक्य नाही, तुम्हीच आमच्या जनावरांना वाचवा, अशी आर्जव करत अश्रू ढाळत आपली जनावरे संस्थेच्या हवाली करत आहेत. (Maharashtra Drought 2026)

Yavatmal News: कापसाने गाठला ९,६०० रुपयांचा भाव! कापसाचे दर वधारले, मात्र शेतकऱ्यांचे उत्पादन घटले

जनावरांची संख्या 1 हजारच्या पार जाण्याची भीती

शेतकऱ्यांची ही भीषण परिस्थिती पाहता येत्या काही दिवसांत संस्थेतील गोवंशाची संख्या 1,000च्या पार जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एकीकडे जनावरांची संख्या वेगाने वाढत आहे, तर दुसरीकडे पाणी आणि चाऱ्याचा तुटवडा निर्माण झाल्याने एवढा मोठा गोवंश कसा सांभाळायचा, असा गंभीर आणि आव्हानात्मक प्रश्न संस्थेसमोर उभा ठाकला आहे.

गावातील पाणी दोन महिन्यांत संपणार; बाहेर राज्यातून भुसा मागवण्याची तयारी

सध्या गावात विकत मिळणारे पाणीही अवघ्या दोन-तीन महिन्यांत संपण्याच्या मार्गावर आहे. भविष्यात नगर शहरातून पाण्याचे टँकर आणावे लागतील अशी चिंतेची बाब आहे. आज 1,000 रुपयांना मिळणारा टँकर उद्या 2,000 रुपयांपर्यंत विकत घ्यावा लागेल. चाऱ्याची टंचाई भागवण्यासाठी पंजाब आणि मध्य प्रदेशातून गव्हाचा भुसा मागवण्याची तयारी संस्थेने केली आहे. सध्या दिवसाला 10 ते 12 लाख रुपये खर्च येत असून, वाढत्या संख्येमुळे हा खर्च दुप्पट होण्याचा अंदाज आहे.

आता जनतेनेच पाठीशी उभे राहावे!

हिंदुत्ववादी नेत्यांचे मार्गदर्शन व सहकार्य असले तरी त्यांच्या मदतीलाही मर्यादा आहेत. त्यामुळे केवळ राजकीय नेत्यांवर अवलंबून न राहता सामान्य जनतेने या संघर्षाच्या काळात पुढे यावे, असे आवाहन संस्थेने केले आहे. माणसाच्या खाण्या-पिण्याची व्यवस्था कशीही होऊ शकते, पण या मूक जनावरांकडे दुर्लक्ष झाले तर ते जगू शकणार नाहीत. आपण गोमातेचे रक्षण केले तर गोमाता आपले रक्षण करेल. या कठीण प्रसंगात जनतेने सढळ हाताने मदत करावी,”असे भावूक आवाहन निसर्गसृष्टी गोपालन संस्थेचे संस्थापक गौतम कराळे यांनी केले आहे.

Mira Bhayandar: महासभेत हाणामारी, तरीही शेकडो कोटींच्या प्रस्तावांना मंजुरी; भाजपच्या कारभारावर विरोधकांचा आक्षेप; नेमकं काय घडलं?

💡

Frequently Asked Questions

  • Que: दुष्काळामुळे शेतकरी आपला गोवंश गोपालन संस्थेत का सोडत आहेत?

    Ans: भीषण दुष्काळामुळे चारा आणि पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. जनावरांच्या संगोपनाचा खर्च परवडत नसल्याने हतबल झालेले शेतकरी त्यांना सुरक्षित आश्रय मिळावा म्हणून गोपालन संस्थेकडे सोपवत आहेत.

  • Que: निसर्गसृष्टी गोपालन संस्थेत गोवंश सोडताना शेतकरी भावूक का होत आहेत?

    Ans: अनेक शेतकऱ्यांचे आपल्या जनावरांशी जिव्हाळ्याचे नाते असते. वर्षानुवर्षे कुटुंबातील सदस्याप्रमाणे सांभाळलेल्या जनावरांना दुष्काळामुळे दुसरीकडे सोपवावे लागत असल्याने शेतकरी भावूक होत आहेत.

  • Que: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी कोणत्या उपाययोजना आवश्यक आहेत?

    Ans: जनावरांसाठी चारा छावण्या, पुरेसा पाणीपुरवठा, अनुदानित पशुखाद्य, मोफत पशुवैद्यकीय सेवा आणि गोपालन संस्थांना आर्थिक मदत यांसारख्या उपाययोजनांची गरज आहे.

  • Que:

    Ans:

Web Title: Severe drought crisis farmers abandon cattle at nisargsrushti gopalan santha sz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 19, 2026 | 11:44 AM

Topics:  

  • Farmers
  • maharashtra
  • Maharashtra Drought 2026

संबंधित बातम्या

MD Drugs Case: एमडी ड्रग्स विक्रीप्रकरणी पोलीस हवालदारालाच अटक! प्रकाश पवारसह दोघांना बेड्या; ९.२ ग्रॅम एमडी ड्रग्स जप्त
1

MD Drugs Case: एमडी ड्रग्स विक्रीप्रकरणी पोलीस हवालदारालाच अटक! प्रकाश पवारसह दोघांना बेड्या; ९.२ ग्रॅम एमडी ड्रग्स जप्त

गणेश भक्तांना लुटणाऱ्या टोळीच्या म्होरक्याला बेड्या; फरासखाना पोलिसांची उत्तर प्रदेशात मोठी कारवाई
2

गणेश भक्तांना लुटणाऱ्या टोळीच्या म्होरक्याला बेड्या; फरासखाना पोलिसांची उत्तर प्रदेशात मोठी कारवाई

Gondiya News: १०८ रुग्णवाहिकेचा ३ लाख रुग्णांना लाभ! रुग्णांना मिळाली तातडीची मदत, गोंदियात आपत्कालीन रुग्णवाहिकासेवेचा विस्तार
3

Gondiya News: १०८ रुग्णवाहिकेचा ३ लाख रुग्णांना लाभ! रुग्णांना मिळाली तातडीची मदत, गोंदियात आपत्कालीन रुग्णवाहिकासेवेचा विस्तार

अपघातातील नुकसान भरपाईच्या नावाखाली तरुणीकडून 50 हजार उकळले, नंतर…; पुण्यातील प्रकार
4

अपघातातील नुकसान भरपाईच्या नावाखाली तरुणीकडून 50 हजार उकळले, नंतर…; पुण्यातील प्रकार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.